गेल्या महिनाभरापासून संपूर्ण भारतात टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. अनेक ठिकाणी टोमॅटोचे भाव २०० रुपयांच्या पुढे गेले आहेत. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर उत्तराखंडच्या काही भागातील लोकांनी स्वस्तात टोमॅटो खरेदी करण्याची अनोखी योजना आखली आहे. खरं तर भारताच्या जवळ असलेल्या नेपाळ सीमेपलीकडे जाऊन भारतातील लोक स्वस्त भाज्या आणि टोमॅटो खरेदी करीत आहेत. दुसरीकडे या संधीचा फायदा घेत नेपाळचे भाजीपाला व्यापारी स्वत:च्या देशाच्या तुलनेत भारतातील जनतेला थोड्या महागात टोमॅटो विकून मोठी कमाई करीत आहेत. तरीसुद्धा भारतातील लोकांना भारताच्या तुलनेत नेपाळमधून स्वस्तात टोमॅटो मिळत आहे.

टोमॅटो अर्ध्या भावात मिळतात

भारताच्या सीमेजवळील धारचुला आणि बनबासा येथे राहणारे लोक टोमॅटोसाठी नेपाळला जात आहेत, ज्यांची किंमत भारतातील सध्याच्या किमतीच्या जवळपास निम्मी आहे. टोमॅटो भारतात १३० ते १२० रुपये प्रतिकिलो दराने विकला जातो, तर त्यांची किंमत १०० ते ११० नेपाळी रुपये आहे (जे भारतात ६२ ते ६९ रुपये आहे). नेपाळमधील दारचुलाचे रहिवासी कमल जोशी यांच्या म्हणण्यानुसार, नेपाळमधील व्यापारी भाजीपाल्यापासून दुप्पट उत्पन्न मिळवत आहेत.

हेही वाचाः मोदी सरकारने काही सोन्याचे दागिने आणि वस्तूंच्या आयातीवर घातली बंदी, आयात धोरणातही सुधारणा

नेपाळ कसा फायदा घेत आहे?

मान्सूनमुळे भारतात भाज्यांचे भाव वाढतात हे नेपाळमधील शेतकऱ्यांच्या लक्षात आले आहे. गेल्या काही वर्षांपासून नेपाळ सरकारने शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी भाजीपाला पिकवण्यास सांगून ‘त्यांच्या पिकांमध्ये विविधता आणण्यासाठी’ प्रोत्साहन दिले. त्यासाठी नेपाळ सरकारने शेतकरी गट तयार केले, त्यांना बियाणे, खते आणि पॉलिहाऊस सुविधा पुरवली आणि त्यांना अनेक कृषी अनुदाने दिली. आता बरेच नेपाळी शेतकरी टोमॅटोसह हंगामी भाजीपाला पिकवतात आणि आता त्यांना भारतात पिकांच्या वाढीव किमतीचा फायदा होत आहे. हे शेतकरी फ्लॉवर आणि पालक पिकवतात आणि जेव्हा जेव्हा टंचाई किंवा भाव वाढतात, तेव्हा भारतीय बाजारपेठेत पुरवठा करतात. नेपाळ सीमेजवळ असलेल्या उत्तराखंडच्या पिथौरागढ आणि चंपावत जिल्ह्यांमध्ये सीमापार व्यापार सामान्य आहे. दोन्ही बाजूचे लोक दुसऱ्या देशातील बाजारपेठेत जाण्यासाठी पूल ओलांडतात, असंही रिपोर्टमध्ये म्हटलंय.

हेही वाचाः स्विस बँकेत किती रुपयांत खाते उघडता येते? प्रक्रिया अन् अर्ज कसा करावा? जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टोमॅटोची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते

पिथौरागढच्या झुलाघाट येथील भाजी विक्रेते आणि स्थानिक व्यापारी संघटनेचे प्रमुख सुरेंद्र कुमार यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले की, रहिवाशांच्या व्यतिरिक्त व्यापाऱ्यांनी नेपाळमधून टोमॅटो खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. काही स्थानिक व्यापाऱ्यांनी अलीकडेच ४० रुपये किलो या घाऊक दराने टोमॅटोची मोठ्या प्रमाणात खरेदी केली. साधारणपणे बटाटे, कांदे इत्यादी भारतातून नेपाळला पाठवले जातात, कारण आपण त्यांची जास्त लागवड करतो. मात्र आता याला नवे वळण लागलेले दिसते. नेपाळी व्यापारी टोमॅटो खरेदी करण्यासाठी नेपाळला जाणार्‍या भारतीयांसह भारतीय रुपयात व्यवसाय करण्यास प्राधान्य देतात, कारण त्यांच्यासाठी ते अधिक मूल्यवान आहे. पिथौरागढच्या डीएम रीना जोशी म्हणाल्या की, दोन्ही बाजूचे लोक बऱ्याचदा सीमा ओलांडतात आणि दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी करतात. सुरक्षा यंत्रणा या वस्तूंची तपासणी करतात, असंही त्यांनी सांगितलं.