देशातील वाहन निर्मिती क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या टोयोटा किर्लोस्करने वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) कपातीचा संपूर्ण फायदा ग्राहकांना देण्यासाठी विद्यमान महिन्यात प्रवासी वाहनांच्या किमती कमी करण्याची घोषणा केली आहेत. आता टोयोटा किर्लोस्कर मोटरकडून नवरात्रीसाठी नवीन ऑफरची घोषणा केली आहे.
सणासुदीच्या काळामध्ये अधिक उत्साहाची भर टाकत टोयोटा किर्लोस्कर मोटरने (टीकेएम) ग्राहकासांठी दुप्पट फायद्याची घोषणा केली. प्रवासी वाहन आणि एसयूव्हींवर नुकतेच जाहीर करण्यात आलेल्या जीएसटी दरामधील कपातीचे संपूर्ण फायदे दिल्यानंतर टीकेएम पश्चिम प्रांतामधील म्हणजेच महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातमधील ग्राहकांसाठी विशेष मोहिम ‘बाय नाऊ अँड पे इन २०२६’ राबवली आहे. जीएसटी दर कपात आणि टोयोटाची फेस्टिव्ह ऑफर असे दुहेरी फायदे या काळात ग्राहकांना मिळतील. अर्बन क्रूझर हायराइडर, ग्लांझा आणि टायसर मॉडेल्सवर विशेष उत्सवी ऑफर मिळणार आहे.
जीएसटी दर कपात २२ सप्टेंबर २०२५ पासून लागू होणार असताना ‘बाय नाऊ अँड पे इन २०२६’ ऑफर ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत वैध आहे, जी फक्त पश्चिम भारतातील (महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश व गोवा) अधिकृत टोयोटा डिलरशिप्समध्ये उपलब्ध आहे. ऑफरची वैशिष्ट्ये म्हणजे ग्राहकांना जानेवारी २०२६ पासून नियमित ईएमआय सुरु होतील आता विद्यमान महिन्यात केवळ ९९ रुपये दरमहा देऊन तीन महिन्यांची ईएमआय हॉलिडे असेल. तसेच ५-वर्ष एक्स्टेण्डेड वॉरंटी, कॉर्पोरेट अँड एक्स्चेंज बोनस आणि संरक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी विशेष फायदे आदींचा समावेश आहे.
टोयोटाने याआधीच वाहनांच्या किमती ३.४९ लाख रुपयांपर्यंत कमी केल्याची घोषणा केली आहे. सुधारित किमती २२ सप्टेंबर २०२५ पासून लागू होतील. ग्लांझा हॅचबॅकची किंमत ८५,३०० रुपयांपर्यंत, टायसर १.११ लाख रुपयांनी, रुमियन ४८,७०० रुपयांनी, हायराइडर ६५,४०० रुपयांनी, क्रिस्टा १.८ लाख रुपयांनी, हायक्रॉस १.१५ लाख रुपयांनी आणि फॉर्च्युनर ३.४९ लाख रुपयांनी कमी होण्याची अपेक्षा आहे. तसेच, लेजेंडरची किंमत ३.३४ लाख रुपयांनी, हायलक्स २.५२ लाख रुपयांनी, कॅमरीची १.०१ लाख रुपयांनी आणि व्हेलफायरची किंमत २.७८ लाख रुपयांनी कमी होण्याची अपेक्षा आहे.