युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) साठी ऑगस्ट महिना मैलाचा दगड ठरला आहे. ऑगस्टमध्ये UPI व्यवहाराचा आकडा १० अब्जांच्या पुढे गेला आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने ऑगस्टमध्ये UPI द्वारे १५.७६ लाख कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याचे कौतुक केले आहे. मोबाईल फोनद्वारे झटपट पैशांच्या व्यवहारासाठी UPI चा वापर केला जातो.

ऑगस्ट २०२३ मध्ये यूपीआय (UPI) द्वारे झालेल्या व्यवहारांनी १० अब्जांचा टप्पा पार केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. ‘एनपीसीआय’च्या पोस्टला रिट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समाज माध्यमांवर पोस्ट केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून लिहिले, ‘ही चांगली बातमी आहे, भारतातील लोक डिजिटल प्रगतीचा अवलंब करत आहेत याचे हे उदाहरण आहे. तसेच हा त्याच्या कौशल्याचा आदर आहे. हा ट्रेंड आगामी काळातही कायम राहणार आहे.

“ही अपवादात्मक गोष्ट आहे! भारतातील नागरिक डिजिटल प्रगतीचा स्वीकार करत असल्याचे हे निदर्शक आहे, त्यांच्या कौशल्याला सलाम. आगामी काळातही अशीच प्रगती कायम राहो.”  

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

NCPI डेटानुसार, ३० ऑगस्ट रोजी UPI व्यवहारांचा आकडा १०.२४ अब्जांवर पोहोचला आहे. या व्यवहारांचे मूल्य १५,१८,४५६.४ कोटी रुपये होते. जुलैमध्ये UPI व्यवहारांची संख्या ९.९६ अब्ज होती, तर जूनमध्ये ती ९.३३ अब्ज होती. व्यवहाराच्या संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ६१ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. त्याचबरोबर गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या व्यवहाराच्या रकमेत ४७ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.