बेंटनविले : किराणा क्षेत्रातील जगातील सर्वात बलाढ्य कंपनी वॉलमार्टने नोकरकपात सुरू केली असून, शेकडो नोकऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड, तर अनेक कर्मचाऱ्यांची बदली करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. अमेरिकेतील डलास, ॲटलांटा आणि टोरंटो कार्यालयातील बऱ्याच कामगारांना आता बेंटनविले, होबोकेन, न्यू जर्सी आणि सॅन फ्रान्सिस्को येथील कार्यालयांत स्थलांतरित करणे आवश्यक ठरेल, असे वॉलमार्टकडून सूचित करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> किमान सार्वजनिक भागधारणा वाढवण्यासाठी ‘एलआयसी’ला मुदतवाढ

कमर्चाऱ्यांचे दुसऱ्या कार्यलयांमध्ये स्थलांतरणाचा उद्देश हा कामात नावीन्य आणण्याचा आणि सहयोग वाढवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. शिवाय काही ठिकाणी व्यवसायाच्या पद्धतीमध्ये बदल करण्यात आल्यामुळे काही कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागली आहे, असे वॉलमार्टचे म्हणणे आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने यांत्रिकीकरणावर अधिक भर दिल्याने कमर्चाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. वॉलमार्टच्या प्रवक्त्याने टाळेबंदीचे कारण आणि इतर कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना आरकान्सा, न्यू जर्सी आणि कॅलिफोर्नियामधील कार्यालयांत एकत्र काम करण्यास का सांगितले जात आहे, यासंबंधी वृत्तसंस्थेने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देणे टाळले. वॉलमार्टमध्ये जागतिक स्तरावर २१ लाख कर्मचारी कार्यरत आहेत. आता त्यापैकी किती कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात येणार हे तूर्तास स्पष्ट झालेले नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.