आशीष ठाकूर
आता सुरू असलेल्या मंदीचे सूतोवाच या स्तंभातील १६ जूनच्या ‘कालाय तस्मै नम:’ आणि १४ जुलैच्या ‘सिंहावलोकन’ या लेखांमध्ये केलेले होते. या दोन लेखांतील वाक्यांच्या ल.सा.वि.ची पुन्हा एकदा उजळणी आवश्यकच. निफ्टी निर्देशांकाची भविष्यकालीन वाटचाल रेखाटताना आपण ‘इलियट वेव्ह’ संकल्पना आणि ‘गॅन कालमापन पद्धती’ (गॅन टाइम सायकल) या दोन संकल्पनांचा आधार घेतला. ‘इलियट वेव्ह’ संकल्पनेप्रमाणे निफ्टी निर्देशांक २५,७०० चा टप्पा पार करण्यास आणि २५,००० चा लक्ष्यवेधी आकड्याचा भरभक्कम आधार राखण्यास तो अपयशी ठरल्यास, निफ्टी निर्देशांकाचे प्रथम खालचे लक्ष्य २४,८०० आणि द्वितीय खालचे लक्ष्य २४,००० ते २३,८०० हे ‘गॅन कालमापन पद्धती’प्रमाणे ऑगस्ट महिन्यात साध्य होईल, असे त्यात स्पष्टपणे सुचविले गेले होते.
जूनअखेरीस २५,५०० च्या समीप असलेल्या निफ्टी निर्देशांकाने सरलेल्या सप्ताहात २५,००० चा भरभक्कम आधार तोडला. निफ्टी निर्देशांकाने आपले प्रथम खालचे लक्ष्य २४,८०० च्या समीप म्हणजेच २४,८३७ वर साप्ताहिक बंद नोंदविला. वर उल्लेख आलेल्या दोन्ही लेखांत, जी मंदीची भीती व्यक्त केलेली ती भीती सरलेल्या सप्ताहात प्रत्यक्षात आली.
येणाऱ्या दिवसात भारत, अमेरिका दरम्यानचा ‘आयात कराचा’ निर्णय भारताच्या बाजूने झाल्यास, निफ्टी निर्देशांक २५,००० ते २५,३५० चा स्तर पार करत, तो २५,८०० च्या वर झेपावेल. असे घडल्यास निफ्टी निर्देशांक ‘मंदीच्या गर्तेतून’ बाहेर पडला असे आपण समजू शकतो. ही नाण्याची एक बाजू झाली. निफ्टी निर्देशांक २५,००० ते २५,३५० चा स्तर पार करण्यास वारंवार अपयशी ठरल्यास, निफ्टी निर्देशांकाचे खालचे लक्ष्य हे २४,७०० ते २४,५०० आणि द्वितीय खालचे लक्ष्य २४,२०० ते २३,८०० स्तरापर्यंत जाणारे असेल. निफ्टी निर्देशांक घरंगळत जाण्याचे भय आता निर्माण झाले आहे.
निकालपूर्व विश्लेषण
१) भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल)
२५ जुलैचा बंद भाव : ३९५.२० रु.
तिमाही वित्तीय निकाल: सोमवार, २८ जुलै
महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: ३९० रु.
निकाल उत्कृष्ट असल्यास: या सकारात्मक वृत्ताच्या जोरावर समभागाकडून ३९० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ४१९ रुपये, द्वितीय लक्ष्य ४३५ रुपये.
निराशादायक निकाल असल्यास : ३९० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ३७० रुपयांपर्यंत घसरण
२) लार्सन ॲण्ड टुब्रो लिमिटेड
२५ जुलैचा बंद भाव : ३,४४२.९० रु.
तिमाही वित्तीय निकाल: मंगळवार, २९ जुलै
महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर : ३,३८०रु.
निकाल उत्कृष्ट असल्यास : या सकारात्मक वृत्ताच्या जोरावर समभागाकडून ३,३८० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ३,५०० रुपये, द्वितीय लक्ष्य ३,६०० रुपये.
निराशादायक निकाल असल्यास: ३,३८० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ३,३०० रुपयांपर्यंत घसरण
३) केपीआयटी टेक्नॉलॉजी लिमिटेड
२५ जुलैचा बंद भाव : १,२२७.२० रु.
तिमाही वित्तीय निकाल : बुधवार, ३० जुलै
महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर : १,२०० रु.
निकाल उत्कृष्ट असल्यास : या सकारात्मक वृत्ताच्या जोरावर समभागाकडून १,२०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,२८० रुपये, द्वितीय लक्ष्य १,३५० रुपये.
निराशादायक निकाल असल्यास : १,२०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १,१५० रुपयांपर्यंत घसरण
४) टाटा स्टील लिमिटेड
२५ जुलैचा बंद भाव : १६१.४३ रु.
तिमाही वित्तीय निकाल: बुधवार, ३० जुलै
महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: १५० रु.
निकाल उत्कृष्ट असल्यास : या सकारात्मक वृत्ताच्या जोरावर समभागाकडून १५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १७५ रुपये, द्वितीय लक्ष्य २०० रुपये.
निराशादायक निकाल असल्यास : १५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १२५ रुपयांपर्यंत घसरण – आशीष ठाकूर लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.
ashishthakur1966@gmail.com
अस्वीकृती: शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि ‘इच्छित लक्ष्य’ या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक.