यावर्षीच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी एक घोषणा केली की ज्या करदात्यांची २०१४-१५ या आर्थिक वर्षापर्यंत जुनी करमागणी (डिमांड) बाकी आहे त्यांना ठरावीक रकमेपर्यंत माफी दिली जाईल. यासंदर्भात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने नुकताच आदेश जारी केला. या आदेशानुसार ज्या करदात्यांची ३१ जानेवारी २०२४ रोजी प्राप्तिकर कायदा, संपत्ती कायदा आणि भेट कायद्याच्या अंतर्गत कर-मागणी बाकी असेल त्यांना ही माफी लागू असेल. आर्थिक वर्ष २००९-१० पर्यंत असणाऱ्या २५,००० रुपयांच्या मागण्या आणि आर्थिक वर्ष २०१०-११ ते २०१४-१५ या काळासाठी १०,००० रुपयांपर्यंतच्या मागण्या या माफीसाठी पात्र असतील. करमाफीची एकूण मर्यादा एका करदात्यासाठी सर्व वर्षासाठी मिळून १ लाख रुपयांपेक्षा जास्त नसेल.

प्रश्न : मी २०२२-२३ या आर्थिक वर्षाचे विवरणपत्र ३१ जुलै २०२३ रोजी दाखल केले. नंतर मला समजले की माझे काही उत्पन्न माझ्या विवरणपत्रात दाखवायचे राहून गेले. तोपर्यंत सुधारित विवरणपत्र दाखल करावयाची मुदत (३१ डिसेंबर २०२३) देखील संपून गेली होती. आता मला काय करता येईल? – प्रशांत शिंदे

Inadequate Public Relations, Misconduct to office bearers , lead to cut the ticket, Mumbai bjp members of parliament, gopal Shetty, Poonam Mahajan, manoj kotak, lok sabha 2024, north Mumbai lok sabha seat, Mumbai north central lok sabha seat, north east Mumbai lok sabha seat, marathi news, bjp Mumbai, Mumbai news,
जनता व कार्यकर्त्यांशी उद्धट वर्तन मुंबईतील भाजपच्या तिन्ही खासदारांना भोवले
telangana suicides
तेलंगणात ११वी आणि १२वीचा निकाल जाहीर होताच काही तासांतच सात विद्यार्थ्यांची आत्महत्या
MPSC Mantra Increasing Opportunities in Public Service Commission Competitive Exams
MPSC मंत्र: लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा- वाढत्या संधी
thane lok sabha seat, BJP s Sanjeev Naik, Launches Campaign in Thane, Emphasizes Charitable Birthday Celebration, sanjeev naik in thane lok sabha, mahayuti, shinde shivsena,
वाढदिवसाच्या निमित्ताने संजीव नाईक यांची मतपेरणी

उत्तर : ज्या करदात्यांनी विवरणपत्र मुदतीत, मुदतीनंतर किंवा सुधारित विवरणपत्र दाखल केले असेल किंवा विवरणपत्र दाखल केले नसेल आणि विवरणपत्र किंवा सुधारित विवरणपत्र दाखल करण्याची मुदत संपली असेल आणि करदात्याला सुधारित विवरणपत्र दाखल करावयाचे असेल तर २०२२ मधील दुरुस्तीनुसार करदात्याला अजून एक संधी देण्यात आली आहे. करदाता या मुदती संपल्यानंतर काही अटींची पूर्तता केल्यास ‘अद्ययावत विवरणपत्र’ दाखल करू शकतो. या मुदतीप्रमाणे करदाता करनिर्धारण वर्ष संपल्यानंतर दोन वर्षापर्यंत ‘कलम १३९ (८ए)’नुसार विवरणपत्र दाखल करू शकतो. करदात्याला ‘तोटा’ दाखवायचा असल्यास, करदात्याचे करदायीत्व कमी होत असल्यास किंवा करदात्याला करपरतावा (रिफंड) मिळत असल्यास किंवा वाढत असल्यास करदाता अद्ययावत विवरणपत्र दाखल करू शकत नाही. तसेच करदात्याच्या त्या वर्षाच्या विवरणपत्राचे मूल्यांकन, किंवा कोणतीही प्रक्रिया चालू असेल तरी त्याला अद्ययावत विवरणपत्र दाखल करता येत नाही. एकदा अद्ययावत विवरणपत्र दाखल केल्यानंतर ते पुन्हा सुधारू शकत नाही. अद्ययावत विवरणपत्र दाखल करताना देय कराच्या २५ टक्के (जर हे विवरणपत्र करनिर्धारण वर्ष संपल्यानंतर एक वर्षाच्या आत दाखल केल्यास) किंवा देय कराच्या ५० टक्के (जर हे विवरणपत्र करनिर्धारण वर्ष संपल्यानंतर एक वर्षानंतर आणि दोन वर्षाच्या आत दाखल केल्यास) अतिरिक्त कर भरावा लागतो. आपण हा अतिरिक्त कर आणि त्यावरील व्याज भरून अद्ययावत विवरणपत्र दाखल करू शकता.

हेही वाचा : क… कमॉडिटीचा : शेतकऱ्यांवर रासायनिक मेन्थॉलचे संकट

प्रश्न : मी एक व्यावसायिक आहे. माझे स्वतःचे घर नाही, मी भाड्याच्या घरात राहतो. मला घरभाड्याच्या खर्चाची वजावट मिळेल का? – विकास देशमुख

उत्तर : जे करदाते नोकरी करतात आणि त्यांना मालकाकडून घरभाडे भत्ता (एचआरए) मिळतो. असे कर्मचारी भाड्याच्या घरात रहात असतील तर त्यांना ‘कलम १० (१३ए)’नुसार उत्पन्नातून वजावट घेता येते. अशीच तरतूद जे नोकरी करतात आणि त्यांना घरभाडे भत्ता मिळत नाही किंवा जे नोकरी करत नाहीत अशा करदात्यांना प्राप्तिकर कायद्यातील ‘कलम ८० जीजी’नुसार वजावट घेता येते. या कलमानुसार काही अटींचे पालन करावे लागते. करदात्याकडे किंवा त्याच्या पती/पत्नीकडे, अजाण मुलगा/मुलगी किंवा तो ज्या हिंदू अविभक्त कुटुंबाचा (एचयूएफ) सदस्य आहे अशा कुटुंबाकडे तो ज्या शहरात नोकरी किंवा व्यवसायासाठी राहतो, त्या शहरात घर नसले पाहिजे. करदात्याने इतर शहरात राहते घर असेल तर त्यावर कर सवलत घेतली नसली पाहिजे. ही वजावट घेण्यासाठी करदात्याला विवरणपत्र दाखल करण्यापूर्वी ‘फॉर्म १० बीए’ ऑनलाइन दाखल केला पाहिजे. या कलमांतर्गत उत्पन्नाच्या १० टक्क्यांपेक्षा जास्त घरभाडे, एकूण उत्पन्नाच्या (या कलमानुसार वजावट घेण्यापूर्वी) २५ टक्के आणि दरमहा ५,००० रुपये यापैकी जी कमी रक्कम असेल तेवढी वजावट करदाता उत्पन्नातून घेऊ शकतो.

हेही वाचा : International Women’s Day 2024 : महिला उद्योजकांकडून शिका आर्थिक नियोजनाचे सुत्र! ‘असे’ करा पैश्यांचे नियोजन

प्रश्न : मी एक घर खरेदी करणार आहे जे माझ्या आणि माझ्या पतीच्या संयुक्त नावावर असेल. त्या घराचे खरेदी मूल्य १ कोटी २० लाख रुपये ठरले आहे. आम्ही ज्या व्यक्तींकडून घर खरेदी करणार आहोत तेसुद्धा त्याच्या आणि त्यांच्या पतींच्या संयुक्त नावावर आहे. यावर मला उद्गम कर (टीडीएस) किती आणि कसा कापावा लागेल? – स्मिता गवस

उत्तर : घराचे खरेदी मूल्य ५० लाख रुपयांच्या जास्त असल्यामुळे यावर उद्गम कर लागू असेल. जी व्यक्ती तुम्हाला घर विकते आहे ती निवासी भारतीय आहे असे गृहीत धरल्यास १ टक्का उद्गम कर लागू असेल. उद्गम कर कापताना तुम्हाला अजून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की घराचे मुद्रांक शुल्कानुसार मूल्य हे तुमच्या करार मूल्यापेक्षा कमी असले पाहिजे. मुद्रांक शुल्कानुसार मूल्य आणि करार मूल्य यापैकी जे जास्त असेल त्यावर १ टक्का उद्गम कर कापावा लागेल. उदा. आपल्या घराचे मुद्रांक शुल्कानुसार मूल्य १ कोटी ३० लाख असेल आणि करारमूल्य १ कोटी २० लाख रुपये असेल तर आपल्याला यापैकी जी जास्त रक्कम आहे, म्हणजेच १ कोटी ३० लाख रुपयांवर, उद्गम कर कापावा लागेल आणि आपल्या घराचे मुद्रांक शुल्कानुसार मूल्य १ कोटी १० लाख असेल आणि करारमूल्य १ कोटी २० लाख रुपये असेल तर आपल्याला यापैकी जी जास्त रक्कम आहे, म्हणजेच १ कोटी २० लाख रुपयांवर, उद्गम कर कापावा लागेल. आपण घर संयुक्त नावावर खरेदी करत असल्यामुळे आपल्याला प्रत्येकाच्या हिस्स्यानुसार उद्गम कर कापावा लागेल. जर आपला हिस्सा ५० टक्के असेल तर निम्या रकमेवर प्रत्येकाला १ टक्का उद्गम कर कापावा लागेल. तसेच जे घर आपण खरेदी करणार आहात तेसुद्धा संयुक्त नावावर आहे. त्यामुळे त्या दोघांच्या नावाने उद्गम कर कापावा लागेल. म्हणजे आपल्याला चार चलन भरावे लागतील. उदा. ‘अ’ आणि ‘ब’ हे खरीददार आहेत आणि ‘क’ आणि ‘ड’ विक्री करणारे आहेत तर ‘अ’ ही व्यक्ती त्याच्या हिस्स्याचे ‘क’ला पैसे देताना त्यावर १ टक्का उद्गम कर कापेल आणि ‘ड’ला पैसे देताना त्यावर १ टक्का उद्गम कर कापेल. तसेच ‘ब’ ही व्यक्ती त्याच्या हिस्स्याचे ‘क’ला पैसे देताना त्यावर १ टक्का उद्गम कर कापेल आणि ‘ड’ला पैसे देताना त्यावर १ टक्का उद्गम कर कापेल.

हेही वाचा : यूट्युब म्युझिकचे कर्मचारी सांगत होते, “पगार वाढवा आणि..”; त्याच क्षणी कळलं नोकरीच गेली, कुठे घडली घटना?

प्रश्न : माझे वय ७६ वर्षे आहे. माझे उत्पन्न ८ लाख रुपये आहे, त्यात निवृत्तिवेतन आणि व्याजाचा समावेश आहे. मला विवरणपत्र भरावे लागेल का? – एक वाचक

उत्तर : २०२१ सालच्या सुधारणेनुसार ज्या करदात्यांचे वय ७५ वर्षांपेक्षा जास्त आहे आणि त्यांच्या उत्पन्नात निवृत्तिवेतन आणि व्याजाचा समावेश आहे अशांना विवरणपत्र दाखल करण्यापासून सूट दिली आहे. यासाठी अट अशी आहे की करदात्याला ज्या बँकेतून निवृत्तिवेतन मिळते त्याच बँकेतील खात्यावर व्याज मिळत असेल तर आणि याच्याशिवाय त्याचे दुसरे कोणतेही उत्पन्न नसेल तर, अशांना ही सूट देण्यात आली आहे. आपले दुसरे कोणतेही उत्पन्न नसेल आणि ज्या बँकेतून निवृत्तीवेतन मिळते त्याच बँकेतील खात्यावर व्याज मिळत असेल तर आपल्याला ही सूट मिळू शकते. आपल्याला ही सूट घेण्यासाठी त्या बँकेला १२ बीबीए हा फॉर्म भरून द्यावा लागेल. हा फॉर्म कागदी स्वरूपात बँकेला सादर करावा लागेल. या फॉर्ममध्ये करदात्याला मिळणाऱ्या वजावटी (उदा. घरभाडे भत्ता, कलम ८० सी, ८० डी, वगैरे) यांची माहिती, पुराव्यासह, द्यावी लागेल. त्याप्रमाणे बँक ‘कलम १९४ पी’नुसार उद्गम कर कापेल.

प्रवीण देशपांडे

(लेखक सनदी लेखापाल आणि कर-सल्लागार / ई-मेलः pravindeshpande1966@gmail.com)