नवी दिल्ली : अन्नधान्य विशेषत: सामान्यांच्या दैनंदिन आहारातील प्रथिनेयुक्त जिनसांच्या किमती वधारल्या असल्या तरीही उत्पादित वस्तूंच्या किमती नरमल्याने घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दराने ऑगस्टमध्ये १२.४१ टक्के अशी ११ महिन्यांतील नीचांक पातळीवर घसरण दाखविली आहे.

सलग १९ महिने दुहेरी अंकांत राहिलेला महागाई दर चालू वर्षांत ऑक्टोबरमध्ये ८.३९ टक्क्यांपर्यंत खाली आला. तर वर्षभरापूर्वी म्हणजे नोव्हेंबर २०२१ मध्ये तो १४.८७ टक्के पातळीवर होता.

upi transactions decline
एप्रिलमध्ये ‘यूपीआय’ व्यवहारांत किरकोळ घट
Indian oil s quarterly net profit slashed by 40 percent due small cut in fuel price before elelction
निवडणूकपूर्व इंधन दरकपातीचा फटका; इंडियन ऑइलच्या तिमाही निव्वळ नफ्याला निम्म्याने कात्री  
Retail inflation hit a five month low of 4.85 percent in March
किरकोळ महागाई दर ४.८५ टक्के; पाच महिन्यांच्या नीचांकी घसरण
Equity mutual fund inflows eased in March
मार्चमध्ये इक्विटी म्युच्युअल फंडांतील ओघ आटला

प्रामुख्याने अन्नपदार्थ, मूलभूत धातू, कापड, रसायने आणि रासायनिक उत्पादने आणि कागद व कागदाशी निगडित उत्पादनांच्या किमती मागील वर्षांच्या याच महिन्याच्या तुलनेत कमी झाल्याने नोव्हेंबर २०२२ मध्ये महागाई दरात घसरण झाली, अशी माहिती वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने बुधवारी दिली. घाऊक किंमत निर्देशांकात सर्वाधिक वाटा असलेल्या अन्नधान्याच्या किमती ऑक्टोबर महिन्यातील ८.३३ टक्क्यांच्या तुलनेत १.०७ टक्क्यांपर्यंत घसरल्या आहेत.

त्यापाठोपाठ भाजीपाल्याच्या किमतीत तर ऑक्टोबरमधील १७.६१ टक्क्यांच्या तुलनेत या महिन्यात भाज्यांचा महागाई दर (-) उणे २०.०८ टक्के नोंदवला गेल्याने एकूण निर्देशांकावर अंकुश ठेवण्यास तो मदतकारक ठरला. इंधन-ऊर्जा क्षेत्रातील किंमतवाढ नोव्हेंबरमध्ये १७.३५ टक्केतर उत्पादित वस्तूंचा महागाई दर ३.५९ टक्के राहिला.

सर्वसामान्यांच्या खिशाला भार ठरण्यासह, रिझव्‍‌र्ह बँक व केंद्र सरकारसाठी डोकेदुखी बनलेल्या चलनवाढ अर्थात महागाई दरामध्ये सरलेल्या नोव्हेंबरमध्ये दिलासादायी उतार सोमवारी जाहीर झालेल्या आकडेवारीतून दिसून आला. चालू वर्षांत जानेवारीपासून रिझव्‍‌र्ह बँकेसाठी कमाल सहनशील पातळीपेक्षा म्हणजेच सहा टक्क्यांपेक्षा अधिक राहिल्यानंतर, प्रथमच तो ५.८८ टक्क्यांपर्यंत नरमल्याने या आघाडीवरील चिंता काहीशी कमी झाली आहे.