मुंबईः जेनेरिक औषधांच्या निर्मित्या मध्य प्रदेशस्थित झेनिथ ड्रग्ज लिमिटेडने प्रारंभिक समभाग विक्रीच्या (आयपीओ) माध्यमातून ४०.६७ कोटी रुपये उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. कंपनीने तिचे ५.१४ कोटी भांडवली समभाग सार्वजनिक विक्रीसाठी खुले केले आहेत.  सोमवार १९ फेब्रुवारी ते गुरुवार २२ फेब्रुवारी २०२४ या दरम्यान सुरू राहणाऱ्या भागविक्रीत प्रत्येकी ७५ रुपये ते ७९ रुपये या किमतीदरम्यान समभागांसाठी बोली लावता येईल.

हेही वाचा >>> जेएनपीटीमध्ये ६५० कोटींच्या गुंतवणुकीतून नवीन एलपीजी टर्मिनल; नॉर्वेस्थित बीडब्ल्यू एलपीजीशी भागीदारीतून ‘कॉन्फिडन्स पेट्रोलियम’ची योजना

‘एनएसई इमर्ज’ या बाजारमंचावर समभागांच्या सूचिबद्धतेसाठी ही भागविक्री असल्याने वैयक्तिक गुंतवणूकदारांना किमान १,६०० समभागांसाठी बोली लावणारा अर्ज करावा लागेल. ग्रेटेक्स कॉर्पोरेट सर्व्हिसेस ही या भागविक्रीचे प्रधान व्यवस्थापक आहे.तोंडावाटे घ्यावयाचे द्रवरूप आणि पावडर रूपातील ओआरएस, मलम, तसेच कॅप्सूल आणि गोळ्या असे विस्तारित उत्पादन भांडार आणि देशासह आफ्रिका, आग्नेय आशिया आणि लॅटिन अमेरिकी देशांमध्ये निर्यात करणाऱ्या झेनिथ ड्रग्जने आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ११४.५२ कोटी रुपयांच्या उत्पन्नावर, ५.१५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे.

हेही वाचा >>> झेनिथ ड्रग्जची ४०.६७ कोटींची भागविक्री खुली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नफ्यातील ही वाढ आधीच्या वर्षाच्या तुलनेत ६५ टक्के आहे. सप्टेंबर २०२३ पर्यंत सहामाहीत कंपनीने ६९.४१ कोटी रुपयांच्या एकत्रित महसूलावर, ५.४० कोटी रुपयांचा करोत्तर नफा कमावला आहे, जो नफाक्षमतेत लक्षणीय सुधारणा दर्शवणारा आहे.