Jane Street Scam: गेल्या काही दिवसांत राजकीय वर्तुळातील घडामोडींमध्ये भारतीय मतदार व्यग्र असताना दुसरीकडे बाजारपेठेत एक महत्त्वाची घडामोड झाली. त्यामुळे गुंतवणूकदारांचं लक्ष आपोआप तिकडे वेधलं गेलं. कारण तब्बल ४३ हजार ८०० कोटींचा घोटाळा केल्याचा ठपका ठेवलेल्या जेन स्ट्रीट कंपनीला SEBI नं पुन्हा एकदा बाजारपेठेत व्यवहार करण्यास परवानगी दिली आहे. मूळची अमेरिकन जेन स्ट्रीट या कंपनीने सेबीकडे तब्बल ४ हजार ८४३ कोटींचा दंड भरल्यानंतर कंपनीवरील निर्बंध उठवण्यात आले आहेत.

निर्बंध उठवले, पण प्रश्न कायम

दरम्यान, जेन स्ट्रीटवरील निर्बंध उठवले असले, तरी काही मूलभूत प्रश्न कायम आहेत. याच मुद्द्यांवर लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी ‘दृष्टीकोन’ या विशेष व्हिडीओच्या माध्यमातून भाष्य केलं आहे.

१. सेबीच्या दाव्याप्रमाणे जेन स्ट्रीटनं नेमका घोटाळा कसा केला?

२. जेन स्ट्रीट कशा प्रकारे शेअर बाजारात व्यवहार करत होती?

३. समभागांचे दर कसे वाढतात? ते कसे प्रभावित केले जातात?

४. फ्युचर्स अँड ऑप्शन्स प्रकारातील व्यवहार जेन स्ट्रीटनं कसे केले?

५. जेन स्ट्रीट हा गैरव्यवहार करत असतानाच SEBI नं कारवाई का केली नाही?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

६. गैरव्यवहार करणाऱ्या जेन स्ट्रीटला सेबीनं परवानगी कशी दिली?