PPF Or RD Investment: भविष्यामध्ये आर्थिक स्थिरता टिकून राहावी यासाठी सुरुवातीपासून बचत करणे आवश्यक असते. बचत करण्यासह साठवलेले पैसे योग्य ठिकाणी गुंतवल्यानेही फायदा होत असतो. कठीण काळामध्ये हेच पैसे कामाला येत असतात. अचूक जागी केलेली गुंतवणूक नेहमीच फायदेशीर ठरत असते. पण याकरिता बाजार आणि गुंतवणूकीशी संबंधित ज्ञान असणे आवश्यक असते. अपुऱ्या माहितीसह पैसे गुंतवल्यास आर्थिक नुकसान होऊ शकते. सुरक्षिततेचा मुद्दा लक्षात घेत गुंतवणूकदार पब्लिक प्राॅविडेंट फंड (PPF) आणि रिकरिंग डिपॉजिट (RD) हे पर्याय योग्य मानतात. या योजनांमध्ये पैश्यांच्या सुरक्षिततेची हमी दिली जाते. पीपीएफ आणि आरडी यांमध्ये गुंतवणूक केल्यास त्यावर योग्य प्रमाणात व्याज देखील मिळते. दर महिन्याला पैसे गुंतवणून मोठी रक्कम जमा करता येते.

PPF योजना, व्याजदर आणि सविस्तर माहिती

  • बॅंक किंवा पोस्ट ऑफिसच्या मदतीने या योजनेमध्ये पैसे गुंतवता येतात.
  • फक्त ५०० रुपये भरुन पीपीएफ खाते सुरु करता येते. या खात्यामध्ये दरवर्षाला १.५ लाख रुपयांची गुंतवणूक करता येते.
  • या योजनेचा कार्यकाळ १५ वर्ष इतका आहे. खाते सुरु केल्यावर ३ वर्षांनी त्याच्या बदल्यात कर्ज घेण्याची सुविधा उपलब्ध आहे.
  • पीपीएफ योजनेअंतर्गत, गुंतवणूकदार ७ वर्षांनंतर काही नियम पाळून खात्यातून पैसे काढू शकतात.
  • शासनाद्वारे या योजनेच्या व्याजदराचा आढावा दर तीन महिन्यांनी घेतला जातो. बाजाराच्या स्थितीनुसार त्यात बदल होऊ शकतात.
  • सध्या पीपीएफ खात्यांवर मिळणाऱ्या व्याजदराचे प्रमाण ७.१ टक्के इतके आहे.
  • कलम 80C अंतर्गत या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास कर सूट मिळू शकते.
  • पीपीएफमध्ये दरमहा १ हजार रुपये गुंतवल्यास १५ वर्षांनी ३.२० लाख रुपये मिळतील. यात १.४० लाख रुपये व्याज म्हणून मिळेल.

RD योजना, व्याजदर आणि सविस्तर माहिती

  • रिकरिंग डिपॉजिट (Recurring deposit) ही छोट्या कालावधीसाठीची लहान बचत योजना आहे. पोस्ट ऑफिस किंवा बॅंकमध्ये जाऊन आरडीमध्ये खाते सुरु करता येते.
  • १०० रुपयांपासून या योजनेमध्ये गुंतवणूक करता येते. या योजनेमध्ये कमाला ठेवीवर मर्यादा नसल्याने दहापट रक्कम देखील गुंतवणूकदार खात्यामध्ये ठेवू शकतात.
  • एका व्यक्तीला एकापेक्षा जास्त खाती उघडण्याची मुभा या योजनेमध्ये आहे. शिवाय लहान मुलांच्या नावाने देखील आरडीमध्ये पैसे गुंतवता येतात. तिघांजणांनी मिळून खातं उघडण्याची सोयही यामध्ये आहे.
  • रिकरिंग डिपॉजिटमध्ये ६.२ टक्के व्याजदराने पैसे मिळतात. याचा कार्यकाळ ५ वर्षांचा आहे.
  • आरडी योजनेमध्ये गुंतवणूक केल्याने मोठी बचत करणे शक्य होते. दर महिन्याला पगार झाल्यावर १ हजार रुपयांची गुंतवणूक केल्यावर पाच वर्षांनंतर २.९३ लाख रुपये (यातील १.१३ लाख रुपये व्याजादरामार्फत) मिळतील.

गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संपूर्ण माहिती शिवाय केलेली गुंतवणूक नुकसानदायी ठरु शकते. आर्थिक स्थिती आणि भविष्याचा विचार करुन तुम्ही या दोन्ही पर्यायांपैकी एक निवडू शकता.

IITM Pune Bharti 2024
Pune Jobs : IITM पुणे येथे नोकरीची संधी, आजच अर्ज करा, एवढा मिळणार पगार
Investment Opportunities in the Capital Goods Sector Top Companies
गुंतवणूक संधीचे क्षेत्र आणि न दिसणारे व्यवसाय: भांडवली वस्तू
toll plaza
विश्लेषण : भविष्यात टोलनाके बंद होणार? कशी असेल GPS आधारित नवी यंत्रणा?
mpsc mantra environment question analysis career
mpsc मंत्र: पर्यावरण प्रश्न विश्लेषण