म्युच्युअल फंड क्षेत्रात नव्याने प्रवेश केलेल्या बजाज फिनसर्व्ह म्युच्युअल फंडाला बाजारात नवीन सात म्युच्युअल फंड योजना आणण्यास भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने परवानगी दिली असल्याचे मंगळवारी कंपनीकडूनच सांगण्यात आले. सुरुवात करताना ओव्हरनाइट आणि मनी मार्केटसारख्या स्थिर उत्पन्न देणाऱ्या व तरल (लिक्विड) साधनांमध्ये गुंतवणूक करणारे फंड बाजारात आणले जाणार आहेत. यामध्ये लिक्विड फंड, मनी मार्केट फंड, ओव्हरनाइट फंड, आर्बिट्राज फंड, लार्ज आणि मिड-कॅप फंड, बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज फंड आणि फ्लेक्सी कॅप फंड यांचा समावेश असेल. बजाज फिनसर्व्ह म्युच्युअल फंडाच्या नवीन योजना पुढील ३० दिवसांत बाजारात गुंतवणूकदारांसाठी खुल्या होतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आमच्याशी आधीच गुंतवणुकीच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या ग्राहकांशी संबंध अधिक दृढ करत, या नवीन मालमत्ता व्यवस्थापन व्यवसायाला सुरुवात करीत आहोत, असे बजाज फिनसर्व्हचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज म्हणाले. बजाज फिनसर्व्ह म्युच्युअल फंडाची रणनीती नावीन्यपूर्णता, लाभदायक भागीदारी आणि भविष्यासाठी व्यवसायाचे तयार प्रारूप (मॉडेल) या घटकांवर आधारित असेल, असे बजाज फिनसर्व्ह ॲसेट मॅनेजमेंट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश मोहन म्हणाले.

More Stories onबजाजBajaj
मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bajaj finserv allowed to launch seven funds vrd
First published on: 06-06-2023 at 21:18 IST