एडटेक क्षेत्रातील प्रमुख कंपनी BYJU’S पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत आकाश एज्युकेशन सर्व्हिसेस लिमिटेड (Aakash Education Services Limited)चा प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) आणण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती कंपनीने सोमवारी दिली. आकाश एज्युकेशन स्पर्धा परीक्षांची तयारी करते. आकाश एज्युकेशन सर्व्हिसेस लिमिटेड (AESL) चा महसूल २०२३-२४ या आर्थिक वर्षात ४००० कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा असल्याचे बायजू यांनी एका निवेदनात म्हटले आहे. या दरम्यान, ऑपरेशनल नफा ९०० कोटी रुपये असू शकतो.
आकाशचा आयपीओ पुढील वर्षी लॉन्च होणार
Byju पुढील वर्षाच्या मध्यात त्याच्या उपकंपनी आकाश एज्युकेशन सर्व्हिसेस लिमिटेडचा IPO सादर करेल, असंही कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे. बायजूच्या बोर्डाने IPO ला अधिकृत मान्यता दिली आहे. Byju ने एप्रिल २०२१ मध्ये आकाश एज्युकेशन सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीला ९५० दशलक्ष डॉलर म्हणजेच अंदाजे ७,१०० कोटी रुपयांमध्ये विकत घेतली. आकाश एज्युकेशन सर्व्हिसेस लिमिटेडचा महसूल बायजूने मालकी हक्क विकत घेतल्यानंतर गेल्या २ वर्षांत तिप्पट झाला आहे.
देशभरातील ३२५ आकाश केंद्रांवर लाखो मुले शिक्षण घेतात
केन रिसर्चच्या मते, चाचणी-प्रीप मार्केट कमाई २०२०-२०२५ च्या तुलनेत ९.३ टक्के चक्रवृद्धी वार्षिक वाढ दराने (CAGR) वाढण्याची भविष्यवाणी करण्यात आली आहे. ऑनलाइन टेस्ट प्रीपरेशन मार्केट ४२.३ टक्के CAGR वर वाढण्याची अपेक्षा आहे. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षांसाठी तयार केलेली अत्याधुनिक डिजिटल उत्पादने आणि सेवांसह सर्वोत्कृष्ट वर्ग-आधारित शिक्षणाच्या विस्तृत श्रेणीमुळे आकाश या वाढीचा फायदा घेण्यासाठी अद्वितीय स्थानावर आहे, असंही एका निवेदनात कंपनीने म्हटले आहे. आकाशची देशभरात ३२५ हून अधिक केंद्रे कार्यरत आहेत. सद्यस्थितीत या सर्व केंद्रांवर ४,००,००० हून अधिक मुले आणि इच्छुक स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत.
मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Byju akash ipo to come next year there will be an opportunity to invest in new shares vrd