वर्ष १९२४ ला अमेरिकेत पहिला म्युच्युअल फंड सुरू झाला. या नात्याने अमेरिकेत २०२४ हे म्युच्युअल फंड उद्योगाचे शताब्दी वर्षे आहे. भारतात १९६४ ला भारतीय युनिट ट्रस्ट ही संस्था स्थापन झाली. म्हणून भारतात म्युच्युअल फंडाच्या स्थापनेला ६० वर्षे पूर्ण झाली म्हणता येईल. या ६० वर्षाच्या काळात अनेकांनी म्युच्युअल फंडाला भक्कम पायावर उभे केले. सरकारी क्षेत्राबरोबर खासगी क्षेत्रात म्युच्युअल फंड सुरू झाले. सरकारी क्षेत्रातील फंडांना सरकारी बँकांचे वलय पाठीशी होते. परंतु खासगी क्षेत्राला आपले वलय स्वत:हून निर्माण करायला लागले. मिलिंद बर्वे यांनी एचडीएफसी म्युच्युअल फंडाचा भक्कम पाया रचला. परदेशी गुंतवणूक संस्था भारतीय बाजारात शेअर्सची विक्री करायला आल्या की, बाजार कोसळायचा मग त्यावेळेस सरकारच्या मालकीच्या असलेल्या संस्था एलआयसी आणि युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया यांना अर्थमंत्र्याकडून आदेश यायचे बाजाराला ‘सांभाळून घ्या,’

एचडीएफसी लिमिटेड या कंपनीत देशी गुंतवणूकदारांपेक्षा परदेशी गुंतवणूकदार संस्थाच्या मालकीचे प्रमाण जास्त होते. देशी गुंतवणूकदारांचा सुरुवातीला घर बांधणी क्षेत्रात कर्जपुरवठा करणारी संस्था यशस्वी होईल यावर विश्वास नव्हता. परंतु सुरुवातीला एच. टी. पारेख आणि नंतर दीपक पारेख यांनी तो विश्वास निर्माण केला. एचडीएफसी लिमिटेड या कंपनीत १९८२ ला नोकरीला लागलेले मिलिंद बर्वे त्यांची मुलाखत दीपक पारेख यांनी घेतली होती. त्यांना मिलिंद बर्वे विचारायला गेले, ‘मी एचडीएफसी लिमिटेडकडून एचडीएफसी एएमसीकडे गेलो तर चालेल का ?’ यावर दीपक पारेख यांनी नुसताच होकार दिला नाही, तर बर्वे यांना असे सांगितले की, तुमच्यासाठी परतीचे दोर कापलेले नाहीत. तुम्हाला जर वाटले तर तुम्ही मूळ संस्थेकडे केव्हाही परत येऊ शकता. परंतु बर्वे यांनी नंतर केव्हाच मागे वळून बघितले नाही .

Portfolio RATHMANI METALS AND TUBES LIMITED
माझा पोर्टफोलियो : ‘पोर्टफोलिओ’ला देई पोलादी ताकद ! रत्नमणी मेटल्स अँड ट्यूब्स लिमिटेड
Horizon investment of thousand crores in Chakan
होरायझनची चाकणमध्ये हजार कोटींची गुंतवणूक
Sensex eight hundredth retreat due to concerns over US inflation protracted tariff cuts
अमेरिकेतील महागाई, लांबलेल्या दरकपातीच्या चिंतेने ‘सेन्सेक्स’ची आठ शतकी माघार
mohammed abdul arfath,
एका महिन्यापासून अमेरिकेत बेपत्ता असलेला हैदराबादचा युवक मृतावस्थेत आढळला

हेही वाचा >>>बाजाराचा तंत्र-कल : २०२४ मधील तेजीचे गृहीतक उमजून घेऊया, ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी…

आजसुद्धा म्युच्युअल फंड उद्योगात मिलिंद बर्वे यांचे सतत ३० वर्षे निष्कलंक काम केल्याचे रेकॉर्ड कोणीही मोडू शकणार नाही. परंतु याचबरोबर निवृत्त झाल्यानंतर निवृत्तीचे आयुष्यसुद्धा किती चांगल्याप्रकारे जगता येते हे मिलिंद बर्वे यांनी दाखवून दिले. म्युच्युअल फंड उद्योगात असा एक फंड स्थापन केला की, ज्या फंडाने या क्षेत्रात अतिशय चांगला नावलौकिक मिळविला.

कोण हे मिलिंद बर्वे त्यांनी असे काय काय करून दाखविले? हा विषय एका लेखाच्या चौकटीत मावणारा निश्चितच नाही. राज्यपातळीवरचा एक उत्कृष्ट बँडमिंटन खेळाडू म्हणूनसुद्धा त्यांनी नाव कमावलेले होते. सी. ए.चा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर, १९८२ ला सुरुवातीला फक्त सहा महिने बजाज ऑटो या कंपनीत त्यांनी काम केले. २६ व्या वर्षी दीपक पारेख यांनी मिलिंद बर्वे यांची मुलाखत घेतली आणि ‘उद्यापासूनच एचडीएफसी लिमिटेडमध्ये ‘रुजू व्हा’ असे सांगितले. १६ वर्षे एचडीएफसी लिमिटेडचे सर्व विभाग व्यवस्थितपणे सांभाळल्यानंतर त्यांनी हे नवे आव्हान स्वीकारले.

त्यासमयीच्या मुलाखतीतले त्यांचे वाक्य तर वर्षेनुवर्षे डोक्यात पक्के राहावे असे आहे. ते म्हणजे ‘आपला म्युच्युअल फंड आश्चर्याचा धक्का गुंतवणूकदारांना कधीच देणार नाही.’ वास्तविक पाहता एचडीएफसी लिमिटेडने ठेवी गोळा करणे, त्यावर चांगले व्याज देणे, मुदतीअखेर वेळच्या वेळी पैसे परत करणे, याबद्दलचे एवढे चांगले ट्रॅक रेकॉर्ड निर्माण केले होते की, त्या काळी फक्त युनिट ट्रस्ट, पोस्ट ऑफिसच्या योजना, सार्वजनिक भविष्यानिर्वाह निधी (पीपीएफ), नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट्स, किसान विकास पत्र यावर विश्वास ठेवणारे एचडीएफसीसाठी ठेवी गोळा करू लागले. इतर हौसिंग फायनान्स कंपन्या जास्त व्याजाचे अमिष दाखवत असतानासुद्धा एचडीएफसी लिमिटेड ही संस्था बँकेपेक्षा जास्त आणि सरकारच्या बरोबरीने आपल्या ठेव योजना विश्वासपात्र आहेत, हे दाखवून देण्यात यशस्वी झाली. सरकारची प्राप्तिकरात असलेली तत्कालीन १५ हजार रुपयांची ‘कलम ८० एल’ची सवलत एचडीएफसी लिमिटेडच्या व्याजाला देखील होती. हे म्हणूनच आज कोणाला खरे वाटणार नाही.

हेही वाचा >>>माझा पोर्टफोलियो : देश हिंडू, ‘सफारी’च्या साथीने!

ही पार्श्वभूमी असणारा एचडीएफसी म्युच्युअल फंड एकाच वेळी तीन योजना घेऊन बाजारात आला. त्यामुळे साहजिकच एचडीएफसी इन्कम फंड या कर्जरोख्यांच्या योजनेला जास्त प्रतिसाद मिळाला. परंतु मिलिंद बर्वे यांनी एचडीएफसी म्युच्युअल फंड हा इक्विटी फंड म्हणून काम करेल, असा पण केलेला होता. तो त्यांनी खरा करून दाखविला. २००३ ला झुरीच म्युच्युअल फंड एचडीएफसीने घेतला. तर २०१३ ला मॉर्गन स्टॅनलेचा व्यवसायसुद्धा एचडीएफसीने आपल्या ताब्यात घेतला. २०१० ला एक प्रकरण घडले होते. म्युच्युअल फंड उद्योगातल्या इतर स्पर्धेकांनी त्यावर एचडीएफसी म्युच्युअल फंडाची प्रतिमा मलिन करण्याचे प्रयत्न करून बघितले. परंतु ‘सत्य परेशान होता है पराजित नहीं’ या उक्तीप्रमाणे शेवटी खरे जगापुढे आले.

‘बाजारातली माणसं’ या स्तंभलेखनांत, एच. टी. पारेख आणि दीपक पारेख, प्रशांत जैन, नवनीत मुनोत या व्यक्तींवर लेख यापूर्वी आले आहेत. याच पंक्तीतील मिलिंद बर्वे यांच्यावर ठरवून उशिरा लेख दिला. याचे मुख्य कारण असे की, २०२५ ला एचडीएफसी म्युच्युअल फंड रौप्य महोत्सवी वर्षे साजरे करेल. त्यावेळेस मिलिंद बर्वे आणि त्यांच्याप्रमाणेच असे अनेक लोक आहेत, ज्यांनी एचडीएफसी म्युच्युअल फंडाचे पहिल्या दिवसापासून वितरक (डिस्ट्रिब्युटर) म्हणून काम केले आहे, अशा अनेक व्यक्तीची आठवण ठेवली जाणे समर्पक ठरेल. प्रशांत जैन यांच्या काळात एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या कामगिरीत मोठे चढ-उतार दिसून आले. परंतु तरीसुद्धा गुंतवणूकदारांना सांभाळणारे अनेक या फंड घराण्याशी एकनिष्ठ राहिले.

मिलिंद बर्वे यांनी ‘ॲम्फी’ या संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. एका सेमिनारमध्ये इतर जण अकलेचे तारे तोडत असताना – ‘म्युच्युअल फंड हा म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटरशिवाय मोठा होऊ शकत नाही. इंडेक्स फंड परदेशात यशस्वी झाले म्हणून भारतात लगेचच ते यशस्वी व्हावेत असे घडणार नाही. त्याचबरोबर उगाचच गुंतवणुकीच्या ‘डायरेक्ट’ पर्यायाचा अट्टहास नको…’ हे स्पष्टपणे सांगण्याचे धाडस फक्त आणि फक्त मिलिंद बर्वे यांच्याकडेच होते .

भारतीय भांडवल बाजार, कर्जरोख्यांची बाजारपेठ याबाबतीत मिलिंद बर्वे यांनी केलेले योगदान त्यांच्या निवृत्तीनंतर सुद्धा विसरता येणार नाही. आपल्यानंतर चांगल्या प्रकारे वारसदारांची निर्मिती करून संस्थेची वाढ आपल्या डोळ्यांनी बघणे यांचा आनंद मिलिंद बर्वे घेत आहेत. व्यक्तिगत आयुष्यात त्यांची दोन्ही मुले सध्या परदेशात स्थायिक आहेत. भारतात काही कंपन्यांच्या संचालक मंडळावर जबाबदारी निभावणे, तर प्रायव्हेट इक्विटी या संबंधात काही योग्य काम करणे एवढीच माफक चौकट त्यांनी स्वतःभोवती आखून घेतलेली आहे. एचडीएफसी लिमिटेड, एचडीएफसी बँक, एचडीएफसी एएमसी असे सर्व शेअर्स एचडीएफसीच्या कर्मचाऱ्यांना मिळालेले असल्याने आणि त्यात प्रचंड भांडवलंवृद्धी झाली असल्याने आर्थिक क्षेत्रातील सर्वात श्रीमंत कर्मचारी वर्ग कोण? या प्रश्नाचे वेगळे उत्तर देण्याची आवश्यकता नाही.

– प्रमोद पुराणिक / pramodpuranik5@gmail.com