आशीष ठाकूर

निफ्टी निर्देशांकाने मावळत्या वर्षाला निरोप उत्साहाने दिला. नवीन वर्षात वाचकांशी संवाद साधताना, इतक्या वर्षातील वाचकांच्या प्रेमाचे, आत्मीयतापूर्ण संबंधांचे खरे तर ऋणानुबंधांच्या गाठीत रूपांतर झाले आहे. या पार्श्वभूमीवर या आठवड्याच्या वाटचालीकडे वळूया.
शुक्रवारचा बंद भाव:
सेन्सेक्स: ७२,०२६.१५ / निफ्टी: २१,७१०.८०
नवीन वर्षातील निफ्टीच्या वाटचालीचा वेध घेताना, निफ्टी निर्देशांकाचा २१,८०० चा उच्चांक डोळ्यासमोर ठेवून, निफ्टीच्या भविष्यकालीन वाटचालीचे आलेखन करूया. आता चालू असलेल्या निफ्टी निर्देशांकाच्या वाटचालीत २१,५०० ते २१,८०० हा स्तर ‘महत्त्वाचा वळणबिंदू’(टर्निंग पाॅइंट) असून या स्तरावर निफ्टी निर्देशांकाची भविष्यकालीन वाटचाल अवलंबून असेल. येणाऱ्या दिवसांत निफ्टी निर्देशांकाने सातत्याने २१,५०० चा स्तर राखल्यास, निफ्टी निर्देशांकाचे प्रथम वरचे लक्ष्य हे २२,००० आणि द्वितीय लक्ष्य २२,३०० ते २२,६०० असेल. ही नाण्याची एक बाजू झाली.

Solapur, Aba Kamble murder case,
सोलापूर : खून का बदला खून; आबा कांबळे खून खटल्यात वृद्ध पैलवानासह सातजणांना जन्मठेप
Mumbai, Two arrested,
मुंबई : वृद्धाचे सोने लुटणाऱ्या दोघांना अटक
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Concerned about the security of Indians in Iranian custody
जहाजावरील कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय चिंतेत; इराणच्या ताब्यातील भारतीयांच्या सुरक्षेची चिंता

भविष्यातील निफ्टी निर्देशांकाच्या वाटचालीत २१,८०० ते २२,००० चा स्तर पार करण्यास तो वारंवार अपयशी ठरत गेल्यास, निर्देशांकाचे खालचे लक्ष्य हे अनुक्रमे २१,२०० ते २०,८०० असे असेल. सरलेल्या वर्षातील ‘तेजीची गृहीतक’ या उप-शीर्षकाखालील विवेचनांत, निर्देशांकाचे ८ वर्षांचे चक्र आणि लोकसभेच्या निवडणुकांनंतर बाजारात येतो तेजीचा बहर ही दोन्ही गृहीतके २०२४ साली एकत्र जुळून येत असल्याने, निफ्टी निर्देशांकाच्या तेजीच्या भरतीच्या लाटेची उसळी ही २४,५०० आणि मंदीच्या ओहोटीची व्याप्ती १५,८०० पर्यंत असेल काय? याचा विस्तृत आढावा या स्तंभातील पुढील लेखांच्या शृंखलेमधून घेऊ. (क्रमशः)

हेही वाचा : क.. कमॉडिटीचा : तिघांचे भांडण… मका उत्पादकांचा लाभ!

‘शिंपल्यातील मोती’ म्हणून शिफारस केलेल्या समभागांचा आढावा

ऑक्टोबर ते डिसेंबरच्या तीन महिन्यांच्या कालावधीत शिफारस केलेल्या समभागांचा विचार करता, २३ ऑक्टोबरच्या लेखात सुचवलेला ‘केएनआर कन्स्ट्रक्शन लिमिटेड’ हा समभाग २५० ते २९० रुपयांच्या परिघातच फिरत आहे. २९० रुपयांवर या समभागाचा बाजारभाव सातत्याने १५ दिवस टिकल्यास समभागाचे वरचे लक्ष्य ३२० ते ३५० रुपये असेल. १३ नोव्हेंबरच्या लेखातील ‘आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड’ या ३५ रुपयांना शिफारस केलेल्या समभागाने ४२ रुपयांचे अल्पमुदतीचे वरचे लक्ष्य १८ डिसेंबरला ४३.५० रुपयांचा उच्चांक मारत लीलया साध्य केले आणि २० टक्क्यांचा परतावा दिला. २७ नोव्हेंबरच्या लेखातील ‘नोसिल लिमिटेड’ या २३९ रुपयांना शिफारस केलेल्या समभागाचे २८० रुपये हे अल्पमुदतीचे वरचे लक्ष्य नमूद केले होते. समभागाने २ जानेवारीला २८५ रुपयांचा उच्चांक मारत वरचे लक्ष्य साध्य करत १७ टक्क्यांचा परतावा दिला. ११ डिसेंबरच्या लेखातील ‘आरती इंडस्ट्रीज लिमिटेड’ या ५७० रुपयांना शिफारस केलेल्या समभागाचे ६३० रुपये हे अल्पमुदतीचे वरचे लक्ष्य नमूद केले होते. समभागाने २९ डिसेंबरला ६६० रुपयांचा उच्चांक मारत, वरचे लक्ष्य साध्य केले आणि १० टक्क्यांचा परतावा दिला.

हेही वाचा : माझा पोर्टफोलियो : देश हिंडू, ‘सफारी’च्या साथीने!

शिंपल्यातील काही मोत्यांना तेजीचा परीसस्पर्श लाभल्याने त्या मोत्यांना सोन्यात गुंफलेल्या ‘मोत्याच्या कंठ्यांचे’ स्वरूप प्राप्त झाले आहे. जसे की वर्षभरात दुपटीहून, तिपटीहून अधिक परतावा देणारे समभाग खालीलप्रमाणे आहेत:

‘केपीआयटी टेक्नॉलॉजी’ या ६ जानेवारीला ७१६ रुपयांना शिफारस केलेल्या समभागाने २० नोव्हेंबरला १,६४० रुपयांचा उच्चांक मारत दुपटीहून अधिक परतावा दिला. २३ जानेवारीच्या लेखात ‘झेन्सार टेक्नॉलॉजी लिमिटेड’ या २१८ रुपयांना शिफारस केलेल्या समभागाने २७ डिसेंबरला ६४४ रुपयांचा उच्चांक नोंदवत २९० टक्क्यांचा परतावा दिला. १० एप्रिलच्या लेखात ४२३ रुपयांना सुचवलेल्या गोदरेज इंडस्ट्रीजने सरलेल्या सप्ताहातील शुक्रवारी, ५ जानेवारीला ८५३ रुपयांचा उच्चांक नोंदवला. २२ मेच्या लेखात पीसीबीएल १३३ रुपयांना सुचवला होता. या समभागाने ५ डिसेंबरला २८३ रुपयांचा उच्चांक नोंदवला. २६ जूनच्या लेखातील दिलीप बिल्डकॉनचा समभाग २३३ रुपयांना सुचवला होता. या समभागाने २२ नोव्हेंबरला ४३९ रुपयांचा उच्चांक नोंदवला. वरील समभागांनी दुपटीहून अधिक अथवा दुपटीच्या आसपास परतावा देत, लेखक-वाचक नात्यांमध्ये ओलावा निर्माण केला. आता थंडीच्या दिवसात ओलावा हा शब्द योग्य की उबदार नातेसंबध म्हणणे सुयोग्य ठरेल, यात जरी संभ्रम असला तरी ‘ऋणानुबंधाची वीण’ ही ‘बॉम्बे स्टॉक एक्सचेंज’च्या समभागाने घट्ट केली. २६ फेब्रुवारीच्या लेखात ४४० रुपयांना सुचवलेला हा समभाग ४ डिसेंबरला २,५९५ रुपयांचा उच्चांक नोंदवत, मोत्याच्या कंठ्यातील कंठमणी ठरला.

हेही वाचा : माझा पोर्टफोलिओ : लाभाचे वर्ष

निकालपूर्व विश्लेषण

१) इन्फोसिस लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल- गुरुवार,११ जानेवारी

५ जानेवारीचा बंद भाव- १,५३२.५५ रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर- १,५०० रु.

अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून १,५०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,५९० रुपये, द्वितीय लक्ष्य १,७०० रुपये.

ब) निराशादायक निकाल: १,५०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १,४०० रुपयांपर्यंत घसरण.

२) टीसीएस लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल- गुरुवार, ११जानेवारी
५ जानेवारीचा बंद भाव- ३,७३७.९० रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: ३,६५० रु.
अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून ३,६५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ३,८३० रुपये, द्वितीय लक्ष्य ४,०५० रुपये.
ब) निराशादायक निकाल: ३,६५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ३,५५० रुपयांपर्यंत घसरण

हेही वाचा : बाजारातली माणसं : टाटांचा ‘चंद्रा’वतार! नटराजन चंद्रशेखरन

३) आनंद राठी वेल्थ लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल- शुक्रवार, १२ जानेवारी

५ जानेवारीचा बंद भाव- २,७००.७५ रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर- २,५०० रु.

अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून २,५०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ३,००० रुपये, द्वितीय लक्ष्य ३,३०० रुपये.

ब) निराशादायक निकाल : २,५०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत २,२०० रुपयांपर्यंत घसरण.

४) आयसीआयसीआय बँक

तिमाही वित्तीय निकाल- शनिवार, २० जानेवारी
५ जानेवारीचा बंद भाव- ९९३.७० रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: ९७५ रु.
अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून ९७५ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,०५० रुपये, द्वितीय लक्ष्य १,१०० रुपये.
ब) निराशादायक निकाल: ९७५ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ९२० रुपयांपर्यंत घसरण

हेही वाचा : बाजाररंग : नववर्षाची गुंतवणूक नांदी

५) पर्सिस्टंट सिस्टीम लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल- शनिवार, २० जानेवारी

५ जानेवारीचा बंद भाव- ७,३५०.७५ रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: ७,१५० रु.

अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून ७,१५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ७,५५० रुपये, द्वितीय लक्ष्य ८,१०० रुपये

ब) निराशादायक निकाल: ७,१५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ६,९५० रुपयांपर्यंत घसरण

आशीष ठाकूर

लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती: शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित लक्ष्य या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.