गुंतवणुकीबाबत पारंपरिक धारणा जर थेट समभागांमध्ये गुंतवणूक करण्याचे धाडस करण्यापासून रोखत असेल आणि समभाग संलग्न म्युच्युअल फंडाप्रमाणे परताव्यातील चढ-उतारही नकोत, अशा नेमस्त गुंतवणूकदारांना आणि रोखेसंलग्न फंडापेक्षा सरस लाभ देणारे इक्विटी सेव्हिंग्ज फंड हा एक चांगला पर्याय सुचविण्यात आला आहे.
हा एक प्रकारचा हायब्रिड फंड आहे, ज्याच्या पोर्टफोलिओमध्ये समभाग, रोखे आणि आर्बिट्राजमध्ये गुंतवणुकीची संधी दिली जाते. नियमांनुसार इक्विटी सेव्हिंग्ज योजनेत समभाग आणि समभागांशी संबंधित किमान ६५ टक्के गुंतवणूक केली पाहिजे तर रोखेसंलग्न गुंतवणूक किमान १० टक्के राखणे बंधनकारक आहे. फंडातून होणाऱ्या गुंतवणुकीचे स्वरूप पाहता रिलायबल इन्व्हेस्टमेंटचे परेश सुकथनकर यांच्या मते, आक्रमक हायब्रीड फंड श्रेणींच्या तुलनेत घसरणीची जोखीम अल्पतम राखण्यासाठी इक्विटी सेव्हिंग्ज फंडांची कामगिरी अधिक उजवी आहे. विशेषतः आयसीआयसीआय प्रुडेन्शियल इक्विटी सेव्हिंग्ज फंडाने बँक मुदत ठेवींसारखा पारंपरिक मार्ग आणि सामान्य रोखेसंलग्न फंडांच्या तुलनेत जास्त परतावा निर्माण करण्याची क्षमता आहे, असे सांगितले. शिवाय हा परतावा मिळविताना कर देखील वाचविला जाईल, असे सुकथनकर म्हणाले.



