मुंबई : अमेरिकेतील वाढती महागाई व त्या परिणामी तेथे लांबलेली संभाव्य व्याजदर कपात, तर दुसरीकडे देशांतर्गत निर्देशांक विक्रमी उच्चांकी पातळीवर पोहोचल्यानंतर गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेत केलेली नफावसुली याचे शुक्रवारी भांडवली बाजारावर प्रतिकूल पडसाद उमटले.

सत्रारंभच नरमाईने करणारा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ७९३.२५ अंशांनी म्हणजेच १.०६ टक्क्यांनी घसरून ७४,२४४.९० पातळीवर दिवसअखेर स्थिरावला. सेन्सेक्समधील आघाडीच्या २७ कंपन्यांचे समभाग नकारात्मक पातळीवर बंद झाले. दिवसभरात निर्देशांकाने ८४८.८४ गमावत ७४,१८९.३१ या सत्रातील नीचांकी पातळीही दाखवली होती. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये २३४.४० अंशांची घसरण झाली आणि तो २२,५१९.४० पातळीवर बंद झाला.

What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
ABP Sea voters Survey
Opinion Poll : महाराष्ट्रात महायुतीला मिळणार ४८ पैकी अवघ्या ‘इतक्या’ जागा? कुठल्या जागेवर कुणाची आघाडी?
DD news anchor faints during live news reading
Heatwave : उष्माघाताची बातमी देताना दूरदर्शनची अँकर स्टुडिओतच कोसळली, VIDEO व्हायरल

हेही वाचा >>>Gold-Silver Price on 12 April 2024: सोने-चांदी महागले, १० ग्रॅम सोन्यासाठी मोजावे लागतायेत ‘एवढे’ पैसे

अमेरिकेतील महागाई दर अपेक्षेपेक्षा जास्त राहिला आणि त्यात मासिक आधारावर ०.४ टक्के वाढ झाली. परिणामी अमेरिकी रोख्यांच्या उत्पनात वाढ झाली आहे. शिवाय चालू वर्षात फेडरल रिझर्व्हच्या अपेक्षित तीन दर कपातीच्या शक्यतांबाबतही गुंतवणूकदारांकडून आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान युरोपीय मध्यवर्ती बँकेने व्याजदर कायम राखले असून आगामी जूनमधील बैठकीत संभाव्य दरकपातीचे संकेत दिले. केवळ अमेरिकेच्या विलंबित दर कपातीच्या चिंतेमुळे आणि आखातातील वाढलेल्या तणावामुळे तेलाच्या किमती पुन्हा कडाडल्या आहेत. त्यामुळे देशांतर्गत भांडवली बाजारात निराशेचे वातावरण राहिले, असे मत जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.

सेन्सेक्समध्ये सन फार्मा, मारुती, पॉवर ग्रिड, टायटन, जेएसडब्ल्यू स्टील, टेक महिंद्र, लार्सन अँड टुब्रो आणि स्टेट बँकेच्या समभागात घसरण झाली. टाटा मोटर्स, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि नेस्ले यांचे समभाग मात्र वधारले.

हेही वाचा >>>Gold-Silver Price on 11 April 2024: लग्नसराईत सोन्याला झळाळी, तर चांदीही चमकली, जाणून घ्या आजचा भाव

बाजार भांडवल ४०० लाख कोटी रुपयांखाली

शुक्रवारच्या सत्रातील पडझडीने मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजारभांडवल पुन्हा एकदा ४०० लाख कोटी रुपयांच्या खाली घसरले. गुंतवणूकदारांच्या संपत्तीत शुक्रवारच्या सत्रात २.५२ लाख कोटी रुपयांची घट झाली. अर्थात मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजारभांडवल २.५२ लाख कोटी रुपयांनी घसरून ३९९.६७ लाख कोटींपर्यत घसरले आहे.

सेन्सेक्स ७४,२४४.९० -७९३.२५ (-१.०६%)

निफ्टी २२,५१९.४० -२३४.४० (-१.०३%)

डॉलर ८३.४४ १३

तेल ९०.५६ ०.९५%