Share Market Updates Today:: आज सोमवारी (२१ एप्रिल) आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली आहे. आज सकाळी बाजार सुरु झाला तेव्हा शेअर बाजाराने जोरदार उसळी घेतल्याचं पाहायला मिळालं आहे. निफ्टीने २४,००० अंकांचा टप्पा ओलांडला आहे. तसेच सेन्सेक्सने ७९,००० चा टप्पा पार केला आहे. ६ जानेवारी २०२५ नंतर निफ्टीने पहिल्यांदाच २४,००० अंकांचा ओलांडला आहे. त्यामुळे शेअर बाजारात आठवड्याची सुरुवात तेजीत पाहायला मिळाली आहे.
सुरुवातीच्या व्यवहारात बीएसईच्या ३० शेअर्सचा सेन्सेक्स ५९९.६६ अंकांनी वाढून ७९,१५२.८६ वर पोहोचला, तर एनएसईचा निफ्टी १५२.५५ अंकांनी वाढून २४,००४.२० वर पोहोचला. सेन्सेक्समधील कंपन्यांपैकी टेक महिंद्रा, अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इंडसइंड बँक हे सर्वात जास्त वधारल्याचं पाहायला मिळालं. तसेच अदानी पोर्ट्स, आयटीसी, भारती एअरटेल, टायटन, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि सन फार्मा हे घसरणीच्या यादीत होते. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
एचडीएफसी बँकेच्या एकत्रित निव्वळ नफ्यात मार्चच्या तिमाहीत ७ टक्के वाढ होऊन १८,८३५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. एचडीएफसीच्या शेअर्समध्ये १ टक्क्यांहून अधिक वाढ झाली, तर आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्समध्ये जवळपास १ टक्क्यांची वाढ झाली. तसेच इन्फोसिसने मार्च तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात ११.७ टक्क्यांनी घट होऊन ७,०३३ कोटी रुपये झाल्याचे वृत्तानंतरही कंपनीच्या शेअर्समध्ये फक्त १ टक्क्यांहून अधिक वाढ झाली.
दरम्यान, जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे व्हीके विजयकुमार यांनी म्हटलं की, “एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेच्या चौथ्या तिमाहीतील बँक निफ्टीला आतापर्यंतच्या उच्चांकावर नेण्याची क्षमता आहे.” तर एक्सचेंज डेटानुसार, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) गुरुवारी ४,६६७.९४ कोटी रुपयांच्या इक्विटी खरेदी केल्या. तसेच आशियाई बाजारपेठांमध्ये शांघाय एसएसई कंपोझिट निर्देशांक सकारात्मक क्षेत्रात व्यवहार करत होता तर दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक आणि टोकियोचा निक्केई २२५ कमी व्यवहार करत होता.
दरम्यान, आज सकाळी बाजार सुरु झाला तेव्हाच भारतीय शेअर बाजाराने जोरदार उसळी घेतल्याचं पाहायला मिळालं. आज बाजार सुरु होताच गुंतवणूकदारांनी मोठा नफा कमावला. तसेचसेन्सेक्समधील कंपन्यांपैकी टेक महिंद्रा, अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इंडसइंड बँक चे शेअर्श सर्वात जास्त वधारल्याचं पाहायला मिळालं.