मुंबई :  जागतिक बाजारातील कमकुवत संकेत आणि सलग आठ सत्रांतील तेजींनंतर गुंतवणूकदारांनी नफावसुलीला प्राधान्य दिल्याने सप्ताहअखेर भांडवली बाजारातील प्रमुख सेन्सेक्सला चार शतकी झळ पोहचत तो शुक्रवारच्या सत्रात पुन्हा ६३ हजार पातळीखाली आला. गुरुवारच्या सत्रात दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी ऐतिहासिक उच्चांकी पातळीला स्पर्श केला होता. गेल्या आठ सत्रांत सेन्सेक्सने सुमारे २,१३९.३५ अंशांची म्हणजेच ३.४९ टक्क्यांची कमाई केली.

शुक्रवारी दिवसअखेर सेन्सेक्समध्ये ४१५.६९ अंशांची घसरण होऊन तो ६२,८६८.५० पातळीवर बंद झाला. दिवसभरात सेन्सेक्सने ६०४.५६ अंश गमावत ६२,६७९.६३ या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला आणि सरतेशेवटी ६३ हजार पातळीखाली बंद झाला. दुसरीकडे निफ्टीमध्ये ११६.४० अंशांची घसरण झाली आणि तो १८,६९६.१० पातळीवर स्थिरावला.

जागतिक पातळीवर इतर देशांच्या भांडवली बाजारात पडझड झाल्याचे त्याचे पडसाद देशांतर्गत भांडवली बाजारावर उमटले. गुंतवणूकदारांनी निर्देशांकात सर्वाधिक वजन राखणाऱ्या कंपन्यांच्या समभागांमध्ये चौफेर विक्रीचा मारा केल्याने प्रमुख निर्देशांकात झळ पोहचली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच वाहन विक्री क्षेत्रातील आकडेवारी अपेक्षेपेक्षा कमकुवत आल्याने वाहन निर्माता कंपन्यांच्या समभागात घसरण झाली. कंपन्यांची विशेषत: निर्यातीच्या आघाडीवर कामगिरी असमाधानकारक राहिली, असे निरीक्षण विनोद नायर यांनी नोंदवले.