Jyoti CNC Automation IPO: ज्योती सीएनसी ऑटोमेशन या कंपनीचा आयपीओ २०२४ मध्ये आयपीओ मार्केटमध्ये प्रवेश करणार आहे, त्याला गुंतवणूकदारांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला आहे. गुंतवणूकदारांच्या सर्व श्रेणींकडून मिळालेल्या भक्कम पाठिंब्यामुळे अर्जाच्या शेवटच्या दिवशी IPO ३८.४३ पट प्रतिसाद मिळाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

BSE डेटानुसार, ज्योती CNC ऑटोमेशनचा १ हजार कोटी रुपयांचा IPO ३८ पेक्षा जास्त वेळा बोली मिळाल्या आहेत. कंपनीने IPO मध्ये १,७५,३९,६८१ शेअर्स ऑफर केले होते आणि एकूण ६७,५८,०८,२०० शेअर्ससाठी अर्ज प्राप्त झाले होते. संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी ९४,७६,१९० शेअर्स राखीव ठेवण्यात आले असून, एकूण ४१,८२,०१,६५० शेअर्ससाठी अर्ज प्राप्त झाले आहेत. या श्रेणीत ४४.१४ वेळा बोली मिळाल्या आहेत. गैर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी ४७,३८,०९५ समभागांसाठी अर्ज प्राप्त झालेत, परंतु १७,२८,५०,२२० समभागांसाठी ३६.४८ पट अधिक अर्ज प्राप्त झाले. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ३१,५८,७३० शेअर्स राखीव ठेवण्यात आले असून, ८,२६,७७,३३० शेअर्ससाठी अर्ज प्राप्त झाले आहेत. किरकोळ गुंतवणूकदारांच्या कोट्याला २६.१७ पट बोली मिळाल्या आहेत. तर कर्मचाऱ्यांचा राखीव कोटा १२.४७ पट बोली मिळाल्या आहेच.

हेही वाचाः अयोध्येतील राम मंदिरात आता ट्रेनने मोफत जाता येणार, ‘या’ राज्यातील भाजप सरकारचा मोठा निर्णय

ज्योती CNC ऑटोमेशनने IPO द्वारे १ हजार कोटी रुपये उभे केले आहेत. कंपनीने प्रति शेअर ३१५ ते ३३१ रुपये किमतीचा पट्टा निश्चित केला आहे. IPO ९ जानेवारी रोजी अर्जांसाठी खुला होता आणि ११ जानेवारी २०२४ ही IPO साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. तसेच १६ जानेवारीला तो शेअर बाजारात सूचिबद्ध होणार असल्याचं सांगितलं जात आहे. ज्योती CNC ऑटोमेशनने सोमवारी गुंतवणूकदारांकडून ४४८ कोटी रुपये उभारले होते. IPO मध्ये नवीन शेअर्स जारी करून पैसे उभे केले आहेत. IPO मध्ये मिळालेले पैसे कंपनी कर्जाची परतफेड करण्यासाठी खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि कंपनीच्या कामकाजावर खर्च करण्यात येणार आहेत.

हेही वाचाः अंबानी-अदाणींकडून मोदींना दोन लाख कोटींच्या गुंतवणुकीचे वचन; ‘मारुती सुझुकी’ ३५ हजार कोटींची गुंतवणूक करणार

ज्योती सीएनसी ऑटोमेशन ही संगणक संख्यात्मक नियंत्रण (कॉम्युटर न्यूमेरिकल कंट्रोल – सीएनसी) मशीनची एक आघाडीची उत्पादक आहे. तिच्या ग्राहकांमध्ये इस्रो, ब्रह्मोस एरोस्पेस तिरुवनंतपुरम लिमिटेड, तुर्की एरोस्पेस, एमबीडीए, युनिपार्ट्स इंडिया, टाटा ऍडव्हान्स सिस्टीम, टाटा सिकोर्स्की एरोस्पेस, भारत फोर्ज, कल्याणी टेक्नोफोर्ज आणि बॉश या आघाडीच्या कंपन्यांचा समावेश आहे. सप्टेंबर २०२३ अखेर, कंपनीच्या उत्पादनांसाठी ३,३१५ कोटी रुपयांच्या मागणी नोंदवण्यात आली आहे. १६ जानेवारीला तो लिस्टिंग होण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Strong response to jyoti cnc automation ipo 38 43 times bid likely to list on 16 january date vrd
First published on: 12-01-2024 at 12:20 IST