जगातील सर्वात श्रीमंत म्हणजे सर्वाधिक बाजारभांडवल असलेल्या न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजची सुरुवात १७ मे १७९२ रोजी एका कराराने झाली. यात सुरुवातीला २४ दलाल सामील होते आणि त्यांच्या करारानुसार ग्राहकाला किती ‘कमिशन’ लागू करावे आणि एका दलालाने समभागाची खरेदी-विक्री नोंदवली तर दुसऱ्या दलालाला ती काहीही करून पूर्ण करावीच लागेल असे लिहिले होते. या कराराला बॅटनवूड करार असे म्हटले जाते. सुरुवातीला ते सरकारी कंपन्यांचे समभाग खरेदी विक्री करत असत ज्याची व्याप्ती १८१७ नंतर वाढवण्यात आली. या करारामध्ये असणाऱ्यांनी आपले नाव ‘न्यूयॉर्क स्टॉक आणि एक्स्चेंज बोर्ड’ असे ठेवण्यात आले. वर्ष १८६४ मध्ये ओपन बोर्ड ऑफ स्टॉक ब्रोकर्स असा एक नवीन शेअर बाजार उभा राहिला आणि न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजसमोर प्रतिस्पर्धी निर्माण झाला. वर्ष १८६९ मध्ये या नवीन बाजारमंचाचे (स्टॉक एक्स्चेंज) विलीनीकरण करण्यात आले. यामुळे न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजला एक नवीन दिशा आणि चांगले ग्राहकसुद्धा मिळाले. याच सुमारास सुरू असलेल्या यादवी युद्धामुळे सट्टा लावणाऱ्यांचे प्रमाण वाढू लागले आणि न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजने आपली सदस्य संख्या मर्यादित केली.

जशी बाजारात नवीन माहिती मोठ्या प्रमाणात येऊ लागली, तेव्हा भीतीमुळे बाजार कोसळण्याचे प्रमाण वाढू लागले. तेव्हा सरकारच्या हस्तक्षेपाची गरज वाटू लागली होती, जी अधोरेखित झाली १९२९-३० च्या जागतिक महामंदीमुळे. अमेरिकी सरकारने मग ‘सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशन’ या भांडवली बाजार नियामकाची स्थापना केली. आपल्या देशात ‘सेबी’ भांडवली बाजार नियामक म्हणून कार्यरत आहे. पुढे जाऊन न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजमध्ये अर्चिपिलॅगो आणि यूरोनेक्स्ट हे विलीनीकरण होऊन बाजार आणखी मोठा झाला. आज जगातील सर्वात महागडा समभाग न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजमध्ये सूचिबद्ध आहे. तो म्हणजे बर्कशायर हॅथवेचा समभाग. या समभागांची किंमत ५ लाख ३९ हजार आहे. ही किंमत रुपयात नसून डॉलरमध्ये आहे. जर बर्कशायर हॅथवेच्या एका समभागाची किंमत रुपयात सांगायची झाल्यास सुमारे साडेचार कोटी रुपयांचा एक समभाग आहे. यावरूनच न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजचे जगात किती महत्त्व आहे हे लक्षात आले असेल. भारतीय भांडवली बाजारात एमआरएफचा समभाग सर्वात महाग आहे. त्याची किंमत सध्या १ लाख १७ हजार रुपयांच्या घरात आहे.

Nagpur, Jyoti Amge, World's Shortest Woman, World's Shortest Woman voting, World's Shortest Woman in nagpur, lok sabha 2024, polling day, nagpur news, guinness book
जगातील सर्वात कमी उंचीच्या महिलेचे नागपुरात मतदान
Air India Air Transport Services Limited jobs 2024
AIATSL recruitment 2024 : एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसेसमध्ये मोठी भरती; पाहा नोकरीची माहिती….
8 point 85 percent interest rate on fixed deposits by Bajaj Finance
बजाज फायनान्सतर्फे मुदत ठेवींवर ८.८५ टक्के व्याजदर
Essel Propack Limited Attractive durable quality in packaging
वेष्टनांतील आकर्षक, टिकाऊ गुणवत्ता

हेही वाचा – ‘कितीदा नव्याने तुला आठवावे!’

हेही वाचा – बाजारातील माणसं : सुनील सुब्रमणियम… म्युच्युअल फंड उद्योगाची मुलुखमैदान तोफ

वर्ष १९१४ मध्ये पहिल्या महायुद्धाच्या सुरुवातीनंतर अनेक महिने शेअर बाजार बंद होता. शिवाय वर्ष २००१ च्या ९/११ हल्ल्यानंतरदेखील बाजार ४ दिवस बंद होता. कारण हल्ला झालेले वर्ल्ड ट्रेड सेंटर हे अवघ्या २ मिनिटांच्या अंतरावर होते. वर्ष २०१८ मध्ये स्टेसी कनिंगहॅम या बाजार मंचाच्या पहिल्या महिला अध्यक्षा होत्या, ज्यांनी ५ वर्षे कामकाज पहिले. न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजची वास्तू १९०३ पासून ज्या ठिकाणी उभी आहे त्या भागाला ‘वॉल स्ट्रीट’ म्हणून ओळखले जाते. या वॉल स्ट्रीटचे जगभरातील गुंतवणूकदारांना कमालीचे आकर्षण आहे.

ashishpthatte@gmail.com