सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँकेने थकीत कर्ज खात्यांमधून २०१७-१८ ते २०२२-२३ या सहा वर्षांत एकूण २,२९,६५७ कोटी रुपयांची कर्जे निर्लेखित (राइट-ऑफ) केली. मात्र त्यापैकी बँकेला २०.९५ टक्के म्हणजे केवळ ४८,१०४ कोटी रुपयांची बुडीत कर्जेच सहा वर्षांत वसूल करता आली, अशी माहिती स्टेट बँकेने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या वार्षिक अहवालातून पुढे आली आहे.
स्टेट बँकेने चालू वर्षातदेखील सुमारे २४,०६१ कोटी रुपयांची कर्जे निर्लेखित केली आहेत, आधीच्या पाच वर्षांत २,०५,६१४ कोटी रुपयांची थकीत कर्जे निर्लेखित केली गेली आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी २०२१-२२ पर्यंत पाच वर्षांच्या कालावधीत निर्लेखित केलेल्या कर्जाचे एकूण प्रमाण हे १०,०९,५१० कोटी रुपयांच्या घरात जाणारे असल्याचे माहिती अधिकारात विचारल्या गेलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल रिझर्व्ह बँकेनेच सांगितले. मात्र सर्वच सरकारी बँकांमध्ये निर्लेखित केल्या गेलेल्या कर्जाच्या वसुलीचे प्रमाण खूपच त्रोटक राहिले आहे.
मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.