मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत १ जुलै २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत महागाईचा दर ४ टक्क्यांनी वाढून ४२ टक्क्यांवरून ४६ टक्क्यांवर केला गेला आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा ४७ लाख कर्मचारी आणि ६८ लाख पेन्शनधारकांना होणार आहे. जर एखाद्या केंद्रीय कर्मचाऱ्याचा पगार ५० हजार रुपये किंवा १ लाख रुपये किंवा २ लाख रुपये असेल तर त्याला मोदी सरकारच्या निर्णयाचा फायदा कसा होणार आहे हे जाणून घेणार आहोत.

तुम्हाला किती फायदा होईल ते समजून घ्या?

समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा सध्याचा पगार सुमारे ५० हजार रुपये आहे. ज्यामध्ये त्यांना सध्या ४२ टक्के महागाई भत्ता पकडल्यास दरमहा २१ हजार रुपये डीए मिळत आहे. परंतु आता महागाई भत्ता ४६ टक्क्यांपर्यंत वाढल्यानंतर दरमहा २३ हजार रुपये महागाई भत्ता मिळेल. म्हणजेच आता तुम्हाला दरमहा ५२ हजार रुपये पगार मिळणार आहे. याचा अर्थ तुम्हाला वार्षिक आधारावर २४ हजार रुपये वार्षिक नफा मिळेल.

हेही वाचाः Nokia Layoffs : दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज कंपनी नोकिया आता करणार नोकर कपात, १४ हजार कर्मचाऱ्यांचा रोजगार जाणार

जर एखाद्या कर्मचाऱ्याला दरमहा एक लाख रुपये पगार मिळतो, तर सध्या ४२ हजार रुपये ४२ टक्के महागाई भत्ता म्हणून उपलब्ध आहे. मात्र ४६ टक्क्यांनुसार महागाई भत्ता ४६ हजार रुपये होईल. म्हणजेच तुम्हाला दर महिन्याला ४ हजार रुपये अधिक पगार मिळेल. म्हणजेच आता तुम्हाला १.०४ लाख रुपये पगार मिळणार आहे. कर्मचाऱ्यांना वार्षिक आधारावर ४८ हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. एका कर्मचाऱ्याला दरमहा दोन लाख रुपये पगार मिळतो. यात ४२ टक्के महागाई भत्ता जोडल्यास ८४ हजार रुपये महागाई भत्ता मिळेल. मात्र डीएमध्ये ४ टक्के वाढ झाल्यानंतर ९२ हजार रुपयांचा महागाई भत्ता मिळणार आहे. म्हणजेच तुम्हाला दरमहा ८ हजार रुपये अतिरिक्त पगार मिळेल. आता तुम्हाला दरमहा २.०८ लाख रुपये पगार मिळणार आहे.

हेही वाचाः गौतम अदाणी सिमेंट व्यवसायात आणखी एक धमाका करण्याच्या तयारीत, आता ‘या’ कंपनीला विकत घेण्याचा करार होण्याची शक्यता

तुम्हाला किती थकबाकी मिळेल?

महागाई भत्त्यात वाढ १ जुलैपासून लागू होणार आहे. अशा स्थितीत कर्मचाऱ्यांना गेल्या तीन महिन्यांची थकबाकी मिळणार आहे. एखाद्या कर्मचाऱ्याला ५० हजार रुपये पगार मिळाल्यास त्याला ६ हजार रुपये थकबाकी, १ लाख रुपये पगार असणाऱ्यांना १२ हजार रुपये थकबाकी म्हणून मिळेल. तर महिन्याला २ लाख रुपये पगार घेणाऱ्यांना २४ हजार रुपये अतिरिक्त थकबाकी मिळेल.

पेन्शनधारकांना मोठा फायदा

सरकारी पेन्शनधारकांसाठी महागाई सवलत ४२ टक्क्यांवरून ४६ टक्के करण्यात आली आहे. या निर्णयामुळे ६८ लाख पेन्शनधारकांना फायदा होणार आहे. समजा पेन्शनधारकाला २० हजार रुपये पेन्शन मिळते, तर ८४०० रुपये महागाई दिलासा म्हणून दिले जातात. आता महागाई सवलत ४६ टक्क्यांपर्यंत वाढवल्यानंतर ९२०० रुपयांची महागाई सवलत मिळणार आहे. म्हणजेच दरमहा मिळणाऱ्या पेन्शनमध्ये ८०० रुपयांची वाढ होणार असून, पेन्शन २०,८०० रुपये होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जर एखाद्या पेन्शनधारकाला दरमहा ५० हजार रुपये पेन्शन मिळत असेल, तर त्याला २१ हजार रुपये महागाई भत्ता मिळतो. मात्र महागाई सवलत ४६ टक्क्यांपर्यंत वाढल्यानंतर आता महागाई भत्ता २३००० रुपये होणार आहे. म्हणजेच २००० रुपयांचा अतिरिक्त फायदा होईल आणि आता तुम्हाला ५२००० रुपये पेन्शन मिळेल. जर आपण सरकारी कर्मचाऱ्याला १ लाख रुपये पेन्शन मिळवून देणारे फायदे बघितले, तर सध्या त्याला पहिले ४२ टक्के महागाई भत्ता म्हणून ४२ हजार रुपये मिळतात. मात्र ४६ टक्के महागाई भत्त्यानंतर महागाई भत्ता ४६ हजार रुपये होईल. तुम्हाला दर महिन्याला ४ हजार रुपये अधिक पेन्शन मिळेल. म्हणजेच आता दरमहा १.०४ लाख रुपये पेन्शन येणार आहे.