बहुतेक गुंतवणूकदार एखाद्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना केवळ त्याचा भूतकाळातील परतावा पाहतात. अनेक संकेतस्थळांवर देखील असे चार्ट आणि वार्षिक चक्रवाढीचा दर (सीएजीआर) अगदी ठळकपणे दाखवतात आणि अशा वागणुकीला एकप्रकारे वैधता देतात. पण या क्षेत्रातील तज्ज्ञ आपल्याला नेहमीच सांगतात की, फक्त भूतकाळातील कामगिरीवर विसंबून राहणे धोकादायक आहे. तो भविष्यातील परताव्याचा निकष असू शकत नाही. म्हणूनच भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने फंडाच्या जाहिरातींमध्ये भूतकाळातील कामगिरी भविष्यात टिकून राहीलच असे नाही हे प्रगटन (डिस्क्लेमर) देण्याची सक्ती केली आहे.पण मग प्रश्न असा की, मागच्या कामगिरीचा आरसा न पाहता फंडाची कामगिरी कशी तपासायची?

तर चला, त्यासाठी खालील गोष्टींचा विचार करुया:

१. फंडाचे गुंतवणूक धोरण आणि गुंतवणुकीची चौकट जाणून घ्या

प्रत्येक म्युच्युअल फंडाचे एक ठरावीक गुंतवणूक धोरण आणि उद्दिष्ट असते. फंडाबद्दल अधिकृत माहिती समजण्यासाठी माहिती पुस्तक अर्थात स्कीम इन्फर्मेशन डॉक्युमेंट (सीड) पासून करा आणि त्यात पुढील गोष्टी तपासा.

हा फंड लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप आहे की मल्टीकॅप आहे? हा व्हॅल्यू फंड आहे की ग्रोथ फंड आहे की दोन्ही शैलींचा वापरा करणारा फंड आहे. फंड सक्रिय व्यवस्थापित आहे की निष्क्रिय व्यवस्थापित असून एखाद्या निर्देशांकाचा मागोवा घेणारा फंड आहे.

“इंडेक्स हगिंग” करणारे फंड – म्हणजेच, सक्रिय फंड असूनही निर्देशांकांचे प्रतिबिंबित फंड असतात. असे फंड निर्देशांकाच्या तुलनेत नकारात्मक कामगिरी टाळण्याचे चांगले काम करू शकतात परंतु बहुतेकदा मर्यादित अल्फा निर्मिती करतात. पोर्टफोलिओ त्याच्या मानदंडाहून किती वेगळा आहे ते सक्रियपणे तपासणे आवश्यक असते. खरोखर सक्रिय फंडाने कंपन्यांची निवड स्वतंत्रपणे करावी आणि किरकोळ फरकांसह निर्देशांक प्रतिबिंब नसावे. ‘सीड’वर अवलंबून राहू नका. अनेक म्युच्युअल फंड त्यांना मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचे स्वातंत्र्य मिळावे यासाठी सर्वच बाबींचा समावेश करून खूप मोठा दस्तऐवज बनवतात. हा दस्तऐवज बारकाईने वाचा

२. म्युच्युअल फंडाच्या मुख्य गुंतवणूक अधिकाऱ्याचा अनुभव आणि गुंतवणूक विषयक तत्त्वज्ञान जाणून घ्या.सर्व मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या (एएमसी) सारख्या नसतात. काहींचा वाढीच्या गुंतवणुकीत सिद्ध ट्रॅक रेकॉर्ड असतो, तर काहींचा बचावात्मक इंडेक्स-हगिंग, मूल्य धोरणे किंवा क्वांट-आधारित (संख्यात्मक संकेतांवर आधारित) उत्कृष्ट कामगिरी असते. म्युच्युअल फंडातील तज्ज्ञांच्या चर्चा करा. कधीकधी जेव्हा एखादा वलयांकित मुख्य गुंतवणूक अधिकारी रणनीतीत बदल करण्याच्या उद्देशाने दाखल होतो तेव्हा हे असे दिसते. हा म्युच्युअल फंड सातत्याने एकाच परिभाषित गुंतवणूक तत्त्वज्ञानाचे पालन करतो का? अलीकडेच मुख्य गुंतवणूक अधिकारी म्हणून नवीन कोणी आले आहे का? फंड व्यवस्थापकांना वारंवार बदलले जात आहे का? हे जाणून घेणे आवश्यक आहे. म्युच्युअल फंड बाजाराच्या बदलता कल लक्षात घेऊन गुंतवणूक शैली बदलते का, किंवा फंडाची कामगिरी घसरल्यावरसुद्धा त्यांचा निवडलेल्या रणनीतीवर ठाम विश्वास ठेवतात ? शिस्तबद्ध अंमलबजावणी आणि शैलीतील सातत्य यासाठी ओळखले जाणारे फंड घराणे, सामान्यतः अधिक विश्वासार्ह दीर्घकालीन परिणाम देते.

३. निधी व्यवस्थापकाच्या लौकिकावर विसंबून न राहता, गुणवत्ता तपासा, या मूल्यांकनात परतावा मर्यादेबाहेर असू शकतो, परंतु निधी व्यवस्थापकाची गुणवत्ता नाही.

व्यवस्थापक किती काळ प्रमुखपदावर आहे? सुसंगतता: त्यांच्याकडे स्पष्ट, सिद्ध गुंतवणूक प्रक्रिया आहे का?

फंड टर्नओव्हर रेशो: हे मोजते की फंड किती वेळा त्याचा पोर्टफोलिओ बदलतो. उच्च टर्नओव्हर रेशो आक्रमक धोरण किंवा प्रतिक्रियात्मक निर्णय घेण्याचे संकेत देऊ शकतो, ज्यामुळे खर्च आणि जोखीम वाढू शकते. कमी उलाढाल दृढनिश्चय आणि स्थिरता दर्शवते, परंतु बदलांना प्रतिकारदेखील दर्शवू शकते.स्थिर हात आणि सिद्ध गुंतवणूक प्रक्रिया असलेला व्यवस्थापक विविध बाजार परिस्थितीत चांगले काम करण्याची शक्यता जास्त असते.

४. पोर्टफोलिओ तयार करणे आणि वेगळेपण अभ्यासाफंडाच्या पोर्टफोलिओमध्येच फंडाच्या क्षमतेचे संकेत असतात. आघाडीच्या गुंतवणुका आणि विविध उद्योग क्षेत्रात मालमत्तेची विभागणी ते जास्त केंद्रित आणि उच्च-विश्वास आहे की प्रभाव अती वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ आहे?

– टॉप होल्डिंग्ज आणि सेक्टर अलोकेशन: जास्त केंद्रित आणि उच्च-विश्वासदर्शक आहे की अती-वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ आहे?

– मार्केट कॅप एक्स्पोजर: सर्व बाजार भांडवली कंपन्यांना प्रतिनिधित्व दिले आहे का? आणि ते तुमच्या जोखीम सहनशीलता/प्राधान्याला साजेसे आहे का?

पोर्टफोलिओचे वेगळेपण: फंड मानदंडा बाहेरील किती कंपन्यांना प्रतिनिधित्व देतो की फक्त निर्देशांकाचे प्रतिबिंब आहे? कंपन्यांच्या निवडीतून निधी व्यवस्थापकाचे (फंड मॅनेजर) आत्मभान आणि ठाम मत लक्षात येतं.

५. वार्षिक परताव्यापेक्षा जोखीम -समायोजित मेट्रिक्स वापरातुम्ही मागील परतावे वगळू शकता, परंतु फंडाची कार्यक्षमता नाही. दोन प्रमुख गुणोत्तर मदत करतात:

इन्फॉर्मेशन रेशो (आयआर): सक्रिय जोखीमच्या प्रति युनिट (मानदंड सापेक्ष) जास्त परतावा निर्माण करण्याची फंडाची क्षमता मोजते. उच्च आयआर म्हणजे नियंत्रित जोखीमसह सातत्यपूर्ण कामगिरी. प्रमाणित विचलन आणि बीटा: फंडाची अस्थिरता आणि बाजार संवेदनशीलता प्रतिबिंबित करते.

शार्प रेशो : फंड जोखीम-मुक्त परतावा तो घेत असलेल्या एकूण जोखमीला साजेसा आहे का हे दर्शविते.

हे आणि असे गुणोत्तर केवळ परतावा टक्केवारीपेक्षा फंड व्यवस्थापनाच्या गुणवत्तेबद्दल सखोल अंतर्दृष्टी देतात.

६. खर्चाचे प्रमाण आणि खर्च कार्यक्षमताकामगिरी उत्तम असली तरी जर फंडाचे खर्च जास्त असतील, तर त्याची आकर्षकता कमी होते. त्यामुळे तुमचा एक्सपेन्स रेशो तपासा.समान फंड गटातील फंडांमध्ये खर्चाचे प्रमाण, एक्झिट लोड आणि लपवलेले खर्च तपासायला हवेत. जर सक्रिय व्यवस्थापन (ऍक्टिव्ह मॅनेजमेंट) असेल, तर फंड त्या बदल्यात जास्तीचा परतावा देतोय का? की पॅसिव्ह फंड जास्त योग्य ठरेल?

७. पारदर्शकता आणि अनुपालन मानकेशेवटी, फंड आणि फंड घराणे हाऊस किती पारदर्शक आहे ते तपासा. नियमित, तपशीलवार माहिती, सेबी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन आणि निश्चित केलेल्या प्रक्रियेपासून कमीत कमी विचलन हे विश्वासार्ह फंड घराण्याचे वैशिष्ट्य आहेत.

निष्कर्ष

भूतकाळात ज्यांची कामगिरी चमकदार असेल तर गुंतवणूकदार अशाच फंडांना पसंती देतात. परंतु हे फंड भविष्यात अशीच कामगिरी करतील याची खात्री नसते. फंड घराण्याची बलस्थाने आणि निश्चित केलेल्या चौकटीत मार्गक्रमण करण्याचे कौशल्य तसेच मागील कामगिरीवर विसंबून न राहता प्रत्येक परिस्थितीला नव्याने सामोरे जाणे या निकषांवर विसंबून एक भविष्यलक्ष्यी म्युच्युअल फंडांचा पोर्टफोलिओ बनवू शकता. कदाचित तुम्हाला संख्यात्मक निकषांवर निवड करणे कठीण वाटत असेल, तर या दोन गोष्टी तुम्ही नक्की करू शकता.

१. म्युच्युअल फंडविषयक संकेत स्थळावर फंडाचे क्वारटाइल रँकिंग तपासू शकता. क्वारटाइल रँकिंग तयार करताना फंडाचे गुणात्मक आणि संख्यात्मक विश्लेषण करून त्या गटातील सर्व फंडांची यादी तयार करून त्या फंडाची विभागणी चार गटात केली जाते. प्रत्येक गट म्हणजे क्वारटाइल. टॉप अप्पर, मिडलमी लोअर मिडल आणि बॉटम असे हे चार गट आहेत. शक्यतो टॉप आणि अप्पर मिडल क्वारटाइल मधले फंड निवडावे.

२. सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे तज्ञांचे / वितरकांचे मार्गदर्शन घेणे.