अनेक बँकांनी २०२३ च्या शेवटच्या महिन्यात म्हणजेच डिसेंबरमध्ये त्यांचे भांडवली खर्चावर आधारित व्याजदर (MCLR) आणि रेपोदराशी संलग्न कर्ज दर (RLLR) बदलले आहेत. बँकेने केलेल्या या बदलामुळे सर्वसामान्यांच्या कर्जाच्या ईएमआयमध्येही बदल दिसून येत आहेत. डिसेंबर महिन्यात IDBI बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, ICICI बँक, कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक (PNB), बँक ऑफ इंडिया आणि बंधन बँक यांनी त्यांचे व्याजदर बदलले आहेत. जर आपण कॅनरा बँकेबद्दल बोलायचे झाल्यास बँकेने १२ डिसेंबर २०२३ पासून आपल्या RLLR मध्ये बदल केले आहेत. या बँकांनी त्यांच्या MCLR आणि RLLR मध्ये कसे बदल केले आहेत ते देखील जाणून घेऊ यात.

कॅनरा बँक कर्ज दर

कॅनरा बँकेने आपल्या स्टॉक एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, बँकेने १२ डिसेंबर २०२३ पासून वेगवेगळ्या कालावधीसाठी त्यांचे MCLR दर बदलले आहेत. एका दिवसासाठी दर ८ टक्क्यांवर आले आहेत. एका महिन्याचे कर्जाचे दर ८.१ टक्के, तीन महिन्यांचे कर्जाचे दर ८.२ टक्क्यांवर आले आहेत. सहा महिन्यांसाठी कर्जाचा दर ८.५५ टक्के आहे. एक वर्षाच्या कर्जाचा दर ८.७५ टक्के आणि दोन वर्षांच्या कर्जाचा दर ९.०५ टक्क्यांवर आला आहे. बँकेने तीन वर्षांच्या कर्जाचा दर ९.१५ टक्के ठेवला आहे. कॅनरा बँकेने RLLR मध्येही बदल केले असून, १२ डिसेंबरपासून ते ९.२५ टक्के करण्यात आले आहे.

IDBI बँक कर्ज दर

  • IDBI बँकेच्या वेबसाइटनुसार, एका दिवसासाठी कर्जाचा दर ८.३ टक्के आहे.
  • एका महिन्याच्या कालावधीसाठी MCLR ८.४५ टक्के आहे.
  • IDBI बँकेने तीन महिन्यांचा MCLR दर ८.७५ टक्के दिला आहे.
  • सहा महिन्यांचा MCLR ८.९५ टक्के आहे.
  • एक वर्षाचा MCLR ९ टक्के आहे.
  • दोन वर्षांसाठी MCLR ९.५५ टक्के आहे.
  • तीन वर्षांसाठी MCLR ९.९५ टक्के आहे.
  • हे सर्व कर्ज दर १२ डिसेंबर २०२३ पासून लागू आहेत.

बँक ऑफ इंडिया कर्ज दर

युनियन बँक ऑफ इंडियाचे नवीन MCLR दर ११ डिसेंबर २०२३ ते १० जानेवारी २०२४ पर्यंत प्रभावी आहेत. एका दिवसासाठी दर ७.९ टक्के आहे. एका महिन्याचा MCLR ७.९५ टक्के आहे. तीन महिन्यांसाठी MCLR ८.३५ टक्के आहे. सहा महिन्यांचा MCLR ८.६ टक्के आहे. एक वर्षाचा MCLR ८.८ टक्के आहे. दोन वर्षांचा MCLR ८.९ टक्के आहे. तीन वर्षांचा MCLR ९.०५ टक्के आहे.

बँक ऑफ बडोदा कर्ज दर

बँक ऑफ बडोदा (BoB) ने १२ डिसेंबर २०२३ पासून त्यांचा MCLR बदलला आहे. एका दिवसासाठी MCLR ८ टक्के आहे. एका महिन्याचा MCLR ८.३ टक्के आहे. तीन महिन्यांसाठी MCLR ८.४ टक्के आहे. सहा महिन्यांचा MCLR ८.५५ टक्के आहे. एक वर्षाचा MCLR ८.७५ टक्के आहे.

ICICI बँक कर्ज दर

ICICI बँकेच्या वेबसाइटनुसार, बँकेने १ डिसेंबर २०२३ पासून आपला MCLR बदलला आहे. एका दिवसासाठी दर ८.५ टक्के आहे. एका महिन्यासाठी MCLR आधारित कर्जाचा दर ८.५ टक्के आहे. तीन महिन्यांचा दर ८.५५ टक्के आहे. सहा महिन्यांचा दर ८.९ टक्के आहे. एक वर्षाचा दर ९ टक्के आहे.

हेही वाचाः अदाणी समूह पुढील १० वर्षांत हरित ऊर्जेमध्ये १०० अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार

बंधन बँक कर्ज दर

बंधन बँकेने १ डिसेंबर २०२३ पासून त्यांचे MCLR आधारित कर्ज दर बदलले आहेत. एका दिवसासाठी आणि एक महिन्याच्या कालावधीसाठी MCLR ७.०७ टक्के आहे. तीन महिने आणि सहा महिन्यांच्या कालावधीसाठी व्याजदर ८.५७ टक्के आहे. एक, दोन आणि तीन वर्षांचा MCLR दर ११.३२ टक्के आहे.

हेही वाचाः नवे रोजगार निर्माण करणे हे भारतासमोरील मोठे आव्हान, रघुराम राजन यांनी व्यक्त केली चिंता

पंजाब नॅशनल बँक कर्ज दर

पंजाब नॅशनल बँक (PNB) ने १ डिसेंबर २०२३ पासून त्यांच्या MCLR मध्ये बदल केले आहेत. एका दिवसासाठी सुधारित MCLR ८.२ टक्के आहे. एका महिन्याच्या कालावधीसाठी MCLR ८.२५ टक्के आहे. तीन महिन्यांच्या कालावधीसाठी MCLR ८.३५ टक्के आहे. सहा महिन्यांच्या कालावधीसाठी दर ८.५५ टक्के आहे. एका वर्षाच्या कालावधीसाठी PNB चा MCLR दर ८.६५ टक्के आहे. तीन वर्षांच्या कालावधीसाठी हा दर ९.९५ टक्के आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बँक ऑफ इंडिया कर्ज दर

सार्वजनिक क्षेत्रातील कर्जदार बँक ऑफ इंडियाने १ डिसेंबर २०२३ पासून आपल्या MCLR मध्ये सुधारणा केली आहे. एका दिवसासाठी सुधारित दर ७.९५ टक्के होते. एका महिन्याचा MCLR दर ८.२५ टक्के आहे. बँक ऑफ इंडियाच्या कर्जदारांसाठी तीन महिन्यांचा MCLR ८.२५ टक्के आहे. तीन महिन्यांसाठी MCLR ८.४ टक्के आहे. सहा महिन्यांचा MCLR ८.६ टक्के आहे. तीन वर्षांसाठी MCLR ९ टक्के आहे.