आज म्युच्युअल फंड घराण्यात पराग पारीख म्युच्युअल फंडाची एक वेगळी ओळख आहे. ‘Law of the farm’ या तत्त्वाप्रमाणे निसर्गातल्या प्रत्येक निर्मितीची एक वेळ यावी लागते. पराग पारीख घराण्याच्या इक्विटी योजना याच तत्त्वावर आधारित आहेत. ते असं मानतात की, इक्विटी गुंतवणूक ही दीर्घकाळासाठी केली पाहिजे. झाडावर नुकतीच आलेली कळी न खुडता, बहरलेले फुलांचे झाड बघण्यातला आनंद अधिक असतो.

पराग पारीख यांनी एकदा बाजारासंदर्भात असं म्हटलेलं आहे की, “आपण क्षणिक समाधानाच्या युगात आहोत. आपल्याला सर्वकाही झटकन हवं आहे. वायदा बाजारच्या (डेरिव्हेटिव्ह) मार्गाने छोट्या कालावधीत झटपट नफा हा भ्रम आहे, आम्ही या विचारसरणीवर विश्वास ठेवत नाही. आम्ही नम्रपणे कबूल करू की, आमच्याकडे कौशल्य नाही, आमच्याकडे बाजारात अल्पकालीन नफा मिळवून देण्याची क्षमता नाही.”

Rajyog Lakshmi Narayan Rajyoga
मे महिन्यात निर्माण होईल लक्ष्मी नारायण राजयोग! या तीन राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ, मिळेल बक्कळ पैसा
Nuclear Power Corporation of India inviting applications for 400 Executive Trainees post in Mumbai Details Here
NPCIL Mumbai Bharti 2024 : सरकारी नोकरीची संधी! ४०० जागा, ५५ हजारांपर्यंत पगार; ‘ही’ आहे अर्जाची शेवटची तारीख
tigress archi video marathi news, loksatta tiger video marathi news
VIDEO: आर्चीच्या बछड्यांची ‘मस्ती की पाठशाला’, टिपेश्वरच्या जंगलातील दंगामस्ती कॅमेऱ्यात कैद
IPL 2024 Rohit Sharma Celebrating Holi With Wife and Daughter Shared Video on Instagram
IPL 2024: लहान मुलांची पिचकारी, जमिनीवर साचलेल्या पाण्यात डान्स अन् बरंच काही… रोहित शर्माचा रंगपंचमीचा भन्नाट व्हिडिओ पाहिला का?

हेही वाचा – Money Mantra : करावे कर समाधान : नवीन घरातील गुंतवणुकीची सवलत फक्त दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यासाठी

दीर्घकालीन गुंतवणूक करत राहणे कठीण आहे का? या प्रश्नावर पराग पारीख यांनी पूर्वी दिलेले हे उत्तर आहे. “अवघड वाटेल पण तसे नाही. वयाच्या २५ व्या वर्षी कारकीर्द सुरू करणाऱ्या तरुणाचेच उदाहरण घ्या. तो ६५ व्या वर्षी निवृत्त झाला असे गृहीत धरून त्याच्याकडे ४० वर्षे आहेत. जिथे तो बचत आणि गुंतवणूक करू शकतो. आपण भारतीय, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, आयुर्विमा योजना आणि सोन्यासारख्या दीर्घकालीन गुंतवणुकीत अनेक वर्षांपासून गुंतवणूक करतो. पण जेव्हा समभाग संलग्न योजनांचा (इक्विटी) प्रश्न येतो तेव्हा अल्पकालीन विचार करतो. त्यामुळे लोक दीर्घकालीन गुंतवणुकीवर विश्वास ठेवत नाहीत असे नाही, पण प्रश्न इक्विटीबाबतच्या मानसिकतेबद्दलचा आहे.”

माणसाच्या गुंतवणूक निर्णय प्रक्रियेवर त्यांच्या समजुती, धारणांचा परिणाम होतो. मनातली वादळे कृतीत उतरतात. मग अगदी आधीच्याच वर्षी दीर्घकालीन गुंतवणुकीच्या शपथा घेणारा गुंतवणूकदार अचानक अल्पकालीन फायद्याचा विचार करतो. बाजारातून बाहेर पडतो आणि सर्व गणित बिघडते. पराग पारीख यांनी म्हटल्याप्रमाणे, “आर्थिक निर्णय घेताना भावनांचा वापर केल्यामुळे गुंतवणूकदार स्वतःच्या तर कधी इतरांच्या चुकांना बळी पडतात. ही संकल्पना बिहेव्हरिअल फायनान्स अर्थात वित्तीय वर्तणूक म्हणून ओळखली जाते. याचा अभ्यास म्हणजे सर्वसाधारणपणे गुंतवणूकदार त्यांच्या भावनांमुळे आर्थिक निर्णय घेताना चुका कशा करतात याचा अभ्यास. हा मानसशास्त्र आणि अर्थशास्त्राचा अभ्यास आहे. त्याचा बाजारांवर कसा परिणाम होतो हे ओळखणे ही यशस्वी गुंतवणूक धोरणाची गुरुकिल्ली आहे. संयम बाळगणे, लोभ टाळणे आणि भीतीवर विजय मिळवणे या रणनीतींचा आधार बनतात. आम्ही कंपन्यांचे मूल्यांकन त्यांच्या अंगभूत सामर्थ्यांवर आणि दीर्घकालीन क्षमतेवर करतो. परंतु वित्तीय वर्तणुकीच्या माहितीचा उपयोग बाजारातील स्वस्तातला समभाग ओळखण्यासाठी करतो.”

पराग पारीख आज आपल्यात नाहीत, पण त्यांच्या शिकवणुकीवर नितांत श्रद्धा ठेवून निल पराग पारीख जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, ते सर्व निधी व्यवस्थापकांच्या मदतीने फंड घराण्याला पुढे नेत आहेत. जास्त योजनांचा भडिमार न करता मोजक्याच योजनांमधून गुंतवणूकदारांसाठी संपत्तीनिर्मिती करत आहेत. ‘स्किन इन द गेम’ चा कायदा होण्यापूर्वीपासून हा नियम फंड घराण्याने अंगिकारला होता. ‘गुंतवणूकदारांची वार्षिक सर्वसाधारण सभा’ हा अभिनव उपक्रम राबवणारे पराग पारीख म्युच्युअल फंड हे एकमेव फंड घराणे आहे.

हेही वाचा – Money Mantra: ईटीएफ म्हणजे काय आणि त्यात गुंतवणूक कशी करावी?

त्यांचा पराग पारीख फ्लेक्सिकॅप फंड हा फ्लेक्सिकॅप श्रेणीतील भारतातील सर्वात मोठा फंड आहे. ३१ जानेवारी २०२४ रोजी या फंडाकडे ५५,०३४ कोटी रुपये एवढी मालमत्ता आहे. राजीव ठक्कर हे या फंडाच्या सुरवातीपासून त्याचे निधी व्यवस्थापक राहिले आहेत. पराग पारीख फ्लेक्सी कॅप फंड ही एक ‘ओपन एंडेड इक्विटी ओरिएंटेड’ योजना आहे, ज्यामध्ये भारतीय इक्विटीमध्ये किमान गुंतवणूक ६५ टक्के आणि परदेशी इक्विटी सिक्युरिटी, देशांतर्गत कर्ज/मनी मार्केट सिक्युरिटीजमध्ये ३५ टक्क्यांपर्यंत गुंतवणूक करण्याची मुभा आहे. मुख्य पोर्टफोलिओ दीर्घकालीन दृष्टिकोनासह बांधला आहे आणि गुंतवणूक करताना कंपनी व्यवस्थापनाची गुणवत्ता, क्षेत्रातील वाढ, प्रवेश सुकर क्षेत्र, भांडवलाची आवश्यकता आणि त्याचे प्रमाण, भांडवलावरील परतावा, कर्जाचा वापर, उद्योगवाढीची शक्यता, कंपन्यांचे मूल्यांकन इत्यादी घटक विचारात घेतलेले आहेत. जेव्हा बाजारात काही काळ पुरेशा आकर्षक संधी नसतात तेव्हा निधी व्यवस्थापक रोख आणि फ्युचर्स आणि आर्बिट्राज संधींमध्ये गुंतवणूक करतो. थोडी गुंतवणूक मनी मार्केट/डेट सिक्युरिटीजमध्येही केली जाते. परदेशी समभागांमध्ये गुंतवणूक करणारा हा फ्लेक्सिकॅप श्रेणीतील पहिला फंड आहे. जानेवारी २०२४ अखेरीस फंडाच्या एकूण मालमत्तेच्या साधारण १५ टक्के मालमत्ता मायक्रोसॉफ्ट, अल्फाबेट, मेटा प्लॅटफॉर्म्स आणि अमेझॉन या कंपनीत आहे. फंडाकडे जवळपास १३.१२ टक्के मालमत्ता रोख रकमेच्या स्वरूपात आहे (डेट आणि मनी मार्केट साधने, आर्बिट्रेज पोझिशन्स) ज्यांची योग्य स्तरांवर दीर्घकालीन इक्विटी गुंतवणूक केली जाईल. बँकिंग क्षेत्रात १९.८८ टक्के, इंटरनेट आणि टेक्नॉलॉजी ११.८४ टक्के, कॅपिटल मार्केट ७.८० टक्के अशी पहिल्या तीन क्षेत्रांची विभागणी आहे. जानेवारी २०२४ अखेरीस या योजनेचा गेल्या १० वर्षांचा वृद्धीदर २०.१७ टक्के आणि ५ वर्षांचा वृद्धीदर २३.०६ टक्के असा आहे. आपल्या गुंतवणूक सल्लागाराच्या मदतीने आपण गुंतवणुकीविषयी निर्णय घ्यावा.

या फंड घराण्याचे चिन्ह कासव आहे. जग वेगाला महत्त्व देत असताना कासव हे नाव विसंगत वाटू शकते. परंतु कासव हे ज्ञानाचे आणि दीर्घायुष्याचे प्रतीक आहे. संपत्तीनिर्मितीच्या दीर्घकालीन वाटेवर चालताना आपल्याला काही प्रतीकं मनात कोरावी लागतील.


लेखक मुंबईस्थित वित्तीय समुपदेशक आहेत.

sameernesarikar@gmail.com