देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने नवीन मुदत ठेव योजना सुरू केली आहे. SBI कडून ग्रीन रुपी टर्म डिपॉझिट (SBI Green Rupee Term Deposit- SGRTD) लाँच करण्यात आली आहे. विशिष्ट प्रकल्पांना चालना देण्यासाठी पैसा उभारणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. या ठेवीमुळे ग्रीन फायनान्स इकोसिस्टमला फायदा होणार आहे. या ठेवीबाबत एसबीआयने प्रसिद्धीपत्रक जारी केले होते. या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी म्हटले होते की, यामुळे वित्तसंवर्धनासह हरित उपक्रमांना हातभार लागला आहे. SBI शाश्वत भविष्यासाठी देशाला समर्थन देण्यासाठी संधी प्रदान करते.

ग्रीन डिपॉझिट म्हणजे काय?

ग्रीन डिपॉझिट हा मुदत ठेवीचा एक प्रकार आहे. यामध्ये गुंतवणूकदार अतिरिक्त रोख रक्कम पर्यावरणपूरक प्रकल्पांमध्ये गुंतवू शकतात. देशाला निव्वळ कार्बन शून्य करण्याचे सरकारचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी बँकेने ही ऑफर दिली आहे. ग्रीन डिपॉजिट नियमित मुदत ठेवींप्रमाणेच कार्य करतात. यामध्येही गुंतवणूकदाराला ठराविक कालावधीसाठी निश्चित व्याज मिळते. नियमित मुदत ठेवी आणि ग्रीन मुदत ठेवींमध्ये थोडा फरक आहे. पर्यावरणावर सकारात्मक परिणाम करणाऱ्या प्रकल्पांना ग्रीन डिपॉझिट प्राधान्य देते.

हेही वाचाः इंडिगो अन् मुंबई विमानतळाला कारणे दाखवा नोटीस, विमान वाहतूक मंत्रालयाने आजच मागितले उत्तर; नेमकं प्रकरण काय?

या ठेवीमध्ये कोण गुंतवणूक करू शकतो?

भारतातील रहिवासी गुंतवणूक करू शकतात, अनिवासी भारतीयदेखील ग्रीन टर्म डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करू शकतात. SBI च्या प्रसिद्धिपत्रकानुसार, सामान्य लोकांसाठी ग्रीन टर्म डिपॉझिट दर कार्ड हा दरापेक्षा १० बीपीएस कमी असेल.

हेही वाचाः Artificial intelligence मुळे जगभरातील ४० टक्के नोकऱ्या धोक्यात, IMFचा इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ग्रीन डिपॉझिटमध्ये गुंतवणूक कशी करावी?

तुम्ही SBI च्या YONO आणि इंटरनेट बँकिंग सेवा (INB) यांसारख्या डिजिटल चॅनेलद्वारे याचा लाभ घेऊ शकता. यामध्ये गुंतवणूकदाराला तीन कालावधीचा पर्याय दिला जातो. गुंतवणूकदार ११११ दिवस, १७७७ दिवस आणि २२२२ दिवस यापैकी कोणतीही मुदत निवडू शकतात. तसेच त्यावर अनुक्रमे ६.६५ टक्के, ६.६५ टक्केआणि ६.४० टक्क्यांपर्यंत व्याज मिळते.