ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) ही पोस्ट ऑफिस बचत योजना असून ही केंद्र सरकार-समर्थित सेवानिवृत्ती पश्चात निवृत्त ज्येष्ठ नागरिकांना खात्रीचा परतावा देणारी गुंतवणूक आहे. अल्प बचत योजनेतील ही सर्वोच्च परतावा देणारी गुंतवणूक असल्याने ज्येष्ठ नागरिकांमध्ये अतिशय लोकप्रिय झाली आहे. भारतातील रहिवासी ज्येष्ठ नागरिक वैयक्तिकरित्या किंवा संयुक्तपणे या योजनेत एकरकमी गुंतवणूक करू शकतात आणि कर सवलतींसह नियमित उत्पन्न मिळवू शकतात. एससीएसएसचे लाभ मिळवण्यासाठी ज्येष्ठ नागरिक एससीएसएस खाते पोस्ट ऑफिस शाखेत किंवा अधिकृत बँकेत उघडू शकतात.

गेल्या अंदाज पत्रकात या योजनेत कमाल ठेवता येणारी ठेवीची मर्यादा पंधरा लाखांवरून तीस लाख केल्याने ज्येष्ठ नागरिकांचे खात्रीचे उत्पन्न मिळविण्याचे गुंतवणुकीचे मार्ग शोधण्याचे बरेच कष्ट वाचले. आता त्यांना प्रतीमहा वीस हजार पाचशे इतके व्याजाचे खात्रीचे उत्पन्न मिळू शकते हा विश्वास दृढ होऊ शकतो. पूर्वी जोडीदाराच्या नावानेही अशी ठेव ठेवणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आणखी तीस लाख रुपये ठेवण्याची संधी मिळाल्याने कुटुंबात साठ लाख रुपयांची ठेव ठेवता येणे शक्य झाले आहे.

challenged to RTE new rules in High Court
पालक, विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे! ‘आरटीई’ नव्या नियमांना उच्च न्यायालयात आव्हान
Black market, pune RTO, brokers,
पुणे आरटीओत ‘काळाबाजार’! दलालांनी उभारली पर्यायी यंत्रणा; कर्मचाऱ्यांना धमकावण्याचे प्रकार
china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर

हेही वाचा… Money Mantra: नवविवाहितांसाठी फायनान्शिअल प्लॅनिंग #couplegoals – 2

केंद्र सरकारने आता सेवा निवृत्ती लाभांची व्याख्या केल्याने पगारदार नसणाऱ्या जोडीदाराच्या नावाने अशी ठेव ठेवता येणे भविष्यात कठीण होईल तथापि, पूर्वी अशी ठेव ठेवलेल्या ज्येष्ठ जोडीदाराच्या नूतनीकरण करताना काही अडचणी येणार नसल्याने जुन्या ठेवीदारांना झुकते माप सरकारने दिल्याचे दिसते.

योजनेची वैशिष्ट्ये

१. कोणाला खाते उघडता येईल ?

भारतातील राहिवासी ज्यांचे वय गुंतवणुकीचे वेळी ६० पेक्षा जास्त असल्यास ‘सेवा निवृत्त लाभ निधी’ गुंतविण्यासाठी स्वतःच्या किंवा आपल्या सहचऱ्यासह हे खाते वैयक्तिक किंवा संयुक्तरीत्या एक किंवा अधिक खाते कमाल ठेवीच्या मर्यादेत उघडता येतील. संयुक्त खात्यातील ठेवीची संपूर्ण रक्कम फक्त पहिल्या खातेदारालाच दिली जाते. या खेरीज ५५ वर्षांवरील आणि ६० वर्षांपेक्षा कमी वयाचे सेवानिवृत्त नागरी कर्मचारी तसेच ५० वर्षांवरील आणि ६० वर्षांपेक्षा कमी वयाचे निवृत्त संरक्षण कर्मचारीही हे खाते उघडू शकतात. तथापि, अनिवासी भारतीय (एनआरआय) आणि हिंदू अविभक्त कुटुंबे (एचयुएफ) हे खाते उघडण्यास पात्र नाहीत. ७ नोव्हेंबर २०२३ रोजी काढलेल्या अधिसूचनेनुसार सरकारी सेवकाच्या मृत्यूपश्चात ५५ वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या पत्नीला मिळालेली वित्तीय सहाय्यता गुंतविण्यासाठी या योजनेत गुंतवणूक करण्यास नुकतीच मुभा देण्यात आली आहे.

२. कोठे खाते उघडू शकतात ?

• बँक ऑफ महाराष्ट्र • बँक ऑफ बडोदा • बँक ऑफ इंडिया • सेंट्रल बँक ऑफ इंडिया • देना बँक • आयडीबीआय बँक • इंडियन बँक • इंडियन ओव्हरसीज बँक • पंजाब नॅशनल बँक • स्टेट बँक ऑफ इंडिया • युको बँक • युनियन बँक ऑफ इंडिया • विजया बँक • आयसीआयसीआय बँक या बँकांसह, पोस्ट ऑफिसात देखील हे खाते उघडता येते..
 
३. सेवानिवृत्ती लाभांची व्याख्या

७ नोव्हेंबर २०२३ रोजी काढलेल्या अधिसूचनेनुसार, सेवानिवृत्ती लाभाची व्याख्या परिभाषित करण्यात आली असून सेवानिवृत्ती किंवा सेवानिवृत्तीमुळे व्यक्तीला मिळालेली कोणतीही रक्कम या संज्ञेमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. त्यात भविष्य निर्वाह निधी, निवृत्ती किंवा सेवानिवृत्ती किंवा मृत्यू उपदान, पेन्शनची कम्युटेड व्हॅल्यू, रजा रोखीकरण, निवृत्तीनंतर नियोक्त्याद्वारे देय असलेल्या गट बचत लिंक्ड विमा योजनेचे बचत घटक, कर्मचारी पेन्शन योजना (EPS) अंतर्गत सेवानिवृत्ती-सह-पैसे परत घेण्याचा लाभ आणि स्वैच्छिक किंवा विशेष स्वैच्छिक सेवानिवृत्ती योजनेंतर्गत सानुग्रह मिळणारी देयकांची रक्कम यांचाच समावेश आहे.

४. किमान व कमाल गुंतवणूक

या योजनेत किमान गुंतवणूक रु. १००० तर वाढीव ठेवी रु. १००० च्या पटीत केल्या जाऊ शकतात. कमाल गुंतवणूक प्रती व्यक्ती रु ३० लाख करता येईल. ठेवीची रक्कम एक लाख रुपयांच्या पेक्षा कमी असल्यास निवृत्त व्यक्ती रोख स्वरूपात पैसे जमा करू शकते, तर ठेवीची रक्कम रु. एक लाखापेक्षा जास्त असेल, तर सदर रक्कम चेकनेच द्यावी लागते.

५. कालावधी

या योजनेचा कालावधी पाच वर्षांचा आहे व त्या नंतर गुंतवणुकीचे दर तीन वर्षांच्या कालावधीसाठी कितीही वेळा नूतनीकरण करता येते. पूर्वी असे नूतनीकरण केवळ एकदाच शासन मान्य होते. तथापि आता ७ नोव्हेंबर २०२३ रोजी काढलेल्या अधिसूचनेनुसार नूतनीकरण प्रक्रिया तीन वर्षांच्या कालावधीसाठी कितीही वेळा करता येईल असा बदल करण्यात आला आहे.

६. व्याज दर

हे खाते उघडणाऱ्या व्यक्तींना सरकारने निश्चित केलेल्या दराने म्हणजे गुंतवणुकीच्या मुद्दल रक्कमेवर द.सा.द.शे. ८.२% दराने सरळ व्याज प्रत्येक तिमाहीस दिले जाते. एप्रिल, जुलै, ऑक्टोबर आणि जानेवारीच्या पहिल्या तारखेला व्याजाची रक्कम खातेदाराच्या खात्यात जमा केले जाते. गुंतवणुकीच्या मुदत पुर्तीनंतर गुंतवणूकीचे नूतनीकरण केल्यास सदर गुंतवणुकीवर ज्या तारखेस गुंतवणूकीचा वा नूतनीकरण केल्याचा कालावधी संपला असेल त्या तारखेस प्रचलित असलेल्या व्याज दरानेच गुंतवणुकीचे नूतनीकरण होईल असे ७ नोव्हेंबर २०२३ रोजी काढलेल्या अधिसूचनेनुसार स्पष्ट करण्यात आले आहे. या खात्यात कोणतीही कमाल मर्यादेपेक्षा जास्त रक्कमेची ठेव ठेवल्यास, ठेवीदाराला जास्तीची रक्कम ताबडतोब परत केली जाईल आणि फक्त पोस्ट ऑफिस बचत खाते व्याज दराने जास्तीच्या ठेवीच्या तारखेपासून परत केलेल्या तारखेपर्यंत व्याज दिले जाईल.

७. सुरक्षित गुंतवणूक

अल्प बचत योजनेतील ही सरकार समर्थित गुंतवणूक योजना आहे. सबब, गुंतवलेली रक्कम सर्वोच्च दृष्टीने अतिशय सुरक्षित आहे आणि तिच्या मुदतपूर्ती नंतर मुद्दल रक्कम व्याजासहित परत मिळण्याची पूर्णतः हमी आहे.

८. कर सवलत

या योजनेत कोणत्याही आर्थिक वर्षात झालेल्या गुंतवणूकीवर प्राप्तिकर कायदा, १९६१ च्या कलम ८०सी अंतर्गत झालेली गुंतवणुकीची रक्कम रु दीड लाखापर्यंत उत्पन्नातून वजावटीसाठी पात्र ठरविण्यात आल्याने सर्व गत्वारीत असणाऱ्या करदात्यांना मोठी कर सवलत मिळते हा या योजनेचा मोठा फायदा आहे. मात्र या योजनेत गुंतवणुकीवर मिळालेले व्याज पूर्णतः करपात्र आहे. तथापि, प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८०टीटीबी अंतर्गत मिळालेल्या व्याजातून रु. पन्नास हजारांची वजावट करपात्र उत्पन्नातून मिळू शकते.

९. कर कपात (टीडीएस) तरतुदी

सर्व ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेव खात्यांवर मिळणारे एकूण व्याज आर्थिक वर्षात रु. पन्नास हजारपेक्षा जास्त झाल्यास व्याजातून प्राप्तिकर कायदा कलम १९४ए अंतर्गत १०% दराने कर कपात केली जाते. जर करदात्याने फॉर्म १५जी/१५एच दाखल केला असेल आणि जमा केलेले व्याज विहित किमान कर पात्र मर्यादेपेक्षा जास्त नसेल तर कोणतीही कर कपात केली जात नाही.

१०. मुदत पूर्ती पूर्वी खाते बंद करता येते काय ?

(i) खाते उघडण्याच्या तारखेनंतर कधीही वेळेपूर्वी बंद केले जाऊ शकते.

(ii) खाते १ वर्ष होण्यापूर्वी बंद केले असल्यास, कोणतेही व्याज दिले जात नाही आणि खात्यात कोणतेही व्याज जमा केले असल्यास ते तत्त्वानुसार वसूल केले जाते. तथापि, ७ नोव्हेंबर २०२३ रोजी काढलेल्या अधिसूचनेनुसार आता मूळ मुद्दल रकमेतून १% इतकीच रक्कम वजा केली जाईल व मुद्दल व व्याजासहित सर्व रक्कम परत दिली जाईल

(iii) खाते १ वर्षानंतर पण उघडण्याच्या तारखेपासून २ वर्षापूर्वी बंद केले असल्यास, मूळ मुद्दल रकमेतून १.५% इतकी रक्कम वजा केली जाईल.

(iv) खाते २ वर्षानंतर पण उघडण्याच्या तारखेपासून ५ वर्षापूर्वी बंद केले असल्यास, मूळ मुद्दल रकमेतून १% इतकी रक्कम वजा केली जाईल.

(v) विस्तारित खाते कोणत्याही कपातीशिवाय खात्याच्या मुदतवाढीच्या तारखेपासून एक वर्षाच्या समाप्तीनंतर बंद केले जाऊ शकते.

११. मुदतपूर्तीवर खाते बंद करणे

(i) खाते उघडण्याच्या तारखेपासून पाच वर्षानंतर संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये वा बँकेमध्ये पासबुकसह विहित अर्ज सादर करून खाते बंद केले जाऊ शकते.

(ii) खातेधारकाचा मृत्यू झाल्यास, मृत्यूच्या तारखेपासून, खात्यावर पोस्त ऑफिस बचत खात्याच्या दराने व्याज मिळेल.

(iii) पती/पत्नी संयुक्त धारक किंवा एकमेव नामनिर्देशित असल्यास, जोडीदार हे खाते उघडण्यास पात्र असल्यास आणि दुसरे हे खाते नसल्यास मुदतपूर्तीपर्यंत खाते सुरू ठेवता येते.

१२. नामांकन सुविधा उपलब्ध

गुंतवणुकदार खात्यात नामनिर्देशित व्यक्ती जोडू शकतो जेणेकरून मृत्युपश्चात पैशाची विभागणी पुढील पिढीत करता येईल..