पीटीआय, नवी दिल्ली

देशाचे निव्वळ प्रत्यक्ष करसंकलन विद्यमान आर्थिक वर्षात आतापर्यंत वार्षिक तुलनेत १९ टक्क्यांनी वाढून १४.७० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. १० जानेवारीपर्यंतच्या महसुलाची ही आकडेवारी संपूर्ण वर्षासाठी निर्धारित अर्थसंकल्पीय उद्दिष्टाच्या ८१ टक्के आहे, अशी माहिती प्राप्तिकर विभागाने गुरुवारी दिली.

यंदा वैयक्तिक प्राप्तिकर संकलन वाढल्याने एकूण कर महसूल वाढला असल्याचे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले. केंद्र सरकारने यंदा १८.२३ लाख कोटी रुपयांचे प्रत्यक्ष कर संकलनाचे लक्ष्य निश्चित केले आहे. जे गेल्या आर्थिक वर्षात जमा केलेल्या १६.६१ लाख कोटी रुपयांपेक्षा ९.७५ टक्क्यांनी अधिक आहे. १ एप्रिल २०२३ ते १० जानेवारी २०२४ दरम्यान एकूण २.४८ लाख कोटी रुपयांचा प्राप्तिकर परतावा (टॅक्स रिफंड) वितरित करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा >>>‘सोनी’सह विलीनीकरण पूर्णत्वास जाणार- झी

स्थूल आधारावर, १० जानेवारी २०२४ पर्यंत प्रत्यक्ष कर संकलनात स्थिर वाढ नोंदवली गेली. एकूण कर संकलन १७.१८ लाख कोटी रुपये आहे, जे गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील एकूण संकलनापेक्षा १६.७७ टक्के जास्त आहे.