Home Loan Rates : घर खरेदी करणे हे प्रत्येक सामान्य मनुष्याचे स्वप्न असते. मात्र, घर घेण्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागतात आणि अपुऱ्या पैशांमुळे अनेकांचे ते स्वप्न अधुरेच राहते. पण आता जवळपास सर्वच बँका लोकांना घर खरेदी करण्यासाठी गृहकर्ज देत आहेत. गृहकर्जाचे दर अनेकदा खाली-वर होतात. गृहकर्जाचे व्याजदर प्रत्येक बँकेनुसार वेगवेगळे असतात आणि अनेक घटकांवर अवलंबून असतात. व्याजदरात थोडासा बदलदेखील गृहकर्ज घेणाऱ्यांवर परिणाम करू शकतो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया गृहकर्जाचे दर नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करते. तुम्हालाही घर घ्यायचे असल्यास ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आम्ही तुम्हाला कोणत्या बँका गृहकर्जावर कमी व्याजदर देतात ते सांगणार आहोत.

स्टेट बँक ऑफ इंडिया

स्टेट बँक ऑफ इंडिया गृहकर्जावर दरवर्षी ९.१५ % पासून आकर्षक व्याजदर देत आहे. एवढेच नाही तर कर्जाची परतफेड करण्यासाठी बँक ३० वर्षांची मुदतही देत ​​आहे. बँक बाजारानुसार, SBI गृहकर्जावर ०.३५% प्रक्रिया शुल्क आकारत आहे. महिलांना SBI गृहकर्जावर ०.००५% सूट मिळू शकते. SBI गृह कर्ज कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारत नाही, ज्यामुळे गृहकर्ज घेणे सोपे जाते.

This is what happens when you chew cloves everyday
रोज एक-दोन लवंग चघळल्या तर शरीरावर काय परिणाम होईल? तज्ज्ञांकडून जाणून घ्या उत्तर…
switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
Money Mantra, insurance, tax saving, investments
Money Mantra: कर बचतीसाठी केलेल्या गुंतवणुकीत विम्याचे काही चांगले पर्याय आहेत का?
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो

कोटक महिंद्रा बँक

कोटक महिंद्रा बँक ८.८५% प्रतिवर्ष आकर्षक व्याजदराने गृहकर्ज देत आहे. तसेच स्वयंरोजगार असलेल्या व्यक्तींसाठी व्याजदर वर्षाला ८.९० टक्क्यांपासून सुरू होत आहेत. गृहकर्ज बॅलन्स ट्रान्सफरच्या बाबतीत तुम्ही मालमत्ता मूल्याच्या ९०% पर्यंत कर्जाची रक्कम घेऊ शकता. कोटक गृह कर्ज २० वर्षांपर्यंतच्या कर्ज कालावधीसह ऑफर केले जाते. ऑनलाइन अर्जासाठी बँक ० % प्रक्रिया शुल्क आकारते. बँक PMAY योजनेंतर्गत महिलांना त्यांच्या गृहकर्जावर सवलतदेखील देत आहे.

हेही वाचाः भारताने डिजिटल पेमेंटमध्ये केला नवा विक्रम, जागतिक व्यवहारात ४६ टक्के वाटा

सिटी बँक

सिटीबँक ८.४५% प्रतिवर्षापासून सर्वात कमी व्याजदरावर १० कोटी रुपयांपर्यंतचे गृहकर्ज देत आहे. बँक कर्जदारांना कर्जाची परतफेड करण्यासाठी २५ वर्षांपर्यंत मुदत देत आहे. सिटीबँक होम फायनान्सिंग प्लॅनसह तुम्ही वित्तपुरवठा केलेल्या मालमत्तेच्या एकूण किमतीच्या ८०% पर्यंत मिळवू शकता.

हेही वाचाः PPF Vs SSY : १.५० लाख गुंतवून मिळवता येणार ६९ लाख रुपये, जाणून घ्या तुम्हाला अधिक परतावा कुठे मिळेल?

पंजाब नॅशनल बँक

पंजाब नॅशनल बँक विविध प्रकारचे गृहकर्ज देते. यामध्ये महिला, पगारदार महिला आणि महिला उद्योजकांसाठी वेगवेगळ्या दरात गृहकर्ज उपलब्ध होणार आहे. पंजाब नॅशनल बँक ७.७५% वार्षिक दराने गृहकर्ज देत आहे. लोकांकडे कर्जाची परतफेड करण्यासाठी ३० वर्षे असतील. GST इत्यादी जोडून ​​खरेदीदारांना ०.३५ टक्क्यांपर्यंत प्रक्रिया शुल्कदेखील भरावे लागेल.

एचडीएफसी बँक

एचडीएफसी होम लोन पात्र कर्जदारांना वार्षिक ८.४५% व्याजदरासह परवडणारी गृहकर्ज ऑफर करीत आहे. कर्जाची परतफेड करण्यासाठी बँक तुम्हाला ३० वर्षे देते. सर्व प्रकारचे कर जोडून ​​प्रक्रिया शुल्क सुमारे ३,००० ते ५,००० रुपये असू शकते.

अॅक्सिस बँक

Axis Bank पात्र ग्राहकांना ८.७५ टक्के प्रतिवर्ष व्याजदरासह गृहकर्जाचे पर्याय ऑफर करते. फ्लोटिंग रेट लोनच्या बाबतीत ३० वर्षांपर्यंत आणि फिक्स रेट लोनच्या बाबतीत २० वर्षांपर्यंत मुदत वाढवता येते. प्रक्रिया शुल्क गृहकर्जाच्या रकमेच्या १% पर्यंत असू शकते.

युनियन बँक ऑफ इंडिया

युनियन बँक प्रतिवर्षी ८.७०% पासून स्पर्धात्मक दराने गृहकर्ज देते. जर तुम्ही कर्ज रद्द करण्याचा निर्णय घेतला तर तुम्हाला कोणतेही प्रीपेमेंट पेनल्टी शुल्क भरावे लागणार नाही. प्रक्रिया शुल्क मंजूर रकमेच्या ०.५% असेल ही एक जमेची बाजू आहे.

बँक ऑफ बडोदा

बँक ऑफ बडोदामध्ये गृहकर्जाचा व्याजदर ८.६० आहे. बँक गृहकर्जावरील प्रक्रिया शुल्कावर १००% सूट देत आहे.