त्रिवेणी टर्बाइन १९६८ पासून ही त्रिवेणी इंजिनीअरिंग अँड इंडस्ट्रीज लिमिटेडचा एक भाग होती. ऑक्टोबर २०१० पासून हा विभाग वेगळा होऊन त्रिवेणी टर्बाइन लिमिटेड झाली. कंपनी प्रामुख्याने वीजनिर्मिती उपकरणे, उत्पादन आणि पुरवठा करण्याच्या व्यवसायात आहे.

त्रिवेणी टर्बाइन लिमिटेड ही १०० मेगावाॅटपर्यंतच्या औद्योगिक स्टीम टर्बाइनची आघाडीची उत्पादक आहे. कंपनी औद्योगिक उष्णता आणि ऊर्जा सोल्यूशन्स आणि विकेंद्रित स्टीम-आधारित रिन्यूएबल टर्बाइनमध्ये आघाडीची कंपनी आहे. कंपनी औद्योगिक कॅप्टिव्ह आणि रिन्यूएबल पॉवरसाठी स्टीम टर्बाइन सोल्यूशन्स देते. तसेच, बायोमास, वेस्ट-टू-एनर्जी, वेस्ट हीट रिकव्हरी, जिओथर्मल, सिमेंट, स्टील, पेट्रोकेमिकल्स, टेक्सटाइल, पल्प आणि पेपर आणि इतर उद्योगांना सेवा देते. कंपनी जागतिक स्तरावर त्रिवेणी आणि त्रिवेणी टर्बाइनव्यतिरिक्त इतर उद्योगांना प्रतिबंधात्मक देखभाल, एएमसी, नूतनीकरण, अद्ययावतीकरण, हाय-स्पीड बॅलन्सिंग, कंपन विश्लेषण, सुटे भाग पुरवठा, टर्नकी ओव्हरहॉल, रेट्रोफिटिंग, ऑटोमेशन आणि कार्यक्षमता ऑप्टिमायझेशन सेवा पुरवते. कंपनीच्या बेंगळूरुमध्ये पिन्या आणि सोमपुरा येथे दोन प्रमाणित सुविधा केंद्रे आहेत. तसेच कंपनीचे जगभरात ८० हून अधिक देशांमध्ये ६,००० हून अधिक स्टीम टर्बाइन असून १६ गिगावाॅटपेक्षा जास्त एकत्रित वीजनिर्मिती क्षमता आहे.

उत्पादन पोर्टफोलिओ

अ) औद्योगिक स्टीम टर्बाइन (१०० मेगावाॅटपर्यंत)

– बॅक प्रेशर स्टीम टर्बाइन, कंडेन्सिंग स्टीम टर्बाइन, एपीआय (अमेरिकन पेट्रोलियम इन्स्टिट्यूट) अनुरूप टर्बाइन, न्यूक्लियर टर्बाइन, टर्बो पंप्स इ.

ब) रिन्यूएबल पॉवर टर्बाइन

– बायोमास, कचरा-ते-ऊर्जा (वेस्ट टू एनर्जी), वेस्ट हीट रिकव्हरी, जिओ-थर्मल

क) विक्रीपश्चात सेवा

– प्रतिबंधात्मक देखभाल, दीर्घकालीन सेवा करार, अपग्रेड आणि नूतनीकरण, हाय-स्पीड बॅलन्सिंग, स्पेअर पार्ट्स आणि टर्नकी सोल्यूशन्स

महसूल विभाजन

कंपनीच्या एकूण महसुलापैकी उत्पादन महसूल ६८ टक्के असून उर्वरित विक्रीनंतरच्या सेवासंबंधित महसूल ३२ टक्के आहे. तर ४८ टक्के महसूल निर्यातीतून होतो. कंपनीची जागतिक स्तरावर ८० हून अधिक देशांमध्ये उपस्थिती आहे. भारत, ब्रिटन, दुबई, दक्षिण आफ्रिका आणि अमेरिका येथे विक्री आणि सेवा कार्यालये आहेत.

मार्च २०२५ अखेर सरलेल्या आर्थिक वर्षात कंपनीच्या उलाढालीत २१ टक्के वाढ झाली असून ती २००६ कोटी रुपयांवर पोहोचली आहे तर नक्त नफ्यात गत वर्षीच्या तुलनेत ३३ टक्के वाढ होऊन तो ३५८.६ कोटी रुपये झाला आहे. कंपनीच्या उत्पादनांना वाढती मागणी असून ३१ मार्च २०२५ पर्यंत कंपनीकडे १९०० रुपयांचे कार्यादेश होते. जागतिक बाजारपेठेत कंपनीची वाढती उपस्थिती, अक्षय्य ऊर्जेची वाढती मागणी, ऊर्जा कार्यक्षमता, कचऱ्यापासून ऊर्जा आणि विकेंद्रित ऊर्जा उपायांसह, त्रिवेणी टर्बाइन्ससाठी मोठ्या प्रमाणात वाढीच्या संधी आहेत.

या संधींचा फायदा घेतल्यास, कंपनीला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर, येत्या काही वर्षांत वाढ आणि नफा टिकवून ठेवता येईल. कंपनी कार्बन -आधारित ऊर्जा साठवण उपायांसह ऊर्जा संक्रमण तंत्रज्ञान विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करते. एनटीपीसी कुडगी सुपरक्रिटिकल थर्मल पॉवर प्रकल्पामध्ये २.९ अब्ज रुपये गुंतवणूक करून एक मोठा विस्तार प्रकल्प उभारत आहे. या प्रकल्पाची क्षमता १६० मेगावाॅट प्रतितास आहे. सध्या ६५० रुपयांच्या आसपास उपलब्ध असलेला त्रिवेणी टबाइन्स एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून तुमच्या पोर्टफोलिओला भक्कम आधार ठरू शकेल.

शेअर बाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सध्याच्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्या टप्प्यात शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.

त्रिवेणी टर्बाइन लिमिटेड (बीएसई कोड ५३३६५५)

वेबसाइट: www.triveniturbines.com

प्रवर्तक: ध्रुव साहनी

बाजारभाव: रु. ६४४/-

प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: पॉवर प्लँट्स/ इलेक्ट्रिकल इक्विपमेंट

भरणा झालेले भाग भांडवल: रु. ३१.८० कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक ५५.८४

परदेशी गुंतवणूकदार २८.००

बँक/ म्युच्युअल फंड/ सरकार १०.६३

इतर/ जनता ५.५३

पुस्तकी मूल्य: रु.

दर्शनी मूल्य: रु. १/-

लाभांश: ४००

प्रति समभाग उत्पन्न: रु. ११.२

किंमत उत्पन्न गुणोत्तर: ५७.४

समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: ५९

डेट इक्विटी गुणोत्तर: ०.०३

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: १६९

रिटर्न ऑन कॅपिटल एम्पाॅइड (आरओसीई): ४४.२

बीटा : १.२

बाजार भांडवल: रु. २०,४८६ कोटी (लार्ज कॅप)

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: ८८५/४५५

गुंतवणूक कालावधी : ३६ महिने

अजय वाळिंबे

Stocksandwealth@gmail.com

• वरील लेख केवळ विश्लेषणात्मक संशोधन असून तो गुंतवणूक सल्ला नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

• प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या ०.१% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. • लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.