UPI digital payment भीम/ गुगलपे/ फोनपे यासारख्या युपीआय अॅपच्या माध्यमातून होणारे पेमेंट जलद, सुरक्षित तसेच अगदी सहजगत्या कोणासही करता येत असल्याने जनसामन्यांकडून या पेमेंट पद्धतीस दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत आहे. असे असले तरी युपीआय पेमेटसाठी एनपीसीआयने प्रती व्यवहार व प्रतीदिन काही मर्यादा ठरवून दिल्या आहे. यामुळे काही महत्वाची तसेच तातडीची मोठ्या रकमेची पेमेंट युपीआय मार्फत करता येत नसल्याचे लक्षात आल्याने एनपीसीआयने यात काही बदल केले असू या बदलांनुसार काही ठराविक प्रकारची पेमेंट करण्यासाठी प्रती व्यवहार व प्रतीदिन एकूण पेमेंटची मर्यादा आता वाढविण्यात आली आहे व याची अंमलबजावणी आता सुरू झाली आहे.

त्यादृष्टीने कोणते व्यवहार आता किती रकमेपर्यंत करता येतील हे आपल्याला खालील तक्त्यावरून लक्षात येईल.

UPI payment
युपीआय पेमेंट, नवीन बदलांचा तक्ता

(यामध्ये सबंधित प्रकारच्या पेमेंटसाठीची आधीची मर्यादा, सुधारित वाढीव मर्यादा व एका दिवसात पेमेंट करता येणारी जास्तीत जास्त एकत्रित रक्कम यांचा समावेश आहे.)

इथे एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे की, ही वाढीव मर्यादा फक्त पी टू एम (पर्सन टू मर्चंट) मधील व्यवहारांसाठीच असणार आहे. यात सबंधित मर्चंटची सत्यता पडताळून पाहणे आवश्यक असणार आहे. पी टू पी (पर्सन टू पर्सन) थोडक्यात दोन व्यक्तींच्या मधील व्यवहारासाठी असणारी सध्याची रु.१ लाख प्रती दिन मर्यादा तशीच राहणार आहे.

UPI digital payments
युपीआय पेमेंट

या सुधारित वाढीव पेमेंट मर्यादेमुळे महत्वाची रु.५ लाखांपर्यंतची पेमेंट युपीआय द्वारा करता येणार असल्याने पेमेंटची सहजता व सुरक्षितता तर वाढेलच शिवाय यामुळे डिजिटल पेमेंटला आणखी चालनाही मिळेल.