PM Modi Speech : देशाची राजधानी दिल्लीत ध्वजारोहण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. आज १२ व्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ध्वजारोहण केलं. मोदी म्हणाले, स्वातंत्र्याचं हे पर्व १४० कोटी लोकांच्या गौरवाचं पर्व आहे. प्रत्येक मनात आशा आणि अपेक्षा आहेत. देश एकतेच्या भावनेला निरंतर बळकट करतो आहे. १४० कोटी देशवासी आज तिरंग्याच्या रंगात रंगले आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. तसंच त्यांनी या भाषणात महत्त्वाची घोषणा केली.

भारतातील नागरिकांना दिवाळीचं डबल गिफ्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की मागील आठ वर्षांत आम्ही सरकार म्हणून जीएसटी मध्ये रिफॉर्म केला आहे. आता देशभरातील कर कमी करण्याची वेळ आली आहे. आता काळाची ही मागणी आहे की पुढच्या पिढीसाठी जीएसटीची पुनर्रचना केली जावी. आम्ही यासाठी एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. त्यांनी याबाबतचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. आम्ही आता नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म घेऊन येत आहोत. येत्या दिवाळीच्या आत सगळ्या भारतवासीयांना दिवाळीचं गिफ्ट मिळणार आहे. जीवनावश्यक वस्तूंवरचे कर मोठ्या प्रमाणावर कमी करण्यात येतील. यामुळे लघू उद्योगांना लाभ मिळणार आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलं. रोजच्या वापरातील वस्तू स्वस्त होणार आहेत आणि अर्थव्यवस्थेला बळ मिळेल असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

स्वातंत्र्याचं पर्व १४० कोटी लोकांच्या गौरवाचं पर्व आहे-मोदी

देशाची राजधानी दिल्लीत ध्वजारोहण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. आज १२ व्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ध्वजारोहण केलं. मोदी म्हणाले, स्वातंत्र्याचं हे पर्व १४० कोटी लोकांच्या गौरवाचं पर्व आहे. प्रत्येक मनात आशा आणि अपेक्षा आहेत. देश एकतेच्या भावनेला निरंतर बळकट करतो आहे. १४० कोटी देशवासी आज तिरंग्याच्या रंगात रंगले आहेत. आज देशात मातृभूमीचं जयगान गायलं जातं आहे. १९४७ मध्ये अनेक शक्यतांसह, कोटी कोटी भुजांच्या सामर्थ्याने आपला देश स्वतंत्र झाला. देशाच्या आशा अपेक्षा उड्डाण घेत होत्या, मात्र आव्हानं प्रचंड प्रमाणात होती. असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

सिंधू जल करारावर भाष्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “भारतातील नागरिकांना आता समजलं आहे की सिंधू जलकरार आपल्यासाठी किती अन्यायकारक आहे. हा करार खूपच एकतर्फी आहे. भारतात उगम पावणाऱ्या नद्यांच्या पाण्यावर आपल्या शत्रू देशातील शेतकरी पिकं काढतोय आणि माझ्या देशातील शेतकरी मात्र दुष्काळाचा सामना करतोय. माझ्या देशातील जमीन तहानलेली आहे. सात दशकांपासून त्या अन्यायकारक कराराने आमचं पाणी पळवलं. परंतु, भारत आता हे सगळं सहन करणार नाही.