ChatGPT Helped Pune Man To Get Promotion: एका कंपनीत प्रोडक्ट मॅनेजर असलेल्या पुण्याच्या रोहितला नेहमी असे वाटत असे की, त्याच्या कामाची कोणीतरी स्वतःहून दखल घेतली पाहिजे. अनेक कॉर्पोरेट नोकरदारांप्रमाणे, तो मान खाली घालून प्रामाणिकपणे आपले काम करत असे आणि चांगली कामगिरीही करत असे. पण जेव्हा प्रमोशनची मागणी करण्याची वेळ यायची, तेव्हा त्याचा आत्मविश्वास डळमळीत व्हायचा.

“मी स्वतःच माझ्या कामगिरीबद्दल, योगदानाबद्दल कसे बोलू?” याची त्याला भीती वाटायची. त्यानेच त्याच्या कामगिरीबद्दल सांगितले, तर इतरांना तो गर्विष्ठ आहे असा समज होईल, अशी त्याला भीती होती. यामुळे वर्षानुवर्षे तो प्रमोशनबाबत एक शब्दही बोलला नाही. पण एका रात्री, त्याने चॅटजीपीटीची मदत घ्यायचा निर्णय घेतला.

रोहित त्याच्या कामगिरीबद्दल अस्वस्थ नव्हता. त्याने अनेक महत्त्वाचे प्रोजेक्ट्स लीड केले होते, क्लायंट रिटेन्शन सुधारले होते आणि कामाच्या पद्धतीमध्ये विविध बदल करत डझनभर तास वाचवले होते. पण त्याबद्दल बोलायचे कसे, हीच त्याची अस्वस्थता होती.

अनेक कर्मचाऱ्यांप्रमाणे, रोहितलाही त्याची कामगिरी नैसर्गिक, ठाम आणि बढाईखोर वाटणार नाही, अशा पद्धतीने मांडण्यात अडचणी येत होत्या. तो वाट पाहत होता आणि त्याच्या प्रयत्नांची व कामगिरीची कोणीतरी दखल घेईल, अशी आशा करत होता. पण तो म्हणतो त्याप्रमाणे, “असे क्वचितच घडते.”

रात्री उशिरा, निराशेच्या क्षणी रोहितने चॅटजीपीटीला एक साधी विनंती केली. त्याने सोपी, मानवी भाषा वापरून प्रमोशनसाठी पिच लिहिण्यास मदत मागितली. यानंतर चॅटजीपीटीकडून त्याला जे उत्तर मिळाले, ती फक्त एक स्क्रिप्ट नव्हती, तो एक आत्मविश्वास होता.

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये रोहितने अगदी उदारतेने चॅटजीपीटी प्रॉम्प्टदेखील शेअर केला आहे, ज्यामुळे त्याला प्रमोशनबाबत बोलण्याचा आत्मविश्वास मिळाला होता.

तुम्ही तंत्रज्ञान, मार्केटिंग, सेल्स किंवा सपोर्ट क्षेत्रात असाल, जर तुम्ही चांगले काम करत असाल पण त्याबद्दल बोलण्यास किंवा ते मांडण्यात अडचणी येत असतील, तर कदाचित योग्य प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, गेल्या काही दिवसांत फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स आणि रेडिट यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर अशा अनेक कॉर्पोरेट नोकरदारांच्या पोस्ट व्हायरल झाल्या आहेत, ज्यामध्ये त्यांनी नोकरीच्या ठिकाणी होणारा मानसिक त्रास, कामाचे दडपण, वर्क फ्रॉम होम सुविधेचा अभाव आणि इतर गोष्टींबाबतचे अनुभव शेअर केले आहेत.