रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी सातत्याने मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर आकडेवारीनिशी परखड भाष्य केलं आहे. नुकतंच त्यांनी केंद्र सरकारकडून चिप उत्पादक प्रकल्पांसाठी तब्बल ७६ हजार कोटींच्या अनुदान योजनेला मान्यता देण्याच्या धोरणावर टीका केली होती. त्याच अनुषंगाने त्यांनी देशातील रोजगारीच्या भीषण समस्येवर बोट ठेवतानाच सरकारनं आपलं प्राधान्य ठरवणं आवश्यक असल्याची गरजही व्यक्त केली आहे. रघुराम राजन यांनी त्यांच्या लिंक्डइन खात्यावर केलेल्या पोस्टमध्ये यासंदर्भात आपली भूमिका मांडली आहे.

काय आहे रघुराम राजन यांची लिंक्डइन पोस्ट?

रघुराम राजन यांनी केंद्र सरकारच्या सेमीकंडक्टर प्रकलासाठी निधी देण्याच्या निर्णयाचा समाचार या पोस्टमध्ये घेतला आहे. अवघ्या महिन्याभरापूर्वी केंद्र सरकारने तीन सेमीकंडक्टर प्लांटला मंजुरी दिली आहे. या प्लांटसाठी लागणाऱ्या एकूण १ लाख २६ हजार कोटी म्हणजे जवळपास १५ बिलियन अमेरिकन डॉलर्सच्या निधीपैकी केंद्र सरकार आपल्या अनुदानाच्या माध्यमातून तब्बल ५.८ बिलियन डॉलर्स म्हणजेच ४८ हजार कोटी रुपये उपलब्ध करून देणार आहे. ७६ हजार कोटींच्या चिप अनुदान योजनेचा भाग म्हणून ही ४८ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

Loksatta editorial Supreme court Seeks election commission over voter turnout percentage
अग्रलेख: उच्चपदस्थांची कानउघडणी!
Narendra Modi
“…तर मला फाशी द्या”, अदाणी-अंबानी मुद्द्यावरून मोदींचं थेट आव्हान; म्हणाले, “संपत्ती निर्माण करणाऱ्यांचा…”
article about farmers expect the next phase of green revolution
लेख : पाहिजे… हरित क्रांतीचा पुढचा टप्पा!
amit shah interview
“पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज पडणार नाही” म्हणणाऱ्या अरविंद केजरीवालांवर अमित शाहांची टीका; म्हणाले…
pfizer whistleblower
“मी आत्महत्या करणार नाही, जीवाचं बरंवाईट झाल्यास..”, फायजरच्या व्हिसल ब्लोअर मेलिसा यांचा व्हिडीओ व्हायरल
ajit pawar jitendra awhad 2
“पराभव दिसू लागल्यावर अजित पवारांचा नवा डाव, साखर कारखान्यातून…”, जितेंद्र आव्हाडांचा आरोप
female employee of raj bhavan filed a molestation complaint against west bengal governor
अन्वयार्थ : नारीशक्तीचा सन्मान’ अशाने वाढतो का?
Sharad Pawar, Chopda,
केंद्र सरकारकडून सत्तेचा गैरवापर, चोपड्यातील सभेत शरद पवार यांची टीका

‘मोदींचे २०४७ च्या विकसित भारताचे ध्येय मूर्खपणाचे’, रघुराम राजन यांची टीका

केंद्र सरकारच्या या निर्णयावर टीका करताना रघुराम राजन यांनी देशातील बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित केला आहे. “भारतानं अधिक ज्वलंत अशा गरजांवर सध्या लक्ष केंद्रीत करणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ चिप उत्पादकांना अनुदानाच्या माध्यमातून गोंजारण्याऐवजी सर्वोत्तम दर्जाचे वैज्ञानिक घडवण्यासाठी महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्पेक्ट्रोमीटर्स बसवण्याला केंद्रानं प्राधान्य द्यायला हवं”, असं रघुराम राजन म्हणाले.

चिप बनवायच्याच नाहीत असं नाही, पण…

दरम्यान, रघुराम राजन यांनी चिप उत्पादनामध्ये गुंतवणूक करायचीच नाही असा मुद्दा नसल्याचंही स्पष्ट केलं आहे. “असं करायचं म्हणजे भारतानं कधीच चिप उत्पादन करायचंच नाही, असं अजिबात नाही. पण आजघडीला जिथे प्रत्येक देश हीच गोष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करत असताना आपण त्यात उतरणं फायदेशीर ठरणार नाही”, असं रघुराम राजन यांनी त्यांच्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

विश्लेषण : ‘हिंदू विकास दर’ म्हणजे काय? रघुराम राजन यांच्या विधानाला कुणाचा विरोध?

“केंद्र सरकार नेमक्या कोणत्या उद्योगात, क्षेत्रात किंवा फर्ममध्ये कोणत्या निकषांच्या आधारावर गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतं, हे अद्याप नेमकेपणानं स्पष्ट होऊ शकलेलं नाही. कारण आपल्याकडे लोकांना रोजगार पुरवण्याचं सर्वात महत्त्वाचं आव्हान समोर असताना चिप उत्पादन क्षेत्र हे नक्कीच मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करणारं क्षेत्र नाही”, असंही रघुराम राजन म्हणाले.