स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ही रिजर्व बँक ऑफ इंडिया (RBI) पेक्षा अधिक मोठी आहे असं आजही आपल्याकडे गंमतीत म्हंटलं जातं. अर्थात दोन्ही बँकांचे मुख्य उद्देश हे पूर्णपणे वेगळे आहेत हे सर्वश्रुत आहेच, पण SBI ही भारतात सर्वदूर आणि अगदी तळागाळापर्यंत पोहोचलेली बँक आहे. एकूणच या सरकारी बँकेतील कारभारावरुन, तिथल्या कर्मचाऱ्यांवरुन बरेच विनोद आपण ऐकले असतील, पण याच बँकेत एक नोकरी करणारी व्यक्ती भविष्यात या बँकेचे अध्यक्ष (चेअरमन) झाल्याचंही आपण पाहिलं आहे.

SBI चे माजी अध्यक्ष (चेअरमन) रजनीश कुमार यांनी नुकतंच यूट्यूबर राज शमानी याच्या पॉडकास्टवर हजेरी लावली अन् कर्मचारी ते चेअरमन असा त्यांचा बँकेतील प्रवास यावर प्रकाश टाकला. या मुलाखतीमध्ये त्यांनी सध्याची देशाची आर्थिक स्थिति यावर भाष्य केलं आहे. तसेच बँकेला लुबाडून गेलेल्या विजय माल्यासारख्या लोकांविरोधात बँक नेमकी काय कारवाई करते, त्या तोट्यामुळे बँकेला कसा फटका बसतो याबद्दलही त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

BJP ignores the issues of inflation and unemployment Congress alleges in nashik
भाजपकडून महागाई, बेरोजगारीच्या मुद्यांना बगल; काँग्रेसचा आरोप
women office bearers of Thackeray group in Kalyan join Shindes Shiv Sena
कल्याणमध्ये ठाकरे गटाला धक्का, महिला पदाधिकाऱ्यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश
BJP needs support from MNS A look at Raj Thackeray stance on participation in the Grand Alliance
भाजपला मनसेची साथ हवी ; महायुतीतील सहभागाबद्दल राज यांच्या भूमिकेकडे लक्ष
Wrong campaign, gangster type people
कल्याण पूर्वेत गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून खासदार शिंदेंचा अपप्रचार, भाजपच्या वरिष्ठांनी दखल घेण्याची जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे यांची मागणी

आणखी वाचा : ऑनलाइन गेमिंगवरील २८ टक्के जीएसटी कायम, अंमलबजावणीबाबत चर्चा करण्यासाठी परिषदेची २ ऑगस्टला बैठक

रजनीश यांनी या मुलाखतीमध्ये एसबीआयच्या चेअरमनला मिळणारा पगार आणि इतर सुविधा याबाबतही खुलासा केला आहे. “मध्यंतरी पेपरमध्ये छापून आलं होतं की एसबीआयच्या चेअरमनचा पगार हा ३६ लाख असतो, माझा पगार तेव्हा बहुतेक २८ लाख होता. याबरोबरच तुम्हाला घरही दिलं जातं, मालाबार हील्सच्या परिसरात एसबीआय चेअरमनचा जो बंगला आहे तो आज भाड्यावर द्यायचा म्हंटलं तर त्याचं भाडं किमान दोन ते अडीच कोटी असेल. शिवाय ३० ते ४० लाखापर्यंत एखादी चारचाकी तुम्ही घेऊ शकता. इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे वैद्यकीय सोयी सुविधाही मिळतात.”

निवृत्तीनंतर निर्माण होणाऱ्या समस्येबद्दल बोलताना रजनीश म्हणाले, “जे लोक पब्लिक सेक्टरमध्ये इमानदारीने नोकरी करतात त्यांना निवृत्तीनंतर बराच प्रॉब्लेम होतो, कारण त्यानंतर एखादं चांगलं घर घेऊन तिथे राहण्यापुरते पैसेदेखील बऱ्याच लोकांकडे नसतात. वर सांगितलेल्या सोयी सुविधा आहेत त्या तोवरच तुम्हाला मिळणार जोवर तुम्ही नोकरी करत आहात, त्याच्यानंतर काय हा एक मोठा प्रश्न आपल्यासमोर असतो. शिवाय एसबीआयच्या चेअरमनला इतरांच्या मनाने पेंशनही कमी मिळतं, मला वाटतं की १ लाख पेंशन मिळत असेल, पण तेवढ्यात आजकाल कोणाचं भागतंय?”

आणखी वाचा : बँकांनी नऊ वर्षांत १० लाख कोटींहून अधिक थकीत कर्जे केली वसूल : RBI

एकंदर बँकेला होणारा नफा, कामाचा व्याप आणि तणाव हे सगळं पाहता हा पगार फार कमी आहे असंही रजनीश यांनी या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं आहे. मध्यंतरी अशनीर ग्रोव्हारच्या ‘भारत पे’ या फीनटेक स्टार्टअप मध्येही रजनीश यांना चेअरमन पद देण्यात आलं होतं. या मुलाखतीमध्ये त्यांनी ‘भारत पे’ आणि अशनीर ग्रोव्हरच्या प्रकरणावरही उघडपणे भाष्य केलं आहे.