लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : नव्या युगाच्या रोकडरहित, डिजिटल व्यवहारांच्या गतिमान स्वीकृतीस कारणीभूत ठरलेल्या युनिफाइड पेमेंट इंटरफेस अर्थात यूपीआयच्या माध्यमातून होणारे देयक व्यवहार हे सामान्य ग्राहकांसाठी निःशुल्कच असतील, असा खुलासा या प्रणालीचे व्यवस्थापन पाहणाऱ्या नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) बुधवारी स्पष्ट केले.

disability certificates, disabled persons,
‘ऑनलाइन’ सरकारी खोळंबा अन् केंद्रीय मंत्रालयाकडे बोट!
Upasana Makati, White Print, first Braille magazine, visually impaired people
दृष्टीहिनांसाठी पहिलं ब्रेल मासिक काढणारी उपासना मकाती
rto make changes in driving learning licence process
शिकाऊ वाहन परवाना प्रक्रियेत आरटीओकडून बदल; आता काय होणार?
onion crisis central government lifts ban on onion export before lok sabha poll
ही निवडणूकसुद्धा कांद्याची!
RBI orders banks to refund excess interest charged to customers
वसूल केलेले जास्तीचे व्याज ग्राहकांना परत करण्याचे बँकांना आदेश; रिझर्व्ह बँकेचा व्याज वसुलीच्या बँकांतील कुप्रथांवर प्रहार
The Hindustan Urvarak And Rasayan Limited Apply Online for 80 Various Posts Vacancies Check all the detailed
HURL Recruitment 2024 : एचयूआरएल अंतर्गत ‘या’ पदांसाठी होणार भरती; महिना १६ लाख पगार; जाणून घ्या शेवटची तारीख
Commodity SEBI Developed Commodity Futures Market print eco news
क… कमॉडिटीचा : हवामान वायद्यासाठी ‘सेबी’ने तत्परता दाखवावी
RRB Recruitment 2024
RRB Recruitment 2024: रेल्वे विभागात काम करण्याची सुवर्णसंधी; ८ हजारांवर टीटीई पदांसाठी बंपर भरती; ‘या’ तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु

यूपीआयद्वारे एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात पैशांचे हस्तांतरण विनामूल्य राहील; परंतु दोन भिन्न ‘ई-वॉलेट’दरम्यान होणारे कोणतेही २,००० रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या प्रत्येक व्यापारी देयक व्यवहारासाठी १.१ टक्के दराने ‘इंटरऑपरेबल शुल्क’ १ एप्रिलपासून आकारले जाईल आणि ते व्यापाऱ्याकडून देय असेल, असेही एनपीसीआयने स्पष्ट केले आहे.

एनपीसीआयच्या खुलाशानुसार, शनिवारपासून लागू होणारे ‘इंटरऑपरेबल शुल्क’ फक्त प्रीपेड पेमेंट (पीपीआय) साधनांमार्फत होणाऱ्या व्यापारी व्यवहारांसाठी लागू असेल आणि ग्राहकांना त्यासाठी कोणतेही शुल्क बसणार नाही. सोप्या शब्दांत सांगायचे, तर एका विशिष्ट कंपनीचे ‘ई-वॉलेट’ असलेला ग्राहक दुसऱ्या कंपनीचे वॉलेट असलेल्या व्यापाऱ्याला पैसे प्रदान करतो तेव्हा हे शुल्क लागू होईल. हे शुल्क दोन वॉलेटमधील परस्पर विनिमय किंवा परस्पर व्यवहाराच्या खर्चासाठी लागू करण्यात आले आहे. सध्या फोन पे, गूगल पे, पेटीएम, ॲमेझॉन पे, क्रेड पे वगैरे देयक व्यवहारांसाठी सर्वाधिक वापरात येणारे मोबाइल-वॉलेट आहेत.