कोळशाच्या किमती वाढवण्यासाठी चांगली स्थिती आहे आणि ती लवकरच वाढवली जाऊ शकते, त्यासाठी संबंधितांशी चर्चा सुरू आहे, अशी माहिती कोल इंडियाचे अध्यक्ष प्रमोद अग्रवाल यांनी दिली. खाण क्षेत्रातील दिग्गज कंपनी २०२५-२६ पर्यंत एक अब्ज टन उत्पादनाचे लक्ष्य गाठेल. गेल्या पाच वर्षांत असे घडलेले नाही, म्हणून कोळशाच्या किमती वाढण्याचे एक चांगले प्रकरण आहे. यंदा वेतनाबाबतही चर्चा झाल्या आहेत, ज्याचा CILच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होईल, विशेषत: काही उपकंपन्यांमध्ये जेथे मनुष्यबळाचा खर्च खूप जास्त आहे, त्याला फटका बसेल, असंही ते म्हणालेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किमती न वाढवल्यास अनेक समस्या निर्माण होतील

“किमती वाढवल्या नाहीत तर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. याबाबत संबंधितांशी चर्चा सुरू आहे. ते लवकरच त्यावर तोडगा काढली, अशी माहिती अग्रवाल यांनी कोलकाता येथे एमजंक्शनने आयोजित केलेल्या इंडियन कोल मार्केट समिटच्या वेळी दिली. देशाची ऊर्जा संसाधने सुरक्षित होईपर्यंत देशाचा विकास होऊ शकत नाही.

एक अब्ज टन उत्पादनाचे उद्दिष्ट स्पष्ट करताना ते म्हणाले की, कोल इंडिया २०२५-२६ पर्यंत ते साध्य करण्याच्या मार्गावर असली तरी ते देशाची गरज आणि खासगी क्षेत्राची वाढ यांसारख्या घटकांवर अवलंबून असेल. उत्पादन करण्याची तयारी महत्त्वाची आहे, असेही ते म्हणालेत. कोणत्याही देशाची ऊर्जा संसाधने सुरक्षित होईपर्यंत विकास होऊ शकत नाही. गरज पडल्यास त्यासाठी तयार राहावे लागेल. त्यानुसार उत्पादन किती करायचे हे ठरवले जाऊ शकते, अशी माहितीही कोल इंडियाच्या प्रमुखांनी दिली आहे. २०३० पर्यंत कोळसा उत्पादन सध्याच्या २५-३० कोटी टनांवरून १०० कोटी टनांपर्यंत वाढवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Well positioned to raise coal prices chairman of coal india said pramod agarwal vrd
First published on: 20-03-2023 at 19:16 IST