Premium

‘मोदी सरकार सत्तेत असो वा नसो, अदाणी समूहाच्या कंपन्यांवर कोणताही परिणाम होणार नाही,’ राजीव जैन यांचा मोठा दावा

Rajiv Jain On Modi Government : हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर गुंतवणूकदारांचा अदाणी समूहावरील विश्वास उडाला होता. अशा काळात राजीव जैन यांनीच गुंतवणूक सुरू केली आणि गुंतवणूकदारांना समूहावर विश्वास ठेवण्याचे योग्य कारण मिळाले.

Rajiv Jain On Modi Government
राजीव जैन यांचा मोठा दावा

Rajiv Jain On Modi Government : गौतम अदाणी यांचे अमेरिकन मित्र आणि GQG पार्टनर्सचे प्रमुख राजीव जैन यांनी अदाणी समूहाबद्दल एक महत्त्वाचे विधान केले आहे. यावेळी जैन यांनी थेट मोदी सरकारलाच मध्ये आणत अदाणींची पाठराखण केलीय. मोदी सरकार सत्तेत असो अथवा नसो, अदाणी समूहाच्या कंपन्या कायम मजबूत राहतील, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. खरं तर राजीव जैन यांचं विधान गांभीर्याने घेण्याची गरज आहे. मार्चपासून राजीव जैन यांनी अदाणी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये २.५ बिलियन डॉलरची गुंतवणूक केली आहे. तेव्हापासून अदाणी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सुधारणा होऊ लागली आहे. सध्या अदाणी समूहाचे बाजारमूल्य १० लाख कोटींच्या आसपास आहे. हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर गुंतवणूकदारांचा अदाणी समूहावरील विश्वास उडाला होता. अशा काळात राजीव जैन यांनीच गुंतवणूक सुरू केली आणि गुंतवणूकदारांना समूहावर विश्वास ठेवण्याचे योग्य कारण मिळाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय कंपन्यांमध्ये १३ अब्ज डॉलर गुंतवणूक

राजीव जैन यांनी केवळ अदाणी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्येच गुंतवणूक केली नाही, तर देशातील अनेक कंपन्यांमध्ये त्यांची मोठी गुंतवणूक आहे. इकोनॉमिक्स टाइम्सच्या अहवालानुसार, राजीव जैन यांनी देशातील विविध कंपन्यांच्या शेअर्समध्ये १३ बिलियन डॉलरची गुंतवणूक केली आहे. जर आपल्याला त्यांनी गुंतवणूक केलेल्या कंपन्यांबद्दल बोलायचे झाल्यास त्यांनी ITC, सन फार्मा, स्टेट बँक ऑफ इंडिया, ICICI बँक आणि HDFC बँकेमध्येही मोठी गुंतवणूक केली आहे.

अदाणींची जादू कायम राहण्याची शक्यता

आता ते भारतात आणखी गुंतवणूक करण्याचा विचार करीत आहेत. ते अदाणी समूहाच्या कंपन्यांवर सतत विश्वास दाखवत असून, अदाणींच्या कंपन्यांवरील जोखीम त्यांनी नाकारली आहे. राजीव जैन यांनी एका मुलाखतीत सांगितले की, भारतात मोदी सरकार सत्तेत राहो अथवा न राहो, अदाणी समूहाच्या कंपन्या वाढतच राहतील. भारतातील खासगी बँका, आयटी कंपन्या आणि ग्राहक कंपन्यांवर त्यांचा पूर्ण विश्वास आहे. आता इन्फ्रा देशाच्या विकासात नवे आयाम प्रस्थापित करू शकते, असंही ते त्यांच्या मुलाखतीदरम्यान म्हणालेत.

हेही वाचाः मुकेश अंबानींच्या रिलायन्सला पछाडत ‘ही’ कंपनी बनली देशातील नंबर वन

भारताच्या पायाभूत क्षेत्रात अदाणींचे मोठे योगदान

हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदाणी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. गुंतवणूकदारांचा विश्वास पूर्णपणे उडाला होता. त्यानंतर राजीव जैन यांनी अदाणी समूहाच्या शेअर्समध्ये १५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. मार्चपासून आतापर्यंत राजीव जैन यांनी अदाणी समूहाच्या शेअर्समध्ये २.५ बिलियन डॉलरची गुंतवणूक केली आहे. देशाच्या पायाभूत क्षेत्रात अदाणी समूहाचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे त्यांनी आपल्या मुलाखतीत सांगितले. त्याचा मोदी सरकारशी काहीही संबंध नाही. मोदी सरकार सत्तेत राहो वा न राहो, अदाणीच्या कंपन्यांच्या आरोग्यावर कोणताही परिणाम होणार नसल्याचंही त्यांनी ठामपणे सांगितलं आहे.

हेही वाचाः SBI कडे सर्वाधिक कोणीही दावा न केलेले पैसे; RBI कडून ‘100 Days 100 Pays’ मोहीम सुरू

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-06-2023 at 14:00 IST
Next Story
मुकेश अंबानींच्या रिलायन्सला मागे टाकत ‘ही’ कंपनी बनली देशातील नंबर वन