अथर्व कॉलेज ऑफ इंजिनीअिरगमध्ये  २६ ते २८ सप्टेंबर या कालावधीत टेकिथॉन फेस्ट आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये टेकिथॉनची ‘मँरिझॉना’ हा विषय घेण्यात आला असून हा विषय समुद्राशी संबंधित असून फेस्टमध्ये बंदर, नौका व समुद्र  या संबंधातील नवीन तंत्रज्ञानाचे प्रकल्प तयार करण्यात आले आहेत. मुंबई बंदरातील काम सुरळीत व सुव्यवस्थित चालावे म्हणून टेक्नॉलॉजी तयार करणे हा मँरिझॉना या विषयाचा मुख्य हेतू आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांनी काही नावीन्य असे वìकग प्रोजेक्ट बनविले. यामध्ये अ‍ॅण्टी कॉलीजन डिव्हाइसमुळे जहाजांमधील टक्कर टाळणे संभव होऊ शकेल. या सगळ्या प्रोजेक्टमुळे पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही.

टेकीथॉनचे मुख्य ध्येय हे तरुण पिढीला नावीन्य टेक्नॉलॉजी व शोध-तंत्रज्ञान संबंधित जागृत करून त्यांना कलाकृती व नवीन प्रकल्प सादर करण्यासाठी एक व्यासपीठ देण्याचे आहे. या टेकीथॉनमध्ये इंटर-कॉलिजीएट स्पर्धा ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये वेगवेगळ्या महाविद्यालयातील विद्यार्थी भरभरून प्रतिसाद देत असल्याचा विद्यार्थ्यांचा अनुभव आहे. या वेळी विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी सी.एस. गो, डॉटा २ आणि निऑन क्रिकेट व फुटबॉल आयोजित करण्यात आले आहे. तसेच पेंटबॉल व सध्या तरुणाईला वेड लावणाऱ्या पॉकेमोन गो शी संबंधित इव्हेंट पॉकेवॉक तसेच विविध सेमिनार व वर्कशॉप आयोजित करण्यात आले आहे.