डिझायनिंग हे अत्यंत सर्जनशील क्षेत्र मानले जाते. डिझायनिंगच्या विविध विद्याशाखांचे प्रशिक्षण देणाऱ्या शिक्षणसंस्थांमधील आघाडीचं नाव आहे नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ डिझायनिंगचे! या संस्थेत उपलब्ध असणाऱ्या विविध अभ्यासक्रमांची सविस्तर ओळख-
केंद्र सरकारने अहमदाबाद येथील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन या संस्थेचा समावेश ‘इन्स्टिटय़ूटस् ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स’मध्ये केला आहे. या संस्थेचा परिचय, तेथील शिक्षणक्रम, प्रवेशाचे निकष आणि रोजगाराच्या संधींबद्दल जाणून घेऊ या.
केंद्र सरकारच्या व्यापार आणि उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या या संस्थेची स्थापना
१९६१ साली झाली. येथे डिझाइन (आरेखन, आकृतिबंध) क्षेत्रातील विषयांचे बहुशाखीय प्रशिक्षण दिले जाते. ही संस्था डिझाइन संदर्भातील संशोधन आणि विकसन कार्यात देशातील आघाडीची संस्था
मानली जाते.
संस्थेतील शिक्षणक्रम
ग्रॅज्युएट डिप्लोमा प्रोग्राम इन डिझायिनग (जीडीपीडी) : कालावधी- सहा महिन्यांची आठ सत्रे. यांतील एका सत्रात प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळवावा लागतो. या शिक्षणक्रमांतर्गत तीन वेगवेगळ्या विद्याशाखा आणि एकूण आठ अभ्यास विषयांचा अंतर्भाव होतो.
* इंडस्ट्रिअल डिझाइन (औद्योगिक आरेखन)- प्रॉडक्ट डिझाइन, फíनचर, इंटिरिअर डिझाइन, सिरॅमिक अॅण्ड ग्लास डिझाइन.
* कम्युनिकेशन डिझाइन- ग्राफिक डिझाइन, अॅनिमेशन फिल्म डिझाइन, फिल्म अॅण्ड व्हिडीओ कम्युनिकेशन, एक्झिबिशन डिझाइन.
* टेक्स्टाईल अॅण्ड अॅपरल डिझाइन-
टेक्स्टाईल डिझाइन.
वरील अभ्यासक्रमांसाठी किमान पात्रता खालीलप्रमाणे आहे- उमेदवार मान्यताप्राप्त महाविद्यालयाच्या कोणत्याही शाखेतून किमान ५० टक्के गुण मिळवून बारावी उत्तीर्ण असावेत. विद्यार्थ्यांचे वय २० वर्षांपेक्षा अधिक नसावे.
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा प्रोग्राम इन डिझायिनग (पीजीडीपीडी) : या शिक्षणक्रमात क्रमिक विषयांविषयी विद्यार्थ्यांमध्ये संशोधनात्मक दृष्टिकोन विकसित केला जातो. विविध प्रकल्प (प्रोजेक्ट्स), असाईनमेंट्स यांचा समावेश अभ्यासात केलेला असतो.
किमान पात्रता- ज्या विषयात पदव्युत्तर शिक्षण घ्यायचे आहे, त्या विषयात मान्यताप्राप्त महाविद्यालयातून पदवी संपादन केलेली असणे आवश्यक आहे. इच्छुक विद्यार्थ्यांचे वय ३० पेक्षा अधिक नसावे.
संस्थेच्या शाखा
अहमदाबाद, गांधीनगर, बंगळुरू या ठिकाणी संस्थेच्या तीन शाखा आहेत.

अहमदाबाद शाखेतील शिक्षणक्रम : प्रॉडक्ट डिझाइन, फíनचर, इंटीरिअर डिझाइन, सिरॅमिक अॅण्ड ग्लास डिझाइन, ग्राफिक डिझाइन, अॅनिमेशन फिल्म डिझाइन, फिल्म अॅण्ड व्हिडीओ कम्युनिकेशन, टेक्स्टाईल विषयातील पदवी किंवा पदविका अभ्यासक्रम.
बंगळुरू शाखेतील शिक्षणक्रम : इन्फॉम्रेशन अॅण्ड इंटरफेस डिझाइन, डिझाइन फॉर डिजिटल एक्सपिरिअन्स, डिझाइन फॉर रिटेल एक्सपिरिअन्स या विषयातील पदवी किंवा पदविका अभ्यासक्रम.
गांधीनगर शाखेतील शिक्षणक्रम : ट्रान्सपोर्टेशन अॅण्ड ऑटोमोबाईल डिझायनिंग, टॉय/गेम डिझायनिंग, फोटोग्राफी डिझायनिंग, अॅपरल डिझायनिंग, लाइफस्टाइल अॅक्सेसरी डिझायनिंग, न्यू मीडिया डिझाइन, स्ट्रेटेजिक डिझाइन मॅनेजमेंट या विषयांतील पदवी किंवा पदविका अभ्यासक्रम.
वरीलपकी कोणत्याही शिक्षणक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘डिझाइन अॅप्टिटय़ूड टेस्ट’ ही सामायिक परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत, परीक्षेची किंवा प्रवेशासंबंधी माहिती यासाठी खालील संकेतस्थळावर संपर्क साधावा. (सामान्यत: ही प्रक्रिया नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत पार पडते.)
‘जीडीपीडी’ अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा ११ जानेवारी २०१५ ला होणार आहे. ‘पीजीडीपीडी’ अभ्यासक्रमासाठी प्रवेशपरीक्षा १० जानेवारी २०१५ रोजी होईल. वेबसाईट- http://www.nid.edu एक्स्चेंज प्रोग्राम
संस्थेच्या देश-परदेशातील काही निवडक विद्यापीठांशी असलेल्या सहकार्य करारान्वये (एमओयू) स्टुडन्ट एक्स्चेंज, जॉइंट रिसर्च प्रोग्राम, चर्चासत्रे, परिसंवादामधून सहभागी होता येते आणि डिझाइन क्षेत्रातील आपली कामगिरी जगापुढे मांडण्याची संधी मिळते.
उपलब्ध करिअर संधी
संस्थेतील प्रशिक्षार्थीना प्रशिक्षणाअंती प्रगतीच्या उत्तमोत्तम संधी मिळाव्यात, या उद्देशाने संस्थेत स्वतंत्र रोजगार केंद्र कार्यरत आहे. औद्योगिक क्षेत्रातील विविध कंपन्यांकडून येथील विद्यार्थ्यांना ‘कॅम्पस इंटरव्ह्य़ू’द्वारे नोकरीच्या संधी चालून येतात.
अन्य सेवा
इंटग्रेटेड डिझाइन सर्वसेिस- ग्राहक कंपन्यांना डिझायनिंगविषयक सल्ला, डिझाईन क्षेत्राशी निगडित अडचणी व्यावसायिकरीत्या सोडवण्याचे काम संस्थेतर्फे केले जाते.
आउटरीच प्रोग्राम- या अंतर्गत संस्थेच्या सेवा, अनुभव हे समाजाच्या अन्य घटकांसाठी उपयोगात आणले जातात. गरज भासेल त्यानुसार डिझायिनग विषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी कार्यक्रम आखले जातात.
इंडस्ट्री प्रोग्राम्स- औद्योगिक क्षेत्रात असलेल्या तसेच भविष्यातील संभाव्य स्पध्रेचा विचार करून संस्थेतर्फे उत्पादन आणि उत्पादन प्रक्रियेतील डिझाइन विषयांसंदर्भात कार्यक्रम आणि चर्चासत्रे आखली जातात.
प्लेसमेंटस्- प्रशिक्षणार्थी आणि औद्योगिक क्षेत्रे यांत संवाद घडवण्यासाठी संस्थेतर्फे क्लासरूम प्रोजेक्ट, इंडस्ट्रिअल ट्रेिनग इंटर्नशिपसारखे काही उपक्रम राबवले जातात. या माध्यमातून सक्षम विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रात नोकरी आणि करिअरच्या विविध संधी उपलब्ध होऊ शकतात.