05 March 2021

News Flash

रेल्वे इंजिनीअरिंगमधील पदविका अभ्यासक्रम

अर्जदार इंजिनीअरिंगमधील पदवीधर, पदविकाधारक अथवा गणित- विज्ञान विषयांसह बीएस्सी पात्रताधारक असावेत.

(संग्रहित छायाचित्र)

रेल्वे मंत्रालयांतर्गत कार्यरत असणाऱ्या इन्स्टिटय़ूट ऑफ पर्मनंट वे इंजिनीअर्स, नवी दिल्ली येथे दूरस्थ शिक्षण पद्धतीने देण्यात येणाऱ्या रेल्वे इंजिनीअरिंगमधील पदविका अभ्यासक्रमाच्या २०१८-१९ या शैक्षणिक सत्रासाठी प्रवेश घेण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक अर्जदारांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता – अर्जदार इंजिनीअरिंगमधील पदवीधर, पदविकाधारक अथवा गणित- विज्ञान विषयांसह बीएस्सी पात्रताधारक असावेत.

अर्ज व माहितीपत्रक- प्रवेश अर्ज व माहिती पत्रकासाठी २०० रु.चा आयपीडब्ल्यूई (इंडिया) च्या नावे असणारा व नवी दिल्ली येथे देय असलेला डिमांड ड्राफ्ट विनंती अर्ज व स्वत:चा पत्ता व नाव असलेला २५ सेंमी x १५ सेंमी आकाराच्या लिफाफ्यासह इंस्टिटय़ूटच्या कार्यालयाकडे पाठवावा.

अधिक माहिती व तपशील- अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २८ जुलै ते ३ ऑगस्ट २०१८ च्या अंकात प्रकाशित झालेली इंस्टिटय़ूट ऑफ परमनंट वे इंजिनीअर्सची जाहिरात पाहावी अथवा इंस्टिटय़ूटच्या http://www.ipweindia.com/  या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख- संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे प्रवेश अर्ज इंस्टिटय़ूटच्या ऑफ परमनन्ट वे इंजिनीअर्स (इंडिया), रूम नं. १०९, नॉर्थ सेंट्रल रेल्वे प्रोजेक्ट युनिट बिल्डिंग, शंकर मार्केटच्या मागे, नवी दिल्ली- ११०००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०१८ आहे.

– दत्तात्रय आंबुलकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2018 4:00 am

Web Title: article about diploma course in railway engineering
Next Stories
1 कला नियोजन आणि संधी
2 करिअर वार्ता : शिक्षणासाठी लॉटरीचा आधार
3 एमपीएससी मंत्र : मुख्य परीक्षेनंतर..
Just Now!
X