श्रीकांत जाधव

महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा २६ मे २०१९ रोजी होत आहे. मराठी, इंग्रजी व सामान्य अध्ययन हा या पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम आयोगाने विहित केला आहे. त्यातील मराठी व इंग्रजी घटकांचे सराव प्रश्न या लेखामध्ये देण्यात येत आहेत. वनसेवेबरोबरच अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्येही हे दोन घटक समाविष्ट असल्याने त्या परीक्षेसाठीही हा सराव उपयुक्त ठरेल.

*     प्रश्न १- वाक्याच्या मूळ अर्थास बाधा न आणता केलेल्या बदलास काय म्हणतात?

१) वाक्यपृथ्थकरण

२) संयुक्त वाक्य

३) वाक्य रूपांतरण

४) वरील सर्व

*     प्रश्न २ – ‘ते त्याचे घर आहे.’ या वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता आहे?

१) दर्शक विशेषण

२) सार्वनामिक विशेषण

३) संबंधी विशेषण

४) प्रश्नार्थक विशेषण

*     प्रश्न ३ – पुढीलपकी कोणत्या म्हणीचा अर्थ ‘चोराच्या मनात चांदणे’ या म्हणीशी साधम्र्य दाखवतो?

१) रात्र थोडी सोंगे फार

२) बळी तो कान पिळी

३) करावे तसे भरावे

४) खाई त्याला खवखवे

*     प्रश्न ४ – पुढीलपकी मिश्र वाक्य कोणते आहे?

अ) ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी

ब) सामना सुरू झाला आणि वीज गेली.

क) त्याने आपली चूक मान्य केली.

ड) तो काम पूर्ण होईल तेव्हा मला फोन करेल.

१) अ आणि ब   २) ब आणि क

३) अ आणि ड   ४) ब आणि ड

*     प्रश्न ५ – शब्दाचे सामान्य रूप म्हणजे ———-

१)   प्रत्यय लागल्यावर त्याच्या मूळ रूपात झालेला बदल

२) संधीच्या विग्रहातून मिळणारा स्वतंत्र शब्द

३) लिंग आणि वचन यामध्ये बदल होऊ शकणारे शब्दाचे रूप

४) मराठीमध्ये येण्यापूर्वीच संस्कृत शब्दांचे मूळ रूप

*     प्रश्न ६ – पुढीलपकी कोणत्या वाक्यामध्ये रीती वर्तमानकाळ आहे?

१) मनीषाने अभ्यास केला.        २) मी रोज व्यायाम करतो.

३) विद्यार्थ्यांनी अभ्यास केला आहे.

४) कर्मचारी जेवण करीत आहेत.

*    Que 7- Find the correct Passive form of the following sentence.

– They were checking the luggage of the travelers at airport.

1)   The luggage of the travelers was being checked by them on the airport.

2)   The travelers were checking their luggage at the airport.

3)   The luggage of the travelers at airport was checked by them.

4)   They checked the luggage of the travelers at airport.

*     Que 8 – She has given the charity to the hospital. What will be the correct question tag for this sentence?

1) isn’t it?

2) haven’t she?

3) doesn’t she?

4) hasn’t she?

*     Que 9 – He is one of the greatest leaders in History. Which of the following will be positive degree of the sentence ?

1)   No other leader in the History is greater than he is.

2)   Very few leaders in the History are as great as he is.

3)   No other leader in the History is as great as he is.

4)   He is the greatest leader in History so far.

*     Que 10 –  Which of the following sentence has auxiliary verb?

  1. We ought to respect our teachers.
  2. Every citizen should follow the rules.
  3. People need money to fulfill their needs.

1)  Only a

2) Only b and c

3) only a and b

4) only c

*     Que 11 – Which of the following is incorrect regarding a question mark?

1)   It marks the end of a sentence.

2)   It is not used in reported question.

3)   It is replaced by a full stop when a polite request is done in the form of question.

4)   It is used at the end of a question in direct speech.

*     Que 12 – Like begets like. What does the word beget mean in the sentence?

  1. follow
  2. create
  3. result
  4. produce

1) a and b         2) a and c

3) b and d         4) a and d

उत्तरे

प्र. क्र. १. योग्य पर्याय क्र.(३)

प्र. क्र. २. योग्य पर्याय क्र.(१)

प्र. क्र. ३. योग्य पर्याय क्र.(४)

प्र. क्र. ४. योग्य पर्याय क्र.(३)

प्र. क्र. ५. योग्य पर्याय क्र.(१)

प्र. क्र. ६. योग्य पर्याय क्र.(२)

प्र. क्र. ७. योग्य पर्याय क्र.(१)

प्र. क्र. ८. योग्य पर्याय क्र.(४)

प्र. क्र. ९. योग्य पर्याय क्र.(२)

प्र. क्र. १०. योग्य पर्याय क्र.(३)

प्र. क्र. ११. योग्य पर्याय क्र.(१)

प्र. क्र. १२. योग्य पर्याय क्र.(३)