डॉ. गणेश देवीदास शिंदे

विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील लेखामध्ये सामान्य अध्ययन पेपर-२ मधील आंतरराष्ट्रीय संबंध या अभ्यास घटकातील ‘भारत आणि आशिया’ या उपघटकातील यूपीएससी मुख्य परीक्षेत आलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा वेध घेतला. प्रस्तुत लेखामध्ये ‘भारत आणि जग’ या घटकावर आधारित यूपीएससी मुख्य परीक्षेत आलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा वेध घेणार आहोत.

mpsc exam preparation guidance
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – इतिहास प्रश्न विश्लेषण
loksatta analysis imd predict india to receive above normal monsoon
विश्लेषण : यंदा दमदार पावसाचा अंदाज का वर्तवला जात आहे?
Constitutional ethics Prime Minister and Chief Minister A political and constitutional issue
समोरच्या बाकावरून: घटनात्मक नैतिकता पणाला..
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

1) Indian diaspora has an important role to play in South-East Asian countries economy and society. Appraise the role of Indian diaspora in South-East Asia in this context.

या प्रश्नाच्या उत्तराच्या सुरुवातीला प्रवासी भारतीय कोणाला म्हटले जाते याविषयी सांगावे. (परदेशस्थ भारतीयांमध्ये माहिती व तंत्रज्ञान क्षेत्र, शिक्षण क्षेत्र तसेच प्रशासनातील वरिष्ठ पदावर असणारे आणि लहान लहान व्यवसायाशी संलग्न असलेल्या भारतीयांचा समावेश आहे.) यानंतर दक्षिण-पूर्व आशियामध्ये असणारा प्रवासी भारतीयांचा आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक प्रभाव थोडक्यात मांडावा. उत्तराच्या पुढील टप्प्यामध्ये दक्षिण-पूर्व आशियाशी संबंधित आसियान व पूर्व आशियाई शिखर परिषदेसारख्या संघटनांमध्ये भारताच्या वाढत्या संबंधांना परदेशस्थ भारतीयांकडून पाठबळ मिळत असल्याचे नमूद करावे. उत्तराच्या अंतिम टप्प्यात भारत व दक्षिण-पूर्व आशियाई देशांदरम्यान वाद निर्माण झाल्यास या देशातील प्रवासी भारतीयांकडून संबंध पूर्ववत करण्यासाठी केले जाणारे प्रयत्न आणि भारत एक सॉफ्ट पॉवर म्हणून बजावत असलेली भूमिका अधोरेखित करावी.

2) Evaluate the economic and strategic dimension of India’s look East Policy in the context of the Post cold war International scenario.

उत्तराच्या प्रस्तावनेमध्ये भारताच्या परराष्ट्रीय धोरणांतर्गत असलेल्या पूर्वेकडे पहा (Look East Policy) या धोरणाविषयी थोडक्यात माहिती द्यावी. उत्तराच्या पुढील टप्प्यामध्ये शीतयुद्धोत्तर काळात ‘पूर्वेकडे पहा’ या धोरणांतर्गत असलेला आíथक दृष्टिकोन स्पष्ट करावा. उदाहरणार्थ, भारताचे आसियान देशांसोबत वाढत असलेले व्यापारी व आíथक संबंध, भारताच्या पूर्वोत्तर राज्यांच्या विकासात आसियान राष्ट्रांची भूमिका, अमेरिकेसोबत उच्चस्तरीय संबंध वाढवण्यासाठी ‘पूर्वेकडे पहा’ या धोरणाचे साहाय्य इत्यादी. उत्तराच्या पुढील टप्प्यात या धोरणांतर्गत सामरिक दृष्टिकोन स्पष्ट करावा. उदाहरणार्थ, आसियान राष्ट्रांसोबत राजकीय संबंधांचे नवीनीकरण, दहशतवादाविरुद्ध लढा, सागरी सुरक्षा आणि चाचेगिरीविषयी सहयोग, संरक्षणविषयक संबंध प्रस्थापित करणे आणि चीनच्या वाढत्या प्रभावाला संतुलित करणे, इ.

उत्तराच्या अंतिम टप्प्यात भारतीय परराष्ट्रीय धोरणातील ‘पूर्वेकडे पहा’ या धोरणाने दक्षिण-पूर्व आशिया आणि प्रशांत महासागरातील देशांसोबत सलोख्याचे व घनिष्ठ संबंध स्थापित केले गेले, उदाहरणार्थ, दक्षिण चीन सागरातील भारताची भूमिका, सांस्कृतिक व धार्मिक धोरण, मुक्त व्यापार धोरण इत्यादीविषयी थोडक्यात माहिती सांगावी.

3) Increasing interest of India in Africa has its pros and cons critically examines.

उत्तराच्या प्रारंभी भारत आणि आफ्रिका खंड यांच्यातील संबंध थोडक्यात स्पष्ट करावेत. उत्तराच्या पुढील टप्प्यात भारताच्या आफ्रिकेतील वाढत्या हितसंबंधांविषयीची सकारात्मक बाजू मांडावी. उदाहरणार्थ, आफ्रिकेतील नसíगक साधनसंपत्ती, कच्चे तेल यामुळे भारताची ऊर्जाविषयक गरज पूर्ण होऊ शकते. आफ्रिकेतील युरेनियमचा उपलब्ध साठा, भारताला आफ्रिकन देशांकडून सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्वासाठी आणि इतर संघटनात्मक स्तरांवर पाठिंबा मिळू शकतो. हिंदी महासागरातील सामरिक-धोरणात्मक सुरक्षेला महत्त्व, जागतिक व्यापार संघटनेमध्ये विकसनशील व गरीब देशाच्या हिताचे एकत्रित संरक्षण इत्यादी मुद्दे मांडावेत.

उत्तराच्या पुढील टप्प्यात भारताच्या आफ्रिकेसोबत असणाऱ्या हितसंबंधांच्या आड येणाऱ्या बाबी सांगाव्यात. उदाहरणार्थ, आफ्रिकेमधील राजकीय अस्थिरता आणि लोकशाहीच्या अभावाने द्विपक्षीय संबंध प्रभावित होतात. आफ्रिकेतील अनेक देशांमधील गृहयुद्धाची स्थिती व हिंसाचार, दहशतवादी गट (अलशबाब, बोकोहरम, अलकायदा इत्यादी), भारतातील आफ्रिकी विद्यार्थी आणि नागरिकांसोबत होणाऱ्या भेदभावपूर्ण घटना, चीनचा आफ्रिकेमधील वाढता प्रभाव इत्यादी मुद्दे मांडावेत. उत्तराच्या शेवटी भारत-आफ्रिका शिखर परिषद, राजनयिक संबंध याद्वारे भारत आफ्रिकन देशांसोबत संबंध दृढ करण्याच्या दिशेने प्रयत्न करत आहे, असे नमूद करावे.

4) Discuss the Political development in maldives in the last two years, should they be of any cause of concern to India?

उत्तराच्या प्रारंभी भारत-मालदीव संबंधांविषयी थोडक्यात माहिती द्यावी. उत्तराच्या पुढील टप्प्यामध्ये मालदिवमधील राजकीय अस्थिरतेसाठी कारणीभूत ठरणारे घटक थोडक्यात नमूद करावेत. उदा. सन २००८-०९ मधील आíथक मंदीचा मालदीववरील प्रभाव, बेरोजगारीचा प्रश्न, सरकारवरील भ्रष्टाचाराचे आरोप व सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग, हवामान बदलाचा प्रभाव इत्यादी.

उत्तराच्या पुढील टप्प्यात मालदीवमधील राजकीय घटनाचक्र थोडक्यात स्पष्ट करावे. चीनकडून मालदीवला पायाभूत सुविधा आणि इतर क्षेत्रांमध्ये वाढते आर्थिक सहकार्य व त्याचा भारतावर पडणारा नकारात्मक प्रभाव थोडक्यात सांगावा. उदाहरणार्थ, मालदीवसोबत भारताचे झालेले करार रद्द करणे, धार्मिक कट्टरता वाढीस लागणे, चीनचा हिंदी महासागरातील वाढता प्रभाव, भारतीय व्यापार-वाणिज्यावर पडणारा नकारात्मक प्रभाव इत्यादी मुद्दय़ांचा ऊहापोह करावा.