05 August 2020

News Flash

एमपीएससी मंत्र : सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा योजना

या लेखामध्ये परीक्षा योजना व अभ्यासक्रमाबाबत चर्चा करण्यात येत आहे.

(संग्रहित छायाचित्र)

रोहिणी शहा

सन २०१७ मध्ये महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून राज्य शासनाच्या परिवहन विभागाच्या अखत्यारीतील गट क संवर्गातील सहायक मोटार वाहन निरीक्षक या तांत्रिक पदाच्या भरतीसाठीचा नवा पॅटर्न लागू करण्यात आला. या पॅटर्नप्रमाणे भरतीबाबत अर्हता इत्यादी बाबींची चर्चा मागील लेखामध्ये करण्यात आली. या लेखामध्ये परीक्षा योजना व अभ्यासक्रमाबाबत चर्चा करण्यात येत आहे.

सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्वपरीक्षा परीक्षा योजना

एकूण गुण – १०० प्रश्नपत्रिकेचे स्वरूप खालीलप्रमाणे

अभ्यासक्रम

(१) सामान्य अध्ययन चालू घडामोडी, सामाजिक व औद्योगिक सुधारणा, सामान्य विज्ञान, भारताचा सामान्य इतिहास व भूगोल (महाराष्ट्राच्या विशेष अभ्यासासह) नागरिकशास्त्र

(२) बुद्धिमापन चाचणी – उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो, याचा अंदाज घेण्याच्या दृष्टीने सदर चाचणीमध्ये प्रश्न विचारण्यात येतात.

(३) यंत्र अभियांत्रिकी व स्वयंचल अभियांत्रिकी संबंधित चालू घडामोडी (Latest trends and technological development in the field of Mechanical and Automobile Engineering.

पूर्वपरीक्षेचा निकाल

*   वस्तुनिष्ठ स्वरूपांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना उत्तरपत्रिकेत नमूद केलेल्या योग्य उत्तरांनाच गुण दिले जातात. प्रत्येक चार चुकीच्या उत्तरामागे एका बरोबर प्रश्नाचे गुण मिळालेल्या गुणांमधून वजा करण्यात येतात.

2   भरावयाच्या एकूण पदांच्या सुमारे ८ पट उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र होतील, अशा रीतीने प्रथम टप्प्यात गुणांची सीमारेषा (Cut Off Line) निश्चित करण्यात येते. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक प्रवर्गातील पदांसाठी एकूण १०पट उमेदवार उपलब्ध होतील, अशा रीतीने सीमारेषा खाली ओढली जाते. मात्र, अशा पद्धतीने मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी दुसऱ्या टप्प्यात पात्र ठरलेले अतिरिक्त उमेदवार केवळ त्यांच्या राखीव प्रवर्गासाठीच्या पदावरच निवडीसाठी पात्र ठरतात.

*   केवळ सर्वसाधारण (अमागास) उमेदवारांच्या सीमारेषेच्या आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची उमेदवारी अंतिम निवडीच्या वेळी सर्वसाधारण (अमागास) पदासाठी विचारात घेतली जाते. सर्वसाधारण (अमागास) उमेदवारांसाठी असलेली सीमारेषा शिथिल करत मुख्य परीक्षेासाठी पात्र ठरलेले उमेदवार अंतिम शिफारशीच्या वेळी फक्त संबंधित आरक्षित पदासाठी पात्र ठरतात.

मुख्य परीक्षा : परीक्षा योजना

परीक्षेचे टप्पे  – एक,

एकूण गुण – ३००

प्रश्नपत्रिकेचे स्वरूप

ही प्रश्नपत्रिका तीन विभागांमध्ये विभागलेली असते. यातील पहिला म्हणजे विभाग अ (Section A) अनिवार्य आहे तर दुसरा व तिसरा म्हणजेच विभाग ब आणि क (Section B & C) यापकी कोणत्याही एका विभागातील प्रश्न सोडवायचे असतात. विभाग ‘अ’ मध्ये २४० गुणांसाठी १२० प्रश्न तर विभाग ‘ब’ आणि ‘क’ मध्ये प्रत्येकी ६० गुणांसाठी प्रत्येकी ३० प्रश्न विचारण्यात येतात.

विभागवार घटकविषय पुढीलप्रमाणे

*    विभाग अ (SECTION A) – Mechanical and Automobile Engineering  (यंत्र आणि स्वयंचल अभियांत्रिकी)

*    विभाग ब (SECTION B) – Mechanical Engineering (यंत्र अभियांत्रिकी)

*    विभाग क (SECTION C) – Automobile Engineering (स्वयंचल अभियांत्रिकी)

मुख्य परीक्षेचा निकाल

प्रत्येक चार चुकीच्या उत्तरामागे एका प्रश्नाचे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतात. अंतिम निकालासाठी केवळ मुख्य परीक्षेतील गुणांचाच विचार करण्यात येतो. शिफारशीसाठी म्हणजेच अंतिम निकालासाठी शतमत पद्धतीचा अवलंब केला जातो. याचा अर्थ मुख्य परीक्षेमध्ये सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या उमेदवाराच्या एकूण गुणांच्या खालीलप्रमाणे गुण मिळवणारे उमेदवार शिफारशीसाठी पात्र ठरतात.

१) सर्वसाधारण (अमागास) – किमान ३५ शतमत

२) मागासवर्गीय – किमान ३० शतमत

३) अत्युच्च गुणवत्ताधारक पात्र खेळाडू –  किमान २० शतमत

४) माजी सैनिक किमान – २० शतमत

मागास प्रवर्गातील उमेदवार तसेच विकलांग, महिला, पात्र खेळाडू आणि माजी सनिक उमेदवार मुख्य परीक्षेत केवळ त्यांच्यासाठी विहीत केलेल्या निम्नसीमारेषेनुसार शिफारसपात्र ठरल्यास त्यांचा संबंधित प्रवर्गातील जागांसाठीच विचार करण्यात येतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2019 12:18 am

Web Title: assistant motor vehicle inspector examination scheme abn 97
Next Stories
1 शब्दबोध : चमचा
2 यूपीएससीची तयारी : आर्थिक विकास कृषी आणि कृषी संलग्न क्षेत्र
3 यूपीएससीची तयारी : आर्थिक विकास अभ्यासाचे नियोजन
Just Now!
X