News Flash

करिअरमंत्र

पीएच.डी. केल्यास प्राणीशास्त्रात संशोधन करता येईल.

मी बीएस्सीच्या दुसऱ्या वर्षांत शिकत आहे. अंतिम वर्षी प्राणीशास्त्र हा विषय घ्यावासा वाटतो. कारण त्यात मला रस आहे. एम.एस्सी. झाल्यावर अध्यापन क्षेत्रात तसेच आणखी कोणत्या क्षेत्रांत संधी मिळू शकेल?

सुनील सोनवणे, पाथर्डी

तुला ज्या विषयात रस वाटत आहे त्या विषयात पुढे अभ्यासक्रम केल्यावर उत्तमोत्तम संधी मिळू शकतात. अध्यापन क्षेत्राशिवाय राज्य लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा तू देऊ शकतोस. राज्य वनसेवा आणि केंद्रीय वन सेवेसाठीही तू प्रयत्न करू शकतोस. पीएच.डी. केल्यास प्राणीशास्त्रात संशोधन करता येईल. अशा संशोधकांना देशातील नामवंत राष्ट्रीय आणि खासगी प्रयोगशाळांमध्ये काम करण्याची संधी मिळू शकते.

 

माझी मुलगी मास मीडिया या विषयामध्ये पदवी अभ्यासक्रम शिकत आहे. तिचा स्पेशलायझेशनचा विषय जाहिरात आहे. तिला या क्षेत्रात करिअर  करता येईल का? मार्केटिंग रिसर्चमध्ये तिला जायचे असेल तर काय करावे लागेल?

सीमा कोरगावकर

तुमच्या मुलीला जाहिरात क्षेत्रात निश्चितपणे करिअर करता येईल. तिने इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मास कम्युनिकेशन या संस्थेतून पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अ‍ॅडव्हर्टायजिंग अ‍ॅण्ड पब्लिक रिलेशन हा अभ्यासक्रम केल्यास उत्तमोत्तम संधी मिळू शकतात. संपर्क- www.iimc.nic.in मुद्रा इन्स्टिटय़ूट ऑफ कम्युनिकेशन (MICA)या संस्थेचा पोस्ट ग्रॅज्युएट सर्टििफकेट प्रोग्रॅम इन अ‍ॅडव्हर्टायजिंग मॅनेजमेंट अ‍ॅण्ड पब्लिक रिलेशन हा अभ्यासक्रमसुद्धा उपयुक्त ठरू शकतो. याच संस्थेने पोस्ट ग्रॅज्युएट सर्टििफकेट प्रोग्रॅम इन मार्केटिंग रिसर्च अ‍ॅण्ड डाटा अ‍ॅनॅलिटिक्स हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. तो मार्केटिंग रिसर्चमधील करिअरसाठी उपयुक्त ठरू शकतो.  त्यानंतर याच विषयात फेलो प्रोग्रॅम किंवा पीएच.डी. केल्यावरही मार्केटिंग रिसर्चमध्ये करिअर करण्याची संधी मिळू शकते.

 

मी आता भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि जीवशास्त्र  हे विषय घेऊन बारावीची परीक्षा दिली आहे. मला र्मचट नेव्हीमध्ये करिअर करायचे आहे. त्यासाठी मी पुढे कोणते शिक्षण घेऊ?

सिद्धांत थोरात

तू इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सटिीची चाळणी परीक्षा देऊन या विद्यापीठामार्फत चालविण्यात येणाऱ्या बीई इन मरिन टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स, बी.एस्सी. इन नॉटिकल सायन्स हे अभ्यासक्रम करून र्मचट नेव्हीमध्ये करिअर करू शकतोस.

संपर्क- www.imu.edu.in

 

मी बी.फार्म.च्या शेवटच्या वर्षांला आहे.  एम.फार्म.ची प्रवेशपरीक्षाहीउत्तीर्ण झाले आहे. मी एम.फार्म. करावे की फार्मा- एमबीए करावे की नेहमीचे एमबीए करावे? मला पुढे  कशात अधिक संधी उपलब्ध होऊ शकतील? एनएमआयएमएस महाविद्यालयाचा एम.फार्म.-एमबीए हा डय़ुएल अभ्यासक्रम फायदेशीर आहे का?

भाग्यश्री फडके

तुला उच्च शिक्षण नेमके कशासाठी घ्यायचे आहे, हे पक्के ठरव. तुला अध्यापन, संशोधन, प्रत्यक्ष औषध  निर्माणअशा क्षेत्रांत जायचे असल्यास व त्यात आवड असल्यास चांगल्या संस्थेतून एम.फार्म. करणे श्रेयस्कर ठरू शकेल. औषधी निर्मिती व्यवसाय क्षेत्रासाठी चांगल्या व्यवस्थापकांची गरज आहेच. त्यामुळे फार्मा-एमबीए केल्यावर तुला तुझ्या स्पेशलाइज्ड क्षेत्रात करिअर घडवता येऊ शकेल. मात्र तू आतापर्यंत जे तांत्रिक शिक्षण घेतले त्यास मात्र मुकावे लागेल. सामान्य स्वरूपाच्या एमबीएमध्ये मार्केटिंग, वित्त, मनुष्यबळ विकास अशा विषयांमध्ये स्पेशलायझेशन करावे लागते. यांपकी कशामध्ये रस आहे, हे आधी निश्चित कर. कोणत्याही संस्थेचा अभ्यासक्रम केल्यावर लगेच उत्तमोत्तम करिअरच्या संधी चालून येतील हे आजच्या स्पध्रेच्या काळात तितकेसे खरे नाही. संस्था महत्त्वाची असली तर तुम्ही मिळवलेले ज्ञान हे त्याहून महत्त्वाचे. एनएमआयएमएसच्या अभ्यासक्रमाबाबत हेच सांगता येईल.

 

मी यशवंतराव मुक्त विद्यापीठातून बी.ए. केले आहे. मला विधीविषयक शिक्षण घ्यायचे आहे. ते घेता येईल का? त्यासाठी कोणती परीक्षा द्यावी लागेल?

सचिन डोंगरे

तुम्ही कॉमन लॉ अ‍ॅडमिशन टेस्ट देऊन देशातील नामवंत शैक्षणिक संस्थांमधील विधी शिक्षण अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकता. ही परीक्षा

८ मे २०१६ रोजी होणार आहे. राज्य शासनाच्या तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत एम.एच. सीईटी- लॉ २०१६ ही परीक्षा २२ मे २०१६ रोजी घेतली जाणार आहे. ही परीक्षा देऊन आपण राज्यातील विधी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ शकता.

 

मी माहिती तंत्रज्ञान शाखेत शिकत आहे. मला सरकारी नोकरी करायची आहे. मी काय करू?

अविनाश सुरवसे

तू जर माहिती तंत्रज्ञान या विषयातील पदवीधर असशील तर तुला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या लिपिक वर्गीय, पोलीस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक किंवा राजपत्रित अधिकारी पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांद्वारे सरकारी नोकरीत येता येईल. स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेद्वारे तुला केंद्रीय शासनामध्ये नोकरी मिळू शकेल.

 

 मी दहावीची परीक्षा दिली आहे. मला वैद्यकीय शाखेत प्रवेश घ्यायचा आहे. मी अकरावीत कोणते विषय घ्यावेत?

मोहम्मद इम्रान मोहम्मद हुसेन

वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षेचा जीवशास्त्र हा एक विषय  असतो. त्यामुळे तू अकरावीला जीवशास्त्र, रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र हे विषय घ्यावेस.

 

मी सध्या एलएलबीच्या पहिल्या वषात शिकत आहे. एलएलबीनंतर सन्यदलात कोणत्या संधी मिळू शकतील? त्यासाठी कोणती तयारी करावी लागेल?

दत्तात्रय फडतरे, पुणे

एलएलबी पदवीधरांना सन्यदलाच्या विधी शाखेत नोकरी मिळू शकते. मुलाखत आणि शारीरिक चाळणीद्वारे निवड केली जाते. विधीविषयक ज्ञान परिपूर्ण ठेवावे आणि स्वत:ला शारीरिकदृष्टय़ा तंदुरुस्त ठेवावे.

 

मी अर्थशास्त्रात एम.ए. करत आहे. मला या विषयाच्या आधारे कोणती शासकीय नोकरी मिळू शकेल? त्याचप्रमाणे आणखी कोणत्या परीक्षा मला देता येईल?

कमलेश चव्हाण, रायगड-रेवेचीवाडी

मी अर्थशास्त्राच्या दुसऱ्या वर्षांला आहे. मला नंतर अर्थशास्त्रामध्ये करिअर करायचे आहे. त्यासाठी  करता येईल?

संकेत चिल्लल

तुम्हा दोघांनाही संघ लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाणारी इंडियन इकॉनॉमिक अ‍ॅण्ड स्टॅटिस्टिकल सíव्हस एक्झामिनेशन देता येईल. त्याद्वारे केंद्र शासनाच्या अर्थ विभागात उच्च पदाची नोकरी मिळवू शकाल. राज्य आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे घेतल्या जाणाऱ्या इतर परीक्षासुद्धा तुम्ही देऊ शकाल.

केंद्रीय राखीव पोलीस दल कॉन्स्टेबल (मिनिस्ट्रियल) भरतीसाठी परीक्षा

केंद्रीय राखीव पोलीस दलात कॉन्स्टेबलच्या ६८६ पदांच्या भरतीसाठी २६ जून २०१६ रोजी लेखी परीक्षा घेण्यात येईल.

शैक्षणिक अर्हता : बारावी उत्तीर्ण. संगणकावर इंग्रजी टंकलेखनाची ३५ श.प्र.मि. वेगाची कौशल्य चाचणी किंवा िहदी टंकलेखनाची ३० श.प्र.मि. वेगाची  कौशल्य चाचणी घेतली जाईल.

शारीरिक प्रमाणके :  उंची : पुरुष-   १६५ सें.मी. (अजसाठी –   १६२.५ सें.मी.) महिला-  १५५ सें.मी. (अजसाठी-   १५० सें.मी.). छाती-  पुरुष-  ७७ ते ८२ सें.मी. (अज- ७६ ते ८१ सें.मी.).

वयोमर्यादा :   ५ मे २०१६ रोजी १८-२५ वष्रे. (अजा/अज १८-  ३० वष्रे; इमाव १८- २८ वष्रे).

निवडप्रक्रिया :  निवड दोन टप्प्यांत होईल. पहिला टप्पा-  लेखी परीक्षा. दुसरा टप्पा-  शारीरिक प्रमाणके,  कौशल्य चाचणी (टायिपग स्पीड टेस्ट),  वैद्यकीय परीक्षा.

अर्ज ऑनलाइन पद्धतीने www.crpfindia.com या संकेतस्थळावर  ५ मे २०१६ पर्यंत करावा.

 

स्टाफ सिलेक्शन कमिशनची िहदी अनुवादक पदांसाठी परीक्षा

केंद्र सरकारच्या विविध खात्यांमधील भरतीसाठी  १९ जून २०१६ रोजी स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे कनिष्ठ/ वरिष्ठ िहदी अनुवादक पदांसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे.

अर्हता-  िहदी/ इंग्रजी/ कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी इंग्रजी/ िहदी विषयांसह उत्तीर्ण असावी अथवा िहदी/ इंग्रजी माध्यमातून पदवी परीक्षा उत्तीर्ण असावी. वयोमर्यादा- १ जानेवारी २०१६ रोजी ३० वर्षांपर्यंत (इमाव-  ३३ वष्रे, अजा/अज-  ३५ वष्रे).

निवड पद्धती-  लेखी परीक्षा- एकूण ४०० गुणांसाठी. पदांच्या पसंतीक्रमानुसार उमेदवारांची निवड लेखी परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे केली जाईल.

परीक्षा शुल्क-   रु. १००(महिला/ अजा/ अज/ अपंग यांना शुल्क माफ).  इमाव उमेदवारांनी नॉन-  क्रीमी लेयर दाखला १ मे २०१३ ते २७ ऑक्टोबर २०१६ दरम्यान घेतलेला असावा.

अधिक माहिती- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी आपली पात्रता ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २ एप्रिल २०१६च्या अंकातील जाहिरातीनुसार तपासून पाहावी. अर्ज ऑनलाइन पद्धतीने   ssconline.nic.in या संकेतस्थळावर-  पहिल्या टप्प्यातील नोंदणी २८ एप्रिल २०१६ पर्यंत आणि दुसऱ्या टप्प्यातील नोंदणी  ३० एप्रिल २०१६ पर्यंत करावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2016 1:08 am

Web Title: career guidance by loksatta 2
Next Stories
1 सागरी जीवशास्त्राचा अभ्यास
2 देशोदेशींच्या शिष्यवृत्ती : जर्मनीमध्ये पीएच.डीसाठी शिष्यवृत्ती
3 नोकरीची संधी
Just Now!
X