गेल्या काही वर्षांत चित्रपटातील नृत्ये ही केवळ नायक-नायिकेची राहिलेली नाहीत. त्यांच्या अवतीभवती शंभरएक नर्तक कलावंतांचा संच हा असतोच. आता परदेशातही सतत विविध पुरस्कारांचे कार्यक्रम व्हायला लागले आहेत. त्या कार्यक्रमांध्येही हीच परिस्थिती असते. हे झालं बॉलीवूड-हॉलीवूड किंवा ज्याला समकालीन नृत्यशैली म्हणतो त्याविषयी. पण शास्त्रीय नृत्यांचे विविध कार्यक्रम (उदा. एलिफंटा महोत्सव, खजुराहो महोत्सव इत्यादी) वर्षभर देशातील विविध ठिकाणी होत असतात. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या कलावतांच्या मदतीला दुसऱ्या फळीतील कलांवतांची गरज भासत असते. हे सर्व विस्ताराने सांगण्याचे कारण हेच की नृत्य क्षेत्रात करिअर घडविण्याच्या उत्तम संधी अलीकडे उपलब्ध आहेत.
प्रशिक्षण संस्था
एखाद्या क्षेत्रात करिअर करायचे असल्यास त्या क्षेत्रातील प्रशिक्षण घेणे गरजेचे असते. अशा प्रशिक्षणातून आपली सैद्धान्तिक आणि प्रात्यक्षिक ज्ञानाची बैठक पक्की होते. सराव आणि तांत्रिक निपुणतेसाठीही प्रशिक्षण आवश्यक असते. नृत्य प्रशिक्षण देणाऱ्या काही संस्थांचा परिचय पुढे दिला आहे.
मुंबई विद्यापीठ
* बॅचलर ऑफ परफॉìमग आर्ट्स (बीपीए इन डान्स)
अर्हता- कोणत्याही विषयातील बारावी परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेतील दोन वर्षांचा नृत्य विषयातील फाऊंडेशन कोर्स पूर्ण असायला हवा. कालावधी- तीन वर्षे.
* मास्टर ऑफ परफॉìमग आर्ट्स (बीपीए इन डान्स) अर्हता- बॅचलर ऑफ परफॉर्मिग आर्ट्स.
कालावधी- दोन वर्षे.
* सर्टििफकेट इन डान्स (कथ्थक)- हा अभ्यासक्रम अर्धवेळ आहे. अर्हता- बारावी उत्तीर्ण.
मुंबई विद्यापीठातील इतर पदवी अभ्यासक्रम पूर्ण करतानाच समांतररीत्या हा अभ्यासक्रम पूर्ण करता येतो. कालावधी- एक वर्ष. *० डिप्लोमा कोर्स इन डान्स (कथ्थक)-
* हा अभ्यासक्रम अर्धवेळ आहे. अर्हता- सर्टििफकेट इन डान्स (कथ्थक) किंवा कोणत्याही विषयातील पदवी आणि तीन वर्षे कथ्थक नृत्याचे प्रशिक्षण घेतलेले असावे. मुंबई विद्यापीठातील इतर पदवी अभ्यासक्रम करतानाच समांतररीत्या हा अभ्यासक्रम करता येतो. कालावधी- एक वर्ष.
* अ‍ॅडव्हान्स्ड डिप्लोमा कोर्स इन डान्स- कथ्थक.
हा अभ्यासक्रम अर्धवेळ आहे. अर्हता- डिप्लोमा कोर्स इन डान्स (कथ्थक) किंवा कोणत्याही विषयातील पदवी. मुंबई विद्यापीठातील इतर पदवी अभ्यासक्रम करतानाच संमातररीत्या हा अभ्यासक्रम करता येतो. कालावधी- एक वर्ष.
* पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डान्स अ‍ॅण्ड फिटनेस. अर्हता- नृत्य विषयातील पदवी. कालावधी- एक वर्ष
* डिप्लोमा कोर्स इन डान्स (कथ्थक) हा अभ्यासक्रम अर्धवेळ आहे. अर्हता- कोणत्याही विषयातील बारावी परीक्षा उत्तीर्ण. तीन वर्षे कथ्थक नृत्याचे मूलभूत प्रशिक्षण घेतलेले असावे. कालावधी- तीन वर्षे.
* फाऊंडेशन कोर्स इन डान्स. अर्हता- कोणत्याही विषयातील बारावी परीक्षा उत्तीर्ण. कालावधी- दोन वर्षे.
* पोस्ट ग्रॅज्युएट ब्रिज कोर्स इन डान्स- हा अभ्यासक्रम अर्धवेळ आहे. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण आणि नामवंत मान्यताप्राप्त संस्थेचा दोन वर्षे कालावधीचा पदविका अभ्यासक्रम.
कालावधी- एक वर्ष (अर्धवेळ).
* सर्टििफकेट कोर्स इन परफॉìमग फोक आर्ट्स. अर्हता- कोणत्याही विषयातील बारावी उत्तीर्ण. कालावधी- एक वर्ष (अर्धवेळ)
* पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स इन परफॉìमग फोक आर्ट्स. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण. कालावधी- एक वर्ष.
पत्ता- मुंबई युनिव्हर्सटिी, एम. जी. रोड. फोर्ट, मुंबई- ३२.
वेबसाइट- http://www.mu.ac.in/arts/finearts
* लोककला अकॅडमी, विद्यापीठ विद्यार्थी भवन, तिसरा मजला, शोभनाथ मिश्रा मार्ग, बी रोड, चर्चगेट, मुंबई-०२२-४०००२०.

पुणे विद्यापीठ
पुणे विद्यापीठाने सेन्टर फॉर परफॉìमग आर्ट सुरू केले आहे. त्याअंतर्गत कार्यरत असणाऱ्या ललित कला केंद्राच्या वतीने बॅचलर ऑफ आर्ट इन म्युझिक, डान्स अ‍ॅण्ड थिएटर हा अभ्यासक्रम चालविण्यात येतो. कालावधी- तीन वर्षे. अर्हता- कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण विद्यार्थी. प्रवेशासाठी ४० गुणांची प्रवेशपरीक्षा साधारणत: जून महिन्यात घेतली जाते.   ३० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
पत्ता: सेंटर फॉर परफॉìमग आर्ट, ललित कला केंद्र, पुणे विद्यापीठ, पुणे-४११००७,
वेबसाइट : http://www.ac.in
ईमेल- bahulikar@unipune.ac.in

Ghilli re release box office collection
२० वर्षांनी सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची दमदार कमाई, दोन दिवसांत कमावले तब्बल…
Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न
actor akshay kumar talk about movie bade miyan chote miyan
‘अपयशाने खचत नाही’

एसएनडीटी विद्यापीठ
या संस्थेने भरतनाटय़म् आणि कथ्थक या नृत्यशैलीतील तीन वर्षे कालावधीचा पदविका आणि दोन वर्षे कालावधीचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला आहे. हे दोन्ही अभ्यासक्रम एसएनडीटी विद्यापीठाच्या न्यू मरिन लाइन कॅम्पसमध्ये शिकवले जातात. राजश्री शिर्के या कथ्थक शिकवतात आणि इंदू रमन या भरतनाटय़म् शिकवतात.
ईमेल : rajashreeshirke@yahoo.com  आणि Brangshree@yahoo.com

नालंदा नृत्य कला महाविद्यालय
या संस्थेने पुढील अभ्यासक्रम सुरू केले आहेत –
* बॅचलर ऑफ परफॉìमग आर्ट्स इन डान्स – कालावधी -पाच वर्षे. मोहिनीअट्टम, कथकली आणि भरतनाटय़म् या नृत्य प्रकारांमध्ये हा अभ्यासक्रम करता येतो. हा अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहे. अर्हता- दहावी उत्तीर्ण.
* बॅचलर ऑफ परफॉìमग आर्ट्स इन डान्स – कालावधी तीन वर्षे. अर्हता-  कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण. प्रवेशपरीक्षा घेऊन त्यात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
* डिप्लोमा इन कथ्थक (अर्धवेळ)- कालावधी तीन वर्षे. अर्हता- कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण.
*मास्टर ऑफ परफॉìमग आर्ट्स – अर्हता- दोन वर्षे. / बॅचलर ऑफ परफॉìमग आर्ट्स केलेल्या किंवा कोणत्याही शाखेतील पदवीधरास आणि संबंधित प्रकारातील नृत्याची पदविका प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. हा अभ्यासक्रम कथकली, कथ्थक, मोहिनीअट्टम आणि भरतनाटय़म् या  नृत्यप्रकारात करता येतो. कालावधी- दोन वर्षे.
पत्ता : प्लॉट ए, ७/१, एन. एस.रोड,क्र.१०, जेव्हीपीडी स्कीम, विलेपाल्रे (पश्चिम), मुंबई- ४०००५६. वेबसाइट- http://www.nalandadanceeducation.com  ईमेल- ndrc@mtnl.in

शारदा संगीत विद्यालय
मुंबईतील वांद्रे (पूर्व) येथील कलानगरमध्ये असणाऱ्या या संस्थेची स्थापना १९२७ साली करण्यात आली आहे. या संस्थेत गुरू-शिष्य परंपरा पद्धतीने नृत्याचे प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये भरतनाटय़म्, कथ्थक आणि ओडिसी नृत्यप्रकारांचा समावेश आहे. मोजक्या विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन त्यांना लहान वयापासूनच ज्येष्ठ गुरूंद्वारे टप्प्याटप्प्याने पाया मजबूत करणारे प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण १० ते १५ वर्षांचेसुद्धा असू शकते. विद्यार्थ्यांच्या सोईनुसार प्रवेश घेता येतो. साधारणत: आठवडय़ातून दोन वर्ग होतात. मिरजस्थित अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय या संस्थेशी ही संस्था संलग्न आहे. गंधर्व कला गायन संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांना संस्थेच्या विद्यार्थ्यांना बसविले जाते. दर महिन्याला हजार ते बाराशे रुपये शुल्क आकारले जाते. नृत्याची आवड असलेल्या कुणालाही प्रवेश घेता येतो (यात वार्षकि वाढ अपेक्षित आहे.)
पत्ता : शारदा संगीत विद्यालय, नादब्रह्म मंदिर, ३४१, एम. केळकर मार्ग, कलानगर, वांद्रे (पूर्व)
मुंबई-४०००५१, दूरध्वनी-०२२ – २६४३९४३९

अर्चना जोगळेकर नृत्यालय
कथ्थक नृत्यप्रकारातील प्रशिक्षण देणाऱ्या या संस्थेची स्थापना आशा जोगळेकर यांनी १९६३ साली केली.
पत्ता : ४०५, दीप टॉवर, डी. एन. नगर, अंधेरी पूर्व, मुंबई- ४०००५३.
ईमेल- kathakknj@alo.com

डान्स स्पोर्ट इंडिया
ही संस्था साल्सा / लॅटिन डान्स प्रकारातील २० शैलीतील नृत्यप्रकारांचे प्रशिक्षण देते. यामध्ये बॉलरूम डान्सचा चा डान्स,  रुम्बा, साम्बा, अर्जेटाइन टँगो, रॉक अ‍ॅण्ड रोल, लाम्बाडा, क्विक स्टेप, बुगी वुगी, इंग्लिश वाल्त्ज आदी नृत्यांचा समावेश आहे. या संस्थेने पाच हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना या नृत्यशैली शिकवल्या आहेत.
पत्ता : डान्स स्पोर्ट इंडिया, अंधेरी स्टुडिओ, दौलत, डीएचएस, प्लॉट ११६, अंधेरी(प.), मुंबई-४०००५३.
इमेल- ancesport.india@gmail.com
वेबसाइट- ww.dancesportindia.com

संधी आणि वास्तव
नृत्यासारख्या क्षेत्रात करिअर करायचे असेल तर केवळ हौस म्हणून करण्यात काहीच हशील नाही. अगदी चौथ्या-पाचव्या वर्षी नृत्यशाळेत जाणारा विद्यार्थी नवव्या इयत्तेपर्यंत तिथे शिकतो आणि नंतर दहावी -बारावी आणि नंतर अभियांत्रिकी अथवा वैद्यकीय अशा अभ्यासक्रमांना जातो. त्याची साधना तिथेच खंडित होते. करिअर निवडीबाबत त्याची मनोवस्था द्विधा होते. पालकांना तर विद्यार्थ्यांने इतर कुठलेतरी करिअर त्याने निवडावे असे वाटत असते. या गोंधळात नृत्यसाधना कुठेतरी मागे पडते आणि उरतो तो केवळ छंद. या छंदात करिअर घडण्याची शक्यता दुरावते. कोणत्याही कलेमध्ये करिअरच्या उंच शिखरावर पोहोचण्यासाठी शासकीय किंवा खासगी नोकऱ्यांमध्ये विशिष्ट कालावधीने पदोन्नती होते, तसे होत नाही. साधना करत असताना संधीची वाट बघणे, संधी शोधणे, मिळालेल्या संधीचे सोने करणे आणि पुढे सातत्य ठेवणे यामुळेच यशाचे सोपान चढता येते, ही बाब  लक्षात ठेवणे उचित ठरेल.
 ekank@hotmail.com