अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण झालेले असावेत. त्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची पात्रता उत्तीर्ण केलेली असावी व स्काउट्स व गाइड्समध्ये विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावलेली असावी.
वयोमर्यादा ३० वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २८ डिसेंबर २०१३ ते ३ जानेवारी २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली दक्षिण-पश्चिम रेल्वेची
जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या तपशिलासह असणारे अर्ज ‘असिस्टंट पर्सोनेल ऑफिसर (हेडक्वार्टर्स), पर्सोनेल डिपार्टमेंट, साऊथ वेस्टर्न रेल्वे, पहिला माळा, न्यू झोनल हेडक्वार्टर्स, गडाग रोड, हुबळी (कर्नाटक) ५८००२०’ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २८ जानेवारी २०१४.

नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट, फरिदाबाद येथे कारकुनांच्या ८ जागा
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण झालेले असावेत व त्यांनी इंग्रजी टंकलेखनाची ३० शब्द प्रतिमिनिट, तर हिंदी टंकलेखनाची २५ शब्द प्रतिमिनिट पात्रता पूर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २५ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ३० नोव्हेंबर- ५ डिसेंबर २०१३च्या अंकात प्रकाशित झालेली एनपीटीआयची जाहिरात पाहावी अथवा http://www.upti.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संपूर्णपणे भरलेले अर्ज नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट, एनपीटीआय कॉम्प्लेक्स, सेक्टर-३३, फरिदाबाद (हरियाणा) या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३० जानेवारी २०१४.

आर्मी बेस वर्कशॉप-पुणे येथे ट्रेड्समनच्या २१ जागा
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा २५ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी आर्मी बेस वर्कशॉप, खडकी-पुणेची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज दि कमांडंट अँड एमडी, ५१२- आर्मी बेस वर्कशॉप, पुणे-४११ ००३ या पत्त्यावर पाठविण्याची
शेवटची तारीख ३१ जानेवारी २०१४.

छात्रसैनिकांसाठी सैन्यदलात थेट भरती योजनेअंतर्गत ५० जागा
अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत. ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम व छात्रसेनेची ‘सी’ प्रमाणपत्र पात्रताधारक असायला हवेत. वयोमर्यादा २५ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २८ डिसेंबर २०१३ ते ३ जानेवारी २०१४च्या अंकात प्रकाशित झालेली सैन्यदलाची जाहिरात पाहावी.
संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज उमेदवारांनी छात्रसेनेच्या संबंधित मुख्यालयात जमा करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०१४.

महाराष्ट्र मत्स्य विभागात लिपिकांच्या ३२ जागा
अर्जदार शालांत परीक्षा उत्तीर्ण असावेत व त्यांनी इंग्रजी टंकलेखनाची ४० शब्द प्रतिमिनिट तर मराठी टंकलेखनाची ३० शब्द प्रतिमिनिट पात्रता पूर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३३ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी http://oasis.mkcl.org/fisheries  या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०१४.