अर्जदार बारावी उत्तीर्ण व इंग्रजी टंकलेखनाची ८० शब्द प्रति मिनिट, हिंदी टंकलेखनाची ६५ शब्द प्रति मिनिट तर इंग्रजी लघुलेखनाची ८० शब्द प्रति मिनिट. पात्रकाधारक शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा २५ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी  ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ९ ते १५ नोव्हेंबर २०१३च्या अंकात प्रकाशित झालेली सीमा सुरक्षा दलाची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागपत्रांसह असणारे अर्ज दि इन्स्पेक्टर जनरल, एफटीआरएचक्यू, एसएसबी, निकिता कॉम्प्लेक्स, ३४५, जी. एस. रोड, सानपाडा, गुवाहाटी (असम्) ७८१०२२ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०१३.

सैन्य दलात शिक्षक-हवालदारांसाठी २६० जागा :
अर्जदार विज्ञान वा कला विषयातील पदवीधर व बी.एड. पात्रताधारक असावेत व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा २५ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी  ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २ ते ८ नोव्हेंबर २०१३च्या अंकात प्रकाशित झालेली सैन्य दलाच्या शैक्षणिक विभागाची जाहिरात पाहावी.
महाराष्ट्रातील उमेदवारांनी संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज इंडियन आर्मी, एचक्यू रिक्रूटिंग झोन, ३, राजेंद्रसिंहजी मार्ग, पुणे ४११००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १ डिसेंबर २०१३.

कम्बाइन्ड डिफेन्स सव्‍‌र्हिसेस एक्झामिनेशन-२०१४ अंतर्गत सैन्य दलात ४९९ जागा :
अर्जदार बी.एस्सी., इंजिनीअिरगसह कुठल्याही विषयातील पदवीधर व शारीरिकदृष्टय़ा  सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा २२ वर्षे.
या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या
२ ते ८ नोव्हेंबर २०१३च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या http://www.upsc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाचा http://www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २ डिसेंबर २०१३.

सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिटय़ूट-लखनऊ येथे सीनिअर टेक्निकल ऑफिसरच्या ३ जागा :
अर्जदारांनी चांगल्या शैक्षणिक आलेखासह एमबीबीएस पात्रता उत्तीर्ण केलेली असावी. पदव्युत्तर पात्रताधारकांना प्राधान्य. वयोमर्यादा ३५ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २ ते ८ नोव्हेंबर २०१३च्या अंकात प्रकाशित झालेली सीएसआयआर -सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिटय़ूट- लखनऊची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि डिमांड ड्राफ्टसह असणारे अर्ज डायरेक्टर, सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिटय़ूट, जानकीपुरम् एक्स्टेन्शन, सीतापूर रोड, लखनऊ २२६०३१ (उप्र) या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २ डिसेंबर २०१३.

आयुध निर्माणी- अंबरनाथ येथे कुशल कामगारांच्या १४९ जागा :
अर्जदार शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेले असावेत व त्यांनी इलेक्ट्रिकल, एक्झामिनर, मशिनिस्ट, मिलराईट यांसारख्या विषयातील राष्ट्रीय स्तरावरील कौशल्य पात्रता पूर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३२ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी  ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ९ ते १५ नोव्हेंबर २०१३च्या अंकात प्रकाशित झालेली आयुध निर्माणी-अंबरनाथची जाहिरात पाहावी अथवा आयुध निर्माणीच्या  http://www.ofb.gov.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ डिसेंबर २०१३.