News Flash

रोजगार संधी

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हायड्रोलॉजीमध्ये संशोधकांच्या ७ जागा : अर्जदारांनी हायड्रोलॉजी, हायड्रॉलिक, पर्यावरण विज्ञान वा पर्यावरण तंत्रज्ञान यांसारख्या विषयातील पदव्युत्तर पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी

| May 20, 2013 12:57 pm

रोजगार संधी

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हायड्रोलॉजीमध्ये संशोधकांच्या ७ जागा :
अर्जदारांनी हायड्रोलॉजी, हायड्रॉलिक, पर्यावरण विज्ञान वा पर्यावरण तंत्रज्ञान यांसारख्या विषयातील पदव्युत्तर पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांना संबंधित कामाचा दोन वर्षांचा अनुभव असायला हवा. पीएच.डी. असणाऱ्यांना प्राधान्य. वयोमर्यादा ४० वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २३ ते २९ मार्च २०१३च्या अंकातील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हायड्रोलॉजीची जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या www.nih.ernet.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संपूर्णपणे भरलेले अर्ज नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हायड्रोलॉजी, जल-विज्ञान भवन, रुरकी २४७६६७ (उत्तराखंड) या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २२ मे २०१३.

वायुदलात शिपाईपदाची संधी :
अर्जदारांनी बारावीची परीक्षा गणित व विज्ञान विषय घेऊन उत्तीर्ण केलेली असावी व ते शारीरिकदृष्टय़ा पात्र असावेत. वयोगट १६ ते १९ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २७ एप्रिल ३ मे २०१३च्या अंकातील प्रकाशित झालेली भारतीय वायुदलाची जाहिरात पाहावी.
संपूर्णपणे भरलेले विहित नमुन्यातील अर्ज साध्या टपालाने प्रेसिडेंट, सेंट्रल एअरमन्स सिलेक्शन बोर्ड, पोस्ट बॉक्स नं. ११८०७, नवी दिल्ली ११००१० या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २३ मे २०१३.

तटरक्षक दलांतर्गत मुंबई येथे फायरमनच्या ६ जागा :
 अर्जदार कमीत कमी शालान्त परीक्षा उत्तीर्ण झालेले असावेत व ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा २७ वर्षे.
या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २७ एप्रिल- ३ मे २०१३च्या अंकात प्रकाशित झालेली तटरक्षक दलाच्या पश्चिम विभागाची जाहिरात पाहावी.
संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज दि कमांडर, कोस्ट गार्डस् डिस्ट्रिक्टस् हेडक्वार्टर्स नं. २, वरळी सी-फेस पोस्ट ऑफिस, वरळी कॉलनी, वरळी, मुंबई-४०००३० या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २५ मे २०१३.

‘डीआरडीओ’मध्ये सीनिअर टेक्निकल असिस्टंटच्या ३६० जागा :
अर्जदारांनी कृषी, विज्ञान, अभियांत्रिकी, भूगोल, गणित, तंत्रज्ञान, पशुविज्ञान यांसारख्या विषयातील पदवी उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २८ वर्षे.
या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ४ ते १० मे २०१३च्या अंकात प्रकाशित झालेली डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंटची जाहिरात पाहावी अथवा ‘डीआरडीओ’च्या www.drdo.gov.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ मे २०१३.

एअर इंडिया-एअर ट्रान्स्पोर्टमध्ये रॅम्प सव्‍‌र्हिस एजंटच्या २९ जागा :
अर्जदारांनी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, प्रॉडक्शन, ऑटोमोबाइल इंजिनीअरिंगमधील पदविका उत्तीर्ण केलेली असावी अथवा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची पात्रता व राष्ट्रीय स्तरावरील कौशल्य परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २८ वर्षे.
या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्टच्या www.airrindia.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी.
पात्रताधारक उमेदवारांनी एअर इंडिया- एअर ट्रान्स्पोर्ट सव्‍‌र्हिसेस लि. द्वारा एअर इंडिया, एअरलाइन्स बिल्डिंग, नेंदुबस्वामी विमानतळ, कोची- ६८३१११ येथे थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याची शेवटची तारीख ३० मे २०१३.

नौदलाच्या शैक्षणिक विभागातील संधी :
अर्जदारांनी गणित व भौतिकशास्त्र विषयांसह एम.एस्सी. अथवा एमसीए. पात्रता ५० टक्के गुणांसह अथवा इंजिनीअरिंगमधील पदवी अथवा पदव्युत्तर पात्रता ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा २५ वर्षे.
या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ४ ते १० मे २०१३च्या अंकातील प्रकाशित झालेली नौदलाची जाहिरात पाहावी अथवा नौदलाचा www.nausena-bharti.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मे २०१३.   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2013 12:57 pm

Web Title: employment oppoturnity
टॅग : Employment,Job
Next Stories
1 शैक्षणिक संधी
2 ग्रीन करिअर्स
3 अमेरिकेतील शालेय शिक्षण
Just Now!
X