|| रोहिणी शहा

मुख्य परीक्षा पेपर एकमधील भूगोल घटकाच्या तयारीबाबत या व पुढील लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.

article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व – परीक्षास्वरूप आणि अभ्यासक्रम
light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
mpsc mantra environment question analysis career
mpsc मंत्र: पर्यावरण प्रश्न विश्लेषण
upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान

या विषयाच्या तयारीमध्ये भौगोलिक संज्ञा, संकल्पना पक्क्या करून घेणे खूप महत्त्वाचे आहे. भूगोल विषयाचे प्राकृतिक, आर्थिकव सामाजिक असे ठळक तीन उपविभाग करून त्यांचा त्याच क्रमाने अभ्यास केल्यास समजून घेणे आणि लक्षात ठेवणे सोपे होईल. विज्ञानाच्या अभ्यासाप्रमाणे भूगोलाचा अभ्यासही व्याख्या (definition) व प्रक्रियांचा संकल्पनांवर आधारित अभ्यास कमी वेळेत चांगले आकलन होण्यास मदतगार ठरतो. अभ्यासामध्ये काही ठळक बाबींचा क्रम लावून घ्यायला हवा. सगळ्यात आधी महत्त्वाच्या संज्ञा व संकल्पना समजावून घ्यायला हव्यात. यानंतर निरनिराळ्या भौगोलिक प्रक्रिया (उदा. भूरूप निर्मिती, भूकंप/ वादळ इत्यादींची निर्मिती) समजून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर तथ्यात्मक बाबी व विश्लेषणात्मक व उपयोजित मुद्दे अभ्यासावेत.

प्राकृतिक भूगोल –

भूगोलाच्या शाखा, पृथ्वीची उत्पत्ती, रचना, पृथ्वीचे कलणे, वातावरण, अक्षांश, रेखांश, हवामानाचे घटक, प्रमाण वेळ इ. पायाभूत संकल्पना व्यवस्थित समजून घ्याव्यात.

भारतातील हिमालयीन व द्विकल्पीय नदी प्रणालींचा तुलनात्मक अभ्यास आवश्यक आहे. नदी प्रणालींच्या अभ्यासातच कृषी घटकातील जलव्यवस्थापनातील (पाण्याची गुणवत्ता, भूजल व्यवस्थापन, नदीजोड प्रकल्प, rainwater harvesting महत्त्वाच्या संकल्पना अभ्यासायला हव्यात. यामुळे पाणी या नसíगक संसाधनाचा मूलभूत अभ्यास पूर्ण होईल. कृषी व इतर कारणांसाठी वापर, व्यवस्थापन इ. मुद्दे कृषीविषयक घटकाच्या तयारीमध्ये समाविष्ट करता येतील.

भौगोलिक घटना/ प्रक्रिया

  • मान्सूनची निर्मिती, वितरण, भारताच्या/ महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्व, ऋतूंची निर्मिती, मृदा निर्मिती, समुद्री प्रवाह, भूकंप, ज्वालामुखी इ. प्रक्रिया पूर्व, मुख्य परीक्षेतील इतर घटक विषयांच्या तयारीसाठीसुद्धा महत्त्वाच्या आहेत.
  • कोणत्याही भौगोलिक घटना/ प्रक्रियेच्या अभ्यासामध्ये पुढील मुद्दे समजून घ्यायला हवेत 2 भौगोलिक व वातावरणीय पाश्र्वभूमी; घटना घडू शकते/ घडलेली भौगोलिक ठिकाणे; प्रत्यक्ष घटना/ प्रक्रियेचे स्वरूप; घटनेचे/ प्रक्रियेचे परिणाम; पर्यावरणीय बदलांमुळे घटनेवर/ प्रक्रियेवर होणारे परिणाम; असल्यास आर्थिकमहत्त्व; भारतातील, महाराष्ट्रातील उदाहरणे; नुकत्याच घडलेल्या महत्त्वाच्या घटना/ प्रक्रिया (current events)

भूरूप निर्मिती

  • भूरूप निर्मिती हा घटक पर्यावरणीय दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा आहे. भूरूप निर्मितीचा वारा, नदी, हिमनदी व समुद्र या चार कारकांच्या शीर्षकाखाली मुद्दय़ांच्या वा टेबलच्या स्वरूपात नोट्स काढता येतील. प्रत्येक कारकाकडून होणाऱ्या अपक्षयामुळे होणारी भूरूपे व संचयामुळे होणारी भूरूपे असे विभाजन करता येईल. भूरूपांमधील साम्यभेदांचीही नोंद घ्यावी लागेल.
  • प्रत्येक भूरूपासाठी उपलब्ध असल्यास जागतिक पातळीवरील प्रसिद्ध उदाहरण, भारतातील व असल्यास महाराष्ट्रातील उदाहरण नमूद करावे.
  • भूरूपांपकी केवळ प्रसिद्ध नद्या, पर्वत, सरोवरे इ.चाच अभ्यास केल्यास ताण थोडा कमी होईल.
  • भारतातील व महाराष्ट्रातील खडकांचे प्रकार आíथकदृष्टय़ा महत्त्वाचे असल्याने या भागाचा परिपूर्ण अभ्यास करायला हवा.

भौतिक भूगोल

  • भौतिक भूगोलामध्ये नकाशावर आधारित किंवा बहुविधानी किंवा जोडय़ा लावणे अशा प्रकारचे संकल्पनात्मक प्रश्न विचारले जातात. यासाठी भूगोलाचा अभ्यास नकाशा समोर ठेवून करायला हवा. नदी प्रणाली, पर्वत प्रणाली, प्राकृतिक विभाग, मान्सूनचे वितरण इ.बाबत भौतिक भूगोलातून प्रश्न विचारले जाऊ शकतात.
  • जागतिक भूगोलात फक्त प्रसिद्ध नद्या, पर्वत, प्राकृतिक विभाग इ.चा टेबल फॉरमॉटमध्ये तथ्यात्मक अभ्यास पुरेसा आहे.
  • भारतातील पर्वत प्रणालीचा नकाशावरील अभ्यास करतानाच त्यांचे आर्थिकमहत्त्व, पर्जन्यनिर्मिती व हवामान इत्यादीमधील महत्त्व या बाबींचाही अभ्यास आवश्यक आहे.

या सर्व भौगोलिक संकल्पना समजून घेतल्यावर पर्यावरणीय भूगोलाच्या संकल्पनांचा अभ्यास करणे संयुक्तिक ठरते. त्यानंतर भौगोलिक चालू घडामोडी समजून घेणे सोपे होते.

पर्यावरणीय घटक

  • पर्यावरणीय भूगोलातील पर्यावरणाचा ऱ्हास, जागतिक तापमानवाढ, हरितगृह, परिणाम, जैवविविधतेचा व वनांचा ऱ्हास, कार्बन क्रेडिट या संकल्पना अत्यंत बारकाईने अभ्यासणे आवश्यक आहे. मूलद्रव्यांचे चक्र, अन्नसाखळी व अन्न जाळे या बाबी समजून घ्याव्यात. हा सगळा संकल्पनात्मक अभ्यास ठउएफळ च्या पुस्तकातून करणे आवश्यक आहे.
  • पश्चिम घाटाची रचना, भौगोलिक वैशिष्टय़े, जैवविविधता, संवर्धनाबाबत समस्या, कारणे, उपाय, संबंधित राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी असा परिपूर्ण अभ्यास महत्त्वाचा आहे.
  • पर्यावरणविषयक कायदे घटकाची पेपर २ च्या विधीविषयक घटकातूनच तयारी करावी.

दूरसंवेदन

  • दूरसंवेदनासाठी कार्यरत असलेले उपग्रह, त्यांची काय्रे, या क्षेत्रातील भारताची वाटचाल समजून घेणे आवश्यक आहे.
  • दूरसंवेदनामध्ये वापरले जाणारे तंत्रज्ञान व त्याचे उपयोजन, त्यातून मिळणाऱ्या नकाशांचे वाचन करण्याची पद्धत, मिळणाऱ्या माहितीचे स्वरूप समजून घेणे आवश्यक आहे.